समाज मन निर्मितीचे सशक्त माध्यम चित्रपट : श्री. सुनिलजी आंबेकर


 
राष्ट्र निर्माण प्रक्रियेत भारतीय चित्रपट सृष्टीचे योगदान अतुलनीय आहे. समाजमन निर्मिती चे सशक्त माध्यम म्हणून अधिकाधिक उत्तम कलाकृती निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मा.सुनिलजी आंबेकर यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे देवगिरी चित्र साधनातर्फे आयोजित पोस्टर अनावरण कार्यक्रम प्रसंगी आंबेकरजी बोलत होते.
भारतीय चित्र साधना,नवी दिल्ली द्वारा दर तीन वर्षांनी राष्ट्रीय फिल्मोत्सव आयोजित करण्यात येतो. याच मालिकेत ५ व्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन फेब्रुवारी २०२४ मध्ये पंचकुला हरीयाणा येथे करण्यात आले आहे,या महोत्सवाचे पोस्टर विमोचन नुकतेच संभाजीनगर येथे श्री.सुनिल आंबेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी रा.स्व.संघाचे क्षेत्र प्रचारक मा.अतुलजी लिमये , प्रांत प्रचार प्रमुख श्री.संतोष तिवारी , सह प्रचार प्रमुख अँड.रोहित सर्वज्ञ , चित्र साधना प्रांत संयोजक श्री.किरण सोहळे , सह संयोजक श्री. विनीत जोशी संगीतकार श्री. संजय हांडे इ.मान्यवर उपस्थित होते. खान्देश मराठवाडा क्षेत्रातील अधिकाधिक कलाकृती राष्ट्रीय फिल्मोत्सवात सहभागी व्हाव्यात म्हणून युवा चित्रपटकर्त्यांसाठी विविध कार्यशाळा तसेच प्रशिक्षण सत्रांचे आयोजन येणाऱ्या काळात देवगिरी चित्र साधना तर्फे घेणार असल्याचे विभाग संयोजक श्री.स्वप्नील केंद्रे यांनी जाहीर केले. या प्रसंगी अनुप देशपांडे , गौरव नाथ ,अँड.चैतन्य धारुरकर,प्रा.अभिजित पंडित,डॉ. अनुराधा पत्की, कल्पेश जोशी,ओंकार शेलदरकर,किरण देशमुख इ रसिक श्रोते उपस्थित होते.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या