'शिवशंभू विचार दर्शन' यांच्या वतीने आयोजित फेसबुक लाईव्हमध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री.गजानन भास्कर मेहंदळे हे विषय मांडणार आहेत. ३१ मे रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वेबसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक, शिवभक्त व समस्त जिज्ञासू मंडळींसाठी त्यांचे भाषण ऐकणे ही एक पर्वणीच असणारआहे.
गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक वाक्य सप्रमाण सिद्ध केलेले असते. फेकाफेक करून टाळ्या मिळवणाऱ्या इतिहासकार त्यांना कायम टरकून असतात. अतिशय मृदू स्वभावाचे धनी म्हणून त्यांची ओळख आहे. श्री मेहेंदळे प्रत्येक प्रश्नाला अतिशय आत्मीयतेने उत्तर देतात. शंकांचे समाधान करतात. स्वतःला इतिहासाचा विद्यार्थी म्हणवून घेतात. अनेक भाषा आणि लिपी समजतात.
कोण आहेत गजानन भास्कर मेहेंदळे?
गजानन मेहेंदळे यांनी संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातुन त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. 1971 च्या भारत - पाकीस्तान युध्दात त्यांनी युध्द पत्रकार म्हणून महत्वाचे कार्य सांभाळले आहे. 1969 साली पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले, तेव्हापासून असा दिवस क्वचितच गेला असेल ज्यादिवशी श्री मेहेंदळे यांनी शिवकालीन कागदपत्रे अभ्यासली नाहीत. अर्थातच श्री मेहेंदळे शिवकालीन घडामोडींचे मोठे अभ्यासक आहेत.
आजवर त्यांनी -
१. 1000 पानांचा Shivaji His Life and Times ( संशोधनात्मक इंग्रजीत)
२. 2500 पानांचे "राजा श्रीशिवछत्रपती" हे सर्वात व्यापक आणि मोठे शिवचरित्र लिहीले. ज्यात 7000 हून अधिक संदर्भ जोडलेले आहेत.
३. शिवछत्रपतींचे आरमार: हा आरमार संदर्भातील संशोधनात्मक ऐतिहासिक ग्रंथ आहे.
श्री मेहेंदळे यांना संस्कृत, अरबी, पोर्तूगिज आदी भाषांचे ज्ञान असून विविध संदर्भ, कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. युध्दनीतीचा अभ्यास करायचा म्हणून ते शिवचरित्राकडे वळले आणि तेव्हापासून शिवचरित्रात रमले ते आजतागायत.
गेली पन्नास वर्ष ते छ.शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीचा अभ्यास करत आहेत.
आगामी काळात श्री मेहेंदळे यांचे "इस्लामी राजवटी आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य" हे 1200 पानांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. गजाभाऊ सहसा जाहीर भाषणे देत नाहीत. पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात ते ज्ञानसाधनेत रमलेले असतात. पुण्याच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या विनंतीवरुन ते शिवशंभू विचारदर्शन साठी एक तासाचे व्याख्यान देणार आहेत.
तरी महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सहकुटुंब , सहपरिवार इष्टमित्रांसह गजानन मेहेंदळे यांच्या अमोघ वाणीतुन शिवचरित्राचे श्रवण करावे आणि राष्ट्र आणि धर्माच्या संवर्धनाचा संकल्प करावा असे आवाहन 'शिवशंभू विचार दर्शन'तर्फे करण्यात आले आहे. देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
------------------------------------------
Like & Follow us
-------------------------------------------
0 टिप्पण्या