राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक प्रसार माध्यमे :
"सामाजिक प्रसार माध्यमे म्हणजे मी, माझे आणि माझ्याकडून प्रत्येक गोष्टीवर स्पष्ट मत ( आणि कशावरही) व्यक्त करता आलेच पाहिजे" - मा. डॉ. मोहनजी भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे संघाचे मत असू शकत नाही. कारण संघाचे मत हे सामूहिक निर्णयातून घेतले जाते. कोणाही एका व्यक्तीचे मत हे संघाचे मत असू शकत नाही. डॉ. मोहनजी भागवत यांच्या मते, काही स्वयंसेवक हे या एकत्रित मताची वाट पाहत नाहीत; जिथे त्यांना या गोष्टीची स्पष्ट जाणीव असते की त्यांचे मत या पूर्ण मताचा एक भाग आहे.
पू. सरसंघचलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व स्वयंसेवकांना आवाहन केले आहे की, “समाज माध्यमे हे जरी सर्वांसाठी एक खुलं व्यासपीठ असले तरीही यावर संघाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यांवर व्यक्तिगत मत प्रकट करणे टाळले पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीचे मत हे संघाचे मत म्हणून चुकीच्या अर्थाने समाजात जाऊ शकते.” मा. डॉ. मोहनजी भागवतांनी 'ऑर्गनायझर'ला एप्रिल 2018 मध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
या मुलाखतीत (विविध प्रश्नांना) प्रसार माध्यमांचा व विविध ॲप्सचा वापर कसा करावा या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "हे एक साधन आहे आणि त्याच्या उपयोगितेप्रमाणे त्याचा वापर झाला पाहिजे, पण आपण जेव्हा प्रसार माध्यमांचा वापर करत असतो तेव्हा त्याच्या मर्यादा व अनावश्यक परिणाम लक्षात घेतला पाहिजे. प्रसार माध्यमाचा अयोग्य वापर हा एखाद्याला गर्विष्ठ व आत्मकेंद्रित बनवू शकतो."
बऱ्याचदा असं करणं गैरसमजाकडे घेऊन जातं. कधी कधी आपल्या लोकांमध्ये सुद्धा गैरसमजाने जागा घेतल्याचे समजते. आणि मग स्वतःहून मत काढून टाकावे लागते. हे बऱ्याच लोकांसोबत होत असतं कधी कधी स्वयंसेवकांसोबतही होतं. फेसबुक हे त्यांच्या नावाप्रमाणेच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुमचं प्रतिनिधित्व करत असतं, आणि याचा कल तुम्हाला आत्मकेंद्री बनवण्याकडे अधिकाधिक घेऊन जातो.
पू. सरसंघचालक असं सुद्धा म्हणतात की, "व्यावसायिक पातळीवर स्वतःची जाहिरात करणं याला कदाचित कमी महत्त्व दिले पाहिजे पण संघटनात्मक पातळीवर असं करता कामा नये आणि म्हणूनच संघाचे (एक संघटन म्हणून) एक स्वतंत्र असं फेसबुक खातं व ट्विटर खातं आहे आणि ते माझं वैयक्तिक खातं अजिबात नाही आणि कधी ते तसं असणारही नाही." जी लोक राजकीय पातळीवर काम करतात त्यांच्यासाठी या व्यासपीठाला (प्रसारमाध्यम) खूप महत्त्व आहे. पण त्यांनी देखील याचा वापर खूप सजगतेने वापर केला पाहिजे. आपण तंत्रज्ञानाचे नोकर नाहीत. आपण याचा वापर मर्यादेत राहून केला पाहिजे.
मूळ लिंक
http://www.organiser.org//Encyc/2018/4/13/Swayamsevaks-and-Social-Media-Here-is-what-RSS-Sarsanghchalak-has-to-say.html
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या