धुळे जिल्ह्यात काय चाललंय काय? धर्मांध विकृतींना आता आवर हवाच!

धुळे जिल्ह्यात काय चाललंय काय? असा कोणालाही प्रश्न पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे मागील महिनाभरापासून धर्मांध जिहादी शक्तींनी मांडलेला उच्छाद.  मागील काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात हिंदू मुली, व महिलांच्या छेड-छाडीच्या घटना वाढत असल्याचंही लक्षात येत आहे. हिंदूचे सण समारंभ साजरी करण्यात बाधा पोहोचवली जात आहे. यामध्ये विशेषत: हिंदू समाजालाच टार्गेट केलं जातंय, असं चित्र दिसत आहे. 
यातली अगदी अलीकडचीच घटना बघितली, तर धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर गावात आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची चार तरुण मिळून छेड काढत होते. ही मुलगी जेव्हा क्लाससाठी गावात जायची, तेव्हा आयान फरीद खाटीक,  रेयान अल्ताफ तांबोळी,  मुझहीद मोहसिन पठाण व मुजबबील युनूस खाटीक हे चार मुस्लीम तरुण मिळून तिचा विनयभंग करत होते. कधी विचित्र हावभाव, तर कधी रस्ता अडवून मारहाणीची धमकी देणे, असे प्रकार सुरु होते. त्यात ३० मे रोजी जेव्हा मुलगी क्लासला जात होती, तेव्हा आयान फरीद खाटीक या मुलाने तिच्यासमोर वीस रुपये फेकले, आणि या पैशातून तू चॉकलेट आणून आम्हाला खाऊ घाल, अशी धमकी दिली. धमक्यांना घाबरून तिने त्या मुलाचे म्हणने ऐकले. पण तरीही त्या तरुणांकडून होणारा मानसिक त्रास कमी होत नव्हता. 

अखेर मुलीने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीतेच्या आईने निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आयान फरीद खाटीक, रेयान अल्ताफ तांबोळी, मुझहीद मोहसिन पठाण व मुजबबील युनूस खाटीक या सर्व आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३५४-डी, ३४१,५०६,३४, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विशेष बाब अशी, कि हे चारही संशयित आरोपी वय वर्ष १५ ते १८ याच वयोगटातील आहेत. त्यामुळे निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपोनी हनुमंत गायकवाड यांनी १३ जून रोजी या चारही संशयित आरोपींना अटक करून त्यांची रवानगी धुळे येथील बाल सुधार गृहात केली आहे. 

हे झालं केवळ एक उदाहरण, पण यापूर्वी देखील ४ जून रोजी निजामपूर पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी योगिता बाचकर वटपौर्णिमेच्या पूजेला जात असतान यांचे शेजारी मोईन पिंजारी यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. एका महिला पोलिसाला त्याने धमक्या दिल्या, शिव्या दिल्या. या व्यतिरिक्त निजामपूर याच गावात मशिदी समोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून हिंदूंच्या वरातीवर दगडफेक करण्यात आली होती. तेव्हा देखील १२ मुस्लिम तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. 

अश्या घटना निजामपूरमध्ये वारंवार घडत आहेत. हिंदूचे सण, वार, उत्सव बघूनच महिलांचा विनयभंग किंवा हिंदू समाजावर दगडफेक केल्याच्या घटना घडत आहेत. यातून हे स्पष्टपणे जाणवते की, यामध्ये जाणीवपूर्वक हिंदू महिला व मुलींना टार्गेट करून त्रास दिला जातोय. 

ही धर्मांध विकृत मानसिकता हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याला बाधा पोहोचवत आहे. मुस्लीम समाजातील काही घटकांकडून हिंदू स्त्रियांनाच का टार्गेट केलं जातंय ? निजामपूरमध्ये हिंदू समाजाच्या सण उत्सवांनाच गालबोट का लावलं जात आहेत ? हिंदू धर्मियांना आपल्या पद्धतीने आनंद साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे, तरी देखील याच समाजातील लोकांवर दगडफेकीच्या घटना का घडत आहेत ? अवैध कत्तलखाने सर्रास सुरू आहेत. हिंदू मंदिरे सुरक्षित नाहीत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लोकांना स्वाभाविक प्रश्न पडतोय की धुळे जिल्ह्यात काय चाललंय काय?

अलीकडच्या काही दिवसात जातीय दंगली, विवाद, हाणामारी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना अचानक घडून येत नसतात. त्यामागे अनेक छोट्या मोठ्या घटनांची खदखद असते. लवकर आला बसला नाही तर कधीतरी भडका उडतो आणि सामाजिक वातावरण बिघडते. इतर वेळी भाईचारा म्हणून तोंड फाडणारी मंडळीही अश्या घटना घडत असताना कुठे दिसत नाही. धर्मांध विकृत शक्तींना त्यांची जास्त आवश्यकता आहे. 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

गेल्या ९ वर्षांचा विचार करा. ५ वर्षे भाजप आमदार होता. ९वर्षे भाजप खासदार आहे! स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजप सत्तेवर/प्रमुख विरोधी आहे.विहिंप, बजरंग दल नाममात्र का होईना आहे! मग हे अपयश कोणाचे ❓❓❓डॉ सचिन, धुळे