समाजात सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी संघ जवळपास १५ लाख स्वयंसेवकांना सक्रिय करणार - अरुण कुमार
बंगळुरू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले की, गतकाळात संघाने स्वयंसेवकांचे सर्वेक्षण (वेळ, आवड, क्षमता इ.) केले होते, ज्यामध्ये ३० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या १५ लाख स्वयंसेवकांचा विचार करण्यात आला होता. हे सर्व स्वयंसेवक समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच समाजाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे योगदान देऊ शकतील याविषयी प्रतिनिधी सभेत चर्चा करण्यात येणार आहे. संघ या स्वयंसेवकांना आवश्यकतेनुसार आगामी कार्यात सहभागी करेल, असे त्यांनी सांगितले. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सामान्य विषयांवरही चर्चा विमर्ष घडून येतील व उपस्थित प्रतिनिधीही त्यांचे स्वतंत्र विषय उपस्थित करू शकतील. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा व अन्य विषयांवरही चर्चा होऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
अरुण कुमार बंगळुरू येथे १५ ते १७ मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीअगोदर माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा संघाविषयी निर्णय घेणारा सर्वोच्च विभाग असून अश्या प्रकारची दरवर्षी बैठक होत असते, तर प्रति तीन वर्षानंतर सरकार्यवाह निवडीसाठी ही बैठक नागपुरात आयोजित होते असे त्यांनी सांगितले. बंगळुरू येथे होणाऱ्या प्रतिनिधीक सभेचे उदघाटन १५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता होईल अशी माहिती त्यांनी दिली.
बंगळुरू येथील सभेत मागील वर्षभराच्या कार्यासह आगामी वर्षभारताच्या कामाचे नियोजन करण्यात येते. यासोबतच विविध प्रांत व विभागातून आलेले प्रतिनिधी आपणास आलेले अनुभव व कार्यवृत्तांत सादर करतात. १४ मार्च रोजी अखिल भारतीय कार्यकारी बैठक होईल, ज्यामध्ये प्रतिनिधी सभेतील विषय व बैठकीचा अजेंडा ठरविण्यात येईल. कार्यकारी मंडळात प्रांत व क्षेत्र स्तरावरील मा. संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकर्ता उपस्थित राहतील. या बैठकीत आगामी वर्षातील संघ शिक्षा वर्ग व अन्य कार्यक्रमाशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी सभेच्या बैठकीत १५०० कार्यकर्ता सहभागी होतील. ज्यामध्ये अ. भा. कार्यकारी मंडळासह देशातील ४४ प्रांतातील निर्वाचित प्रतिनिधी, विशेष आमंत्रित सदस्य, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्याही असतील. याशिवाय ३५ सहाय्यक संघटनांचे अध्यक्ष व महासचिव, विहिंपचे अध्यक्ष जस्टीस वी.एस.कोकजे, कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार, विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष सुबैय्या शणमुगम, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष साजी नारायण, विद्या भारतीचे अध्यक्ष रामकृष्ण राव, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेव उराव, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, सक्षमचे अध्यक्ष दयाल सिंह पवार व अन्य सदस्य बैठकीत आमंत्रित करण्यात आले आहेत.
बैठकमध्ये शेवटच्या दिवशी सरकार्यवाह भय्याजी जोशी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत घेतल्या गेलेल्या निर्णयावर व पारित झालेल्या प्रस्तावावर विस्तृत माहिती देतील. अशी माहिती अरुण कुमार यांनी दिली. यावेळी अ.भा. सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर, दक्षिण मध्य क्षेत्र कार्यवाह तिप्पेस्वामी उपस्थित होते.
#विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या