फेब्रुवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या हिंसेचे पर्यवसान कधी धार्मिक दंगलीत झाले कळलेच नाही. या दंगलीत 42 जणांचे जीव गेले, तर शेकडो जखमी झाले आणि जाळपोळीत कित्येकांचे अतोनात नुकसान झाले त्याची गणतीच नाही. ही दंगल सुरू होण्यामागे ज्या शंका व कारणे वाटत होती ती आता स्पष्ट होऊ लागली आहे. देशाच्या शांतता व सभ्यतेवर हा पूर्वनियोजित हल्ला होता. त्याची प्रत्येक भारतीयाला आठवण राहावी, कारण जे काल दिल्लीत घडवले गेले ते उद्या आपल्या गावात किंवा शहरात घडवले जाऊ शकते. म्हणून हा लेख.
----------
"हा योगायोग म्हणावा की पूर्वनियोजित कट? ज्यात आठवडाही न ओलांडलेले दिल्ली सरकार आणि संपूर्ण दिल्ली दंग्याच्या ज्वालेने भस्मसात होते. सीएए विरोधाच्या नावाखाली दिल्लीचे मार्ग ठप्प करून बसलेले अराजक तत्वांचे मनोबल केजरीवालांच्या पुनरागमनाने प्रचंड वाढलेले दिसले. दिल्ली सरकार सीएए विरोधी आंदोलनांना सहकार्य करण्यापासून दंगेखोरांशी सतत संपर्क साधल्याच्या अनेक बाबी दिल्ली सरकारशी घट्ट जडलेल्या दिसतात. आम आदमी पक्षाचे नेते केवळ या दंग्याचे नेतृत्वच करत नव्हते, तर एका नेत्याच्या घरून संपूर्ण दंग्याचे संचालन केल्या जात होते. ज्याचे चित्रीकरण आस-पासच्या मंडळींणी कॅमेऱ्यात केले आहे. तेथेच एक अनधिकृत ऍसिडचा कारखानाही सापडतो."
दिल्ली हिंसाचार हा दिल्लीत यमुना पलीकडील परिसरास केंद्रस्थानी ठेवून घडवण्यात आलेली संघटित व पूर्वनियोजित दंगल होती.
दिल्ली निवडणुकांचे निकाल आल्याच्यानंतर दिल्लीमध्ये दंगे पेरण्याआधीच जणू जमनीची मशागत झाली होती. कॅप्टन आर विक्रम सिंह यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य स्वागताची तयारी भारत सरकार करत असताना राष्ट्रविरोधी शक्तींनीसुद्धा दिल्ली पेटवण्याची तयारी करून ठेवली होती."
ज्यावेळी दंग्याची आग भडकली जात होती तेव्हा त्यात पेट्रोलबॉम्ब, दगडांचे ढिगारे, अनधिकृत हत्यारांचा भांडार यमुना पलीकडे हल्ल्यासाठी उपयोगात आणल्या गेल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सर्व घडणे पूर्वनियोजनाशिवाय अशक्यच होते. तद्नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांकरिता दिल्ली दंगा ट्रम्प यांच्या दौऱ्यापेक्षा मोठा बातमीचा मुद्दा झाला. तुकडे-तुकडे गँग पासून थेट विरोधी पक्षात बसलेल्या अनेक राजकीय पक्षांचाही हा प्रकार घडून यावा असा मानस होता.
गुजरातमध्ये वाढलेल्या कोविड-१९ च्या रुग्णांचे संबंध आजतागत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्रम्प यांच्या दौऱ्याशी जोडत आले आहेत. परंतु ज्यावेळी त्यांना कोणी विचारले की महाराष्ट्र शासनामुळे जी राज्याची दुर्दशा झालेली दिसून येते, ती कुणाच्या दौऱ्यामुळे झाली? राज्यामध्ये भगवा परिधान केलेल्या निर्दोषांवर हल्ले होत आहेत, हे सर्व कुणाच्या निर्देशांन्वये होत आहेत त्यावर ते निरुत्तर असतात.
दिल्ली दंगे समजण्यासाठी अगोदर हे समजणे महत्वपूर्ण ठरते की या सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा फायदा कुठल्या पक्षाला होईल? सीएए - एनआरसी विरोधातून उत्पन्न झालेल्या या सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा आपल्या बाजूने कुणी उपयोग केला? या ध्रुवीकरणाची सुरुवात ठीक दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच कशी सुरू झाली? कारण या अगोदर सामान्य मुस्लिम समाजाने तीन तलाक, कलम ३७०, राम मंदिर या मुद्द्यावर आलेल्या निर्णयांचे स्वागत केले होते. त्यामुळे देशभरात कट्टरपंथी मुसलमान, तब्लीगी आणि विपक्षात बसून हिंदू -मुस्लिम मुद्दयावर देशात फुटीचे राजकारण करणारे पक्ष सक्रिय झाले.
या सक्रीयतेचा परिणाम असा झाला की संपूर्ण मुस्लिम मते आम आदमी पक्षाच्या खात्यात जमली. हे होते द्वेषाच्या राजकारणाचे उगवलेले पीक जे कट्टरपंथी मुस्लिमांद्वारे पेरल्या गेले आणि दिल्ली विधानसभा निवडणुक २०२० मध्ये आम आदमी पक्षाच्या पदरात गेले.
असे कसे घडू शकते, की दिल्लीमध्ये काँग्रेसला मते देणाऱ्या मुस्लिमांनी ठरवून घेतले की यावेळी मत आम आदमी पक्षाला द्यायचे आहे. आणि यासाठी ना कुठली मिटिंग घेण्यात आली ना कुठले संदेशाचे अभियान व्हाट्सऍपवर चालवण्यात आले. तरी देखील प्रत्येक मुस्लिम मतदात्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला की भाजपाला मतदान करून नये तसेच काँग्रेसलाही. वोट फॉर केजरीवाल. हाच संदेश कसा गेला?
सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या जाळ्यात सामान्य मुसलमानही फसून जातो. त्याचा ना तबलिगिंशी ना कट्टरपंथिंशी संबंध आहे. तो तर दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतोय. दहा - दहा तास मेहनत करून घर पोसतोय. आपल्या मुलांना चांगले भविष्य देवू शकेन यासाठी राबतोय, परंतु त्याला जर मुसलमान म्हणून ओळख ठेवायची असेल तर त्याने इस्लामिक परिसंस्थेचा भाग बनून रहावे लागते. कोण्या मुसलमानाने या कट्टरपंथ्यांशी असहमती दर्शविली तर त्याचा सर्व स्तरावर बहिष्कार केला जातो.
भारतातील काही इस्लामिक संघटना इस्लामला मजहब मानू इच्छित नाही, ते याचे एका टोळी प्रमाणे संचालन करू पाहता. अश्या संघटना आपली पूर्ण शक्ती आपली लोकसंख्या वाढवण्यात नि असहमती दाबण्यावर खर्ची घालतात. येथे चर्चेला स्थान नाही तर मतभेदांचा कुठलाही स्वर ऐकण्यास मिळत नाही.
तरुण लेखक अर्चित यादव आल्हानुसार " जुम्म्याची नमाज म्हणजे धार्मिकतेपेक्षा राजकीय गतीविधी अधिक आहे. ज्या अनुषंगाने एक मुस्लिम व्यक्ती स्वतंत्र चिंतन करूच शकत नाही."
एक मुस्लिम युवकाने काय विचार करावा हे मस्जिदच ठरवून देते. कारण असे कसे शक्य होते, ज्यामध्ये देशभरात मुस्लिमांच्या मतदानाचा पॅटर्न एकच एक आहे. कसलाही गोंगाट न करता एका विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षालाच एकगठ्ठा मत जाते. तेथे केवळ मतेच ठरवली जात नाहीत तर दगडफेकसुद्धा ठरवली जाते. एक काळ असा होता ज्यात श्रीनगरातल्या लाल चौकात जुम्म्याच्या नमाज नंतर दगडफेक नित्याचीच होती. तेथे अतिरिक्त सैन्यबळ तैनात करावेच लागे. आपण असा विचार करू शकतो का, जेथे मंदिर, चर्च, गुरुद्वाऱ्यातून लोक निघाले आणि त्यांच्या हातात दगड आहेत! अश्या घटना मात्र जुम्म्याच्या नमाजनंतर सामान्य बाब आहे.
इंटरनेटवर दंगा आणि मस्जिदिंचे जुम्म्या कनेक्शनच्या अनेक बातम्या आपल्याला मिळू शकतील. १४ डिसेंबर २०१९ ला 'ऑप इंडिया' च्या बातमीनुसार "ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये जुम्म्याच्या नमाज झाल्यानंतर मुसलमानांनी योजनाबद्धरित्या प्रचंड हिंसा तोड-फोड, जाळ-पोळ केली". २० डिसेंबर २०१९ ला 'दैनिक हिंदुस्थान' लिहितो "अलीगढ-हाथरस येथे जुम्म्याच्या नमाज नंतर पोलिसांवर दगडफेक व फायरिंग." २० डिसेंबर २०१९ ला देखील 'उत्तम हिंदू' ने "जुम्मेच्या नमाजनंतर उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये जाळपोळ व दगडफेक." ११ में २०१९ श्रीनगर येथुन 'अमर उजाला' मध्ये "जुम्मेच्या नमाजनंतर हिंसक प्रदर्शन सैन्याने आंसू गॅस च्या नळकांड्या फोडल्या, पैलटगन देखील वापरण्यात आली."
ज्यावेळी दिल्लीवासीयांसमोर दिल्ली दंग्याची सत्यता बाहेर येवू लागली, तेव्हा तुकडे-तुकडे गँगला दिल्ली हिंसाचाराचे खापर फोडण्यासाठी एक नाव हवे होते. ज्यामध्ये यमुना पलीकडील दंग्याचे खापर त्यावर फोडता येईल. त्यांनी यासाठी भाजपा नेते कपिल मिश्रा यांना निवडले. खरं तर ही त्यांची निर्बुद्धता होती. अमेरिकन राष्ट्रध्यक्ष भारत दौऱ्यावर असतांना राजधानीत दंग्याची तयारी करण्याचे नियोजन कुठला भाजप नेता करू शकतो? त्यामुळे तुकडे - तुकडे गँग ते पुन्हा पुन्हा आपल्या लबाड पटकथेला खरे सिद्धीकरू इच्छिता. परंतु ही पटकथा खोटी आहे. जी कोणाच्याही पचनी पडणे कठीण.
दंग्यांबाबत कपिल मिश्राविरोधात सर्वाधिक NDTV ही वृत्तवाहिनी सक्रिय होती. कपिल मिश्रा ज्याक्षणी यमुना पलिकडील परिसरात एका निमंत्रणावर पोहोचले, तेव्हा एका प्रत्यक्षदर्शीनेच याची कबुली दिली की NDTV ने कपिल मिश्राना समाजापर्यंत वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत केले. कारण लोक तेथे नव्हते, त्या दृष्टीने त्यांना एक व्हिलन म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकतर्फी रिपोर्टिंग दाखवत असतांना कपिल मिश्रा यांचे मत जाणून घेण्याचा तिळमात्रही प्रयत्न केला गेला नाही हे विशेष.
त्यामुळे दिल्लीवासी यथायोग्य जाणतात, की या कुकर्मामागे कुठली जमात उभी आहे, ही तीच हिंदू-मुस्लिम करणारी तथ्यांना आलटून-पालटून आपल्यामतानुसार समाजात भ्रामकता माजवणारी आहे. जसे हे वास्तव दिल्लीला कळत आहे, तसे देशालाही कळायला हवे. कारण काल या देशविरोधी शक्तींनी दिल्ली पेटवली, उद्या अजून दुसरे शहर धुमसत उठेल.
मूळ लेखक - आशिष कुमार
स्रोत - पांचजन्य
मराठी अनुवाद - विशाल पाटील
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या