यमगरवाडी सेवा प्रकल्पातील ओमकारची उत्तुंग भरारी; राष्ट्रीय स्तरावर मिळवले रौप्य पदक!

यमगरवाडी सेवा प्रकल्पातील माजी विद्यार्थी ओमकार रमेश राठोड याची उत्तुंग भरारी.... 

यमगरवाडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा प्रकल्पातील माजी विद्यार्थी ओमकार रमेश राठोड याने दिल्ली नॅशनल स्कूल गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले आहे. हा विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत यमगरवाडी सेवा प्रकल्पामध्ये शिक्षण घेत होता. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याला रायफल शुटींग या क्रीडा प्रकारची मनापासून आवड होती. यावेळी त्याला यमगरवाडीतील क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर आणि इतर शिक्षक वृन्दांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

ओमकारने शाळेत शिकत असतानाच रायफल शुटींगमध्ये राज्य स्तरापर्यंत मजल मारली होती. शालेय शिक्षण पूर्ण करून ओमकार लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिकायला गेला. तिथेही त्याने रायफल शुटींगचा सराव चालूच ठेवला. यावेळी सुद्धा तो यमगरवाडीचे क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर वेळोवेळी मार्गदर्शन करतच होते. 

या सगळ्या अथक प्रयत्नांमुळे त्याने थेट दिल्ली नॅशनल स्कूल गेम्समध्ये सिल्वर मेडल पटकावले, आणि आपल्या शाळेचे आणि समाजाचे नाव मोठे केले आहे. ओमकारने आणि या प्रकल्पातील इतर मुलांनी इथून पुढे अशीच प्रगती करावी, म्हणून भटके विमुक्त विकास परिषद आणि यमगरवाडी सेवा प्रकल्प कायम प्रयत्नशील राहील. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भटके विमुक्त समाजातील मुलांसाठी ‘यमगरवाडी प्रकल्प’

“भटक्या समाजातील मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, जिम्नॅस्टिक अश्या विषयांमध्येही पारंगत करीत आहे. भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करावी, म्हणून हा सेवा प्रकल्प कार्यरत आहे. प्रकल्पातून शिकून आजपर्यंत अनेक मुलं मुलींनी मोठे यश संपादित केले आहे. आम्हाला याचा खूप आनंद व अभिमान वाटत आहे.” 
- शरद दिवे - विभाग समन्वयक, भटके विमुक्त विकास परिषद


@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या