'दीपोत्सव' साजरी करण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी पुरातन मंदिर केले लखलखीत!

विहामांडवा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा कार्य पाहून गावातील तरुणाई त्याकडे आकर्षित होते. ती तरुणाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याला जोडून घेते. हेच तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विहामांडवा मंडळांतर्गत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमात सहभागी होते.

काल हेच सर्व तरुण राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सुवर्ण दिन कसा साजरा करावा हे ठरवण्यासाठी एकत्र आले होते. प्रत्येक स्वयंसेवक विषय मांडत होता. त्यामध्ये एका स्वयंसेवकाने सुचवले की गावातील राम मंदिर फार जुने झाले आहे त्यामुळे तिथे आपल्याला जर आरती करायची असेल आणि दिपोत्सव साजरा करायचा असेल तर तिथे आधी स्वच्छता करावी लागेल. दुसऱ्या स्वयंसेवकांनी सुचवले की मंदिराचा रंग उडाला आहे तर आपल्याला तिथे रंगरंगोटी देखील करावी लागेल.
रंगरंगोटी चा विषय समोर येतात अगदी तीनच मिनिटांमध्ये रंगरंगोटीसाठी लागणारे सर्व पैसे जमा करण्यात आले. आणि पुढील तिसाव्या मिनिटाला प्रत्यक्ष रंगरंगोटी च्या कामाला सुरुवात देखील झाली.
त्याच राम मंदिरामध्ये आज हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्याचे ठरल्यावर त्यामध्ये गावातील पणत्या बनवणाऱ्या व्यक्तीने दिवे विनामोबदला दिले. ते देताना तो व्यक्ती म्हणाला की पाचशे वर्षांपासून लोकांनी रामजन्मभूमी साठी आयुष्य अर्पण केले त्यामुळे मी या सर्व पणत्या कुठलाही  मोबदला न घेता देणार आहे. दिव्या साठी लागणारे तेल एका स्वयंसेवकाने विनामोबदला दिले. आणि पाच मिनिटांमध्ये हजार दिव्यांसाठी वातींच सोय पण झाली.
आज प्रत्येक स्वयंसेवक त्याच्या घरावर भगवा ध्वज उभारणार आहे. पण यात समाजाला देखील सहभाग घेता यावा म्हणून प्रत्येक स्वयंसेवक स्वखर्चाने त्याच्या घराशेजारील कमीत कमी दहा घरांवर भगवा ध्वज उभारणार आहे. स्वयंसेवकत्व म्हणतात ते हेच! 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या