"व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया साऱ्या आकुंचित सीमा, विशाल हृदयी स्थापन व्हावी, समाज पुरुषाची प्रतिमा"
या पद्याच्या ओळीतील "समाज पुरूष" ज्याची प्रतिमा आपल्या ह्रदयात स्थानापन्न व्हावी अशी अलौकिक प्रतिभा असलेले लोकनायक म्हणजे हिंदुह्रदयसम्राट पूजनीय अशोकजी सिंघल .ज्यांनी आजन्म अविवाहित राहत १९९६ ते २०१५ तब्बल वीस वर्षे विश्व हिंदु परिषदेचे आतंराष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन यशस्वीपणे धुरा संभाळली.
रामजन्मभुमी आंदोलनाचे जननायक, भारतीय जनचेतनेला हिंदुत्वाच्या दिग्विजयी विचारांनी उभारी देणाऱ्या अशोकजींचा जन्म १५ सप्टेंबर १९२६ साली आग्रा येथे झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरदार होते.
१९४२ साली पुजनिय रज्जुभैया यांच्या संपर्कातून इयत्ता ९ वीच्या वर्गात असताना रा.स्व.संघाच्या संपर्कात आले. त्यानंतर बनारस हिंदु विश्वविद्यालयामधुन "धातुकर्मशास्त्र" या विषयातुन आपल अभियांत्रिकीच शिक्षण पुर्ण केल. शिक्षण पुर्ण होताच नोकरी हा पर्याय न निवडता ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणुन बाहेर पडले. उत्तर प्रदेश, दिल्ली व हरियाणा अश्या विविध क्षेत्रात प्रचारक म्हणून संघ कार्यात वाहुन घेतलं .
१९७५ - १९७७ देशात इंदिराप्रणित आणिबाणीच्या काळात रा.स्व.संघावर बंदी लादण्यात आली होती, या अमानुष आणिबाणीविरोधात संघर्ष करत लोकमन जागृत करण्याच कार्यही अशोकजींनी मोठ्या हिमतीने केले. १९८१ साली डाॅ.कर्णसिंह यांच्या नेतृत्वाखाली विराट हिंदु सम्मेलनाच आयोजन करण्यात आले होते त्यामागे अशोकजी व रा.स्व.संघ यांचच नियोजन होत. या विराट हिंदु सम्मेलनानंतर अशोकजी पुर्णपणे विश्व हिंदु परिषदेच्या कार्यात उतरले.
त्यानंतर परिषदेत सेवा, धर्मजागरण, संस्कृत, गोसेवा व परावर्तन म्हणजेच घरवापसी इ. आयामांचा समावेश झाला. यामधे सर्वात महत्वपुर्ण असं आंदोलन म्हणजे श्री रामजन्मभुमी आंदोलन . यामुळेच परिषदेच कार्य गावागावापर्यंत पोहचलं , देशाच्या सामाजिक व राजकारणाची दिशाच श्रीरामजन्मभुमी आंदोलनाने बदलुन टाकली.
१९८४ साली दिल्ली येथील विज्ञान भवनात धर्म संसदेच आयोजन करण्यात आले होते, अशोकजीं या अयोजनाचे प्रमुख होते आणि याच धर्म संसदेत अयोध्यामुक्ती अंदोलनाची दिशा ठरवली गेली होती. येथुनच अशोकजींनी पुर्ण योजना बनवत कारसेवकांना आपल्यासोबत जोडण्याच्या पवित्र कार्याला सुरवात केली होती. प्रथम टप्प्यात देशभरातून ५० हजार कारसेवकांना जोडून देशातील प्रमुख नद्यांच्या तीरावर आरती करत राममंदिर निर्माणाची प्रतिज्ञा घेतली व पुढे दुसर्या कारसेवेत म्हणजेच १९९२ साली पूजनीय अशोकजींच्या नेतृत्वाखाली बाबरी ढांचा उध्वस्त करत रामजन्मभुमीचा श्वास मोकळा करण्याच्या कार्याची पूर्तता झाली.
आपल्या एका मुलाखतीत अयोध्यामुक्ती अंदोलनाविषयी बोलतानी अशोकजींनी पुढीलप्रमाणे भाष्य केल होत........
"अयोध्या में राम मंदिर बनाने के लिये हमने अपना सब कुछ समर्पित कर दिया। रही बात मस्जिद तोड़ने की तो हम मस्जिद तोड़ने के मकसद से नहीं गये थे। उस दिन जो कुछ भी हुआ वह मंदिर के पुनरनिर्माण कार्य का एक हिस्सा था।"
मिनाक्षीपुरम येथील सामुहिक धर्मांतराने उच्चशिक्षित अशोकजींच्या संपुर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकली. या एकाच विक्षिप्त घटनेने त्यांच्या आत्म्याला साद घातली आणि संघकार्यात अशोकजींसारखा अलौकिक व प्रतिभासंपन्न व्यक्ती कायमचा जोडला गेला. अशोकजींना संगीताचाही विशेष छंद होता.
भारतच नव्हे तर जगभरात पूजनीय अशोकजींच्या व्यक्तीत्वाचा प्रभाव होता व आजही आहे. श्रीरामजन्मभुमी आज मुक्त झाली, याची देही याची डोळा आयोध्येच्या रामाची मुक्तता बघण्याच आपल्याला जे भाग्य लाभले ते फक्त पूजनीय अशोकजींच्या पराक्रमी कर्तृत्वामुळेच !
१७ नोव्हेंबर २०१५ साली फुफ्फुसाच्या संसर्गजन्य आजारामुळे या देवदुर्लभ व्यक्तीत्वाची प्राणज्योत मावळली. आज त्यांची पुण्यतिथी. सर्वशक्तिमान प्रभु श्रीरामचंद्र भगवान चरणी प्रार्थना करून पूजनीय अशोकजींच्या पुण्य पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन.
- आप्पासाहेब पारधे
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या