गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या "भारतात वाढत असणाऱ्या इस्लाम-फोबिया"वर बोलणारी सौदी अरेबियाची राजकुमारी हेंद अल कासिमी यावेळी मात्र भारतात असुरक्षित वाटणाऱ्या कथित मुलतत्ववाद्यांच्या तावडीत सापडलेली दिसून आली.
ट्विटरवर रंगलेल्या या सामन्यात एकेकाळी या काही असुरक्षितांच्या गळ्यातली ताईत असणारी ही राजकुमारी आज मात्र टीकेची धनी ठरली, इतकेच नव्हे तर त्यांच्या दृष्टीने ती "काफ़िर" म्हणजेच "इस्लामला न मानणारी" देखील झाली.
याला कारण ठरले, ते म्हणजे तिने तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले चेन्नईच्या "सुवर्ण मंदिराचे" काही फोटो व व्हिडीओ... या खाली तीने लिहिले - मागे मी भारतात आले, तेव्हा या मंदिराला भेट दिली, पुजा केली, साडी आणि बिंदीदेखील खरेदी केली. पुद्दूचेरीच्या सुंदर टेकड्यांच्या रम्य वातावरणात काही काळ व्यतीत केला.
या पुढे ती म्हणते - भारतात माझे जागोजागी पुष्पहारांनी स्वागत झाले, त्यातल्या मोगऱ्याचा सुगंध अजूनही माझ्या विस्मरणात गेलेला नाही, येथील पुजाऱ्यांशी देखील मी धार्मिक विषयांवर चर्चा केली. नक्कीच भारतातील परिस्थिती सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता मानणारी आहे.
आता हे या राजकुमारीचे सलग ट्विट आणि व्हिडिओ पाहून, इथल्या "असुरक्षितांच्या" मनात धडकी भरली आणि सुरू झाले ते या राजकुमारीच्या मनात विविध उदाहरणे देऊन विष ओतण्याचे कार्य. इथल्या काही तथाकथित "असुरक्षितांनी"तिच्या विरोधातट्विटर मोहीम उघडून थेट शिवीगाळ वगैरे सुरू केली, काहींनी भारतात कसे अनेक वर्षांपासून मुस्लिम पीडित आहेत, गांजलेले आहेत - याचे वर्णन ऐकवले, आणि यातले तर काही राजकुमारीला काफ़िरसुद्धा ठरवून मोकळे झाले - त्याचे कारण म्हणजे तीने केलेली मूर्तिपूजा !!
यावरून तिने कसा पैगंबरांच्या "एकेश्वरवादाला" काळिमा फासला आणि त्यासोबतच इस्लामी शिकवणुकीच्या बाहेर वर्तन करून - अल्लाह ला न मानणाऱ्या व्यक्तींच्या देवाजी पुजा केली वगैरे मुद्दे रेटले.
यात मग आघाडीवर असणारे अरविंद केजरीवालांच्या निकटवर्तीय जफर इस्लाम आणि त्याचे अनेक प्यादे, हा जफर इस्लाम तोच जेव्हा या राजकुमारीने भारतात तब्लिगी जमातीवरून वातावरण अत्यंत तापलेले असताना काही वादग्रस्त ट्विट केले होते - आणि हा व्यक्ती अरब देशांकडे भारताच्या असहिष्णुतेची तक्रार नोंदवून मोकळा झाला होता.
आता, हे पाहून गांगरून गेलेल्या या हेंद बाईंनी - या ट्रोलधाडीला उत्तरे द्यायला सुरुवात केली - यात त्यांची बाजू मांडताना त्या म्हणाल्या "मी स्थापत्यशास्त्रज्ञ असल्याने - मंदिरांची अद्भुत रचना पाहण्यासाठी गेले होते - तेथील सुवर्णकाम केवळ अवर्णनीय असे आहे, आणि मी कुठल्याही प्रकारे पैगंबरांच्या शिकवणुकीला डावलून पुढे गेलेले नाही. मी माझ्या देवाला जशी पूजते - तसेच हिंदू त्यांच्या देवाला पुजतात. यात कोणतीही चुक मला दिसत नाही. मी तेथे काही नवीन नाती जोडली तसेच धार्मिक बाबी जाणून घेतल्या,केवळ भारताताचं या प्रकारचे स्वातंत्र्य आपण अनुभवू शकतो.
एकाट्विट मधून त्यांना "काफ़िर" ठरवणाऱ्याचा समाचार घेताना त्या म्हणाल्या - "एका मुसलमान व्यक्तीने दुसऱ्या मुसलमान व्यक्तीला काफ़िर ठरवणे हेच मुळी महापाप आहे".
या सौदीच्या राजकुमारीच्या कधी भारताविषयी सकारात्मक तर कधी वेगळी भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे मात्र येथील कथित "शोषित-पीडित आणि असुरक्षित"पणाचा बुरखा पांघरलेल्या तरीही स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या मुस्लिमांचा मात्र खरा चेहरा उघडकीस आला आहे, हे सत्य मात्र नाकारता येणार नाही.
©️ वरद मुठाळ, शिर्डी
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या