गंगापूर शहर व आजूबाजूच्या पंचक्रोशीत जीवनावश्यक वस्तूचे वितरण सुरू आहे. काही दिवसापूर्वीच रा. स्व. संघ, आपत्ती निवारण समिती, गंगापूर कडून समाजातील सज्जनशक्ती आणि दानशूरांना असे आव्हान करण्यात आले होते की, त्यांनी ही या मदत वितरणात आपला सहभाग नोंदवा. त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळा, गंगापूर १९९४ च्या तुकडीने (बॅच ) 100 किलो तांदूळ आपत्ती निवारण समितीकडे मदत म्हणून सुपूर्द केले. विशेष म्हणजे या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी आपले एक कायम स्वरूपी मित्र मडंळ ही स्थापन केले असून त्या माध्यमातून ते विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात.
या मंडळाचे अध्यक्ष अँड संतोष साबणे, उपाध्यक्ष गिरीश गंगापूरकर, कार्याध्यक्ष मंगेश शिंदे, कोषाध्यक्ष विलास धोंगडे तर सचिव म्हणून मनोज जोशी काम बघतात. आज शिक्षण संपल्यानंतर अनेकजण व्यक्तीकेंद्री आयुष्य जगण्यात मशगुल असतांना, या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीचा ओलावा कायम ठेवला, ही निश्चितच समाधानाची बाब असून या तुकडीच्या सर्व विद्यार्थी मित्राचे आपत्ती निवारण समिती कडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या