आष्टीच्या तरुणांचा अनोखा आदर्श; तृतीयपंथी बांधवांना केली मदत



छत्रपती संभाजीनगर| 15/7/2023 रोजी समाज भान जपत "एक भाग जगण्याचा प्रतिष्ठान, आष्टी" तर्फे तृतीयपंथी सामाजिक विकास परिषद व पारलिंगी (तृतीयपंथी) बांधवांना रेशन किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेला 7950 रू किंमतीचा किराणा 10 पारलिंगी मध्ये विभागून देण्यात आला. "एक भाग जगण्याचा प्रतिष्ठान" हा व्हाट्सएपचा ग्रुप, आष्टी येथील तरुणांतर्फे चालवल्या जातो. सोशल मीडियाचा उपयोग  समाज हितासाठी होऊ शकतो, याचं चांगलं उदाहरण यातून समोर आलंय.  

        तृतीयपंथी सामाजिक परिषदेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतांना, अनेक गोष्टी समोर आल्या. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य संबंधी अनेक समस्या असताना पारलिंगी बांधवांतर्फे अनेक सेवाभावी कार्य केले जातात. जसे की एकल (विधवा) महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करणे व एकल महिलांना सरकारी कागदपत्रे काडण्यासाठी मदत करणे, दीर्घ आजारांनी पीडित रुग्णांसाठी औषधांची सोय करणे, ह्युमन ट्रॅफिकिंग मधून महिलांना वाचवणे. तसेच कोविड काळातही यांनी मदतकार्य केले होते.




        या कार्यक्रमात सेवा भारतीचे देवगिरी प्रांत सचिव डॉ आनंद पाठक, सावित्रीबाई फुले एकात्म विकास मंडळाच्या डॉ प्रतिभा फाटक, या कार्यक्रमाचे समन्वयक अशोक गिरी, एक भाग जगण्याचा प्रतिष्ठानचे सदस्य रोहित दुषी, आकाश ढवळे, विश्वेश्वर बोडके, तृतीयपंथी सामाजिक परिषदेचे अध्यक्ष अलताफ शेख सोबत शिल्पा गुरू, प्रा. लता जाधव, अर्पिता भिसे, तसेच पारलिंगी व अन्य समाज बांधवांची उपस्थिती होती.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या