सौदी अरबच्या राजकुमारी प्रिन्सेस अल हेंद कासिमी यांनी भारतातील मंदिरांना काही दिवसांपूर्वी भेट देऊन देवपूजा केली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केला आहे.
राजकुमारी कासिमी म्हणाल्या, "मी मुस्लिम असूनही मंदिरात देवपूजा केली. यावेळी मला मंदिरात अद्भुत ऊर्जेचा अनुभव आला. मी भारतातील डोंगर दऱ्या पाहिल्या. मी शेतात गेले. मी साडी आणि बिंदी विकत घेतली व सुवर्ण मंदिराची यात्रादेखील केली. केळीच्या पानावर जेवण केलं."
राजकुमारी कासिमी पुढे म्हणाल्या, "पूर्ण मंदिर सोन्याचे होते. मी मुस्लिम आहे, परंतु तेथील लोकांच्या सोबत मी प्रार्थना करण्यायासाठी गेले. मंदिरात हनुमान, लक्ष्मी, शिवजी यांचे दर्शन घेतले. त्यांचा जलाभिषेक केला. त्यांनी म्हंटले की लोकांनी हा अविश्वसनीय भारत अवश्य पाहायला हवा.
राजकुमारी कासिमी यांनी आपल्या ट्विटर वर यााचा व्हिडीओ शेअर केला आहे. मूलतत्त्ववादी व धर्मांध मुस्लिम मात्र यावर चांगलेच भडकले आहेत. इस्लामच्या विरुद्ध राजकुमारी कासिमी यांचं कृत्य असल्याचं त्यांनी म्हणत विरोध दर्शविला आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या