दिनांक 1 जानेवारी 1890 या दिवशी सावरकरांनी नाशिकला' मित्रमेळा' नावाची प्रकट संस्था स्थापन केली .सन 1899 च्या अखेरीस सावरकर व त्यांचे सुरुवातीचे सहकारी म्हसकर आणि पागे यांनी राष्ट्रभक्तसमूह नावाची गुप्त क्रांतिकारक संस्था स्थापन केली. मार्च 1910 मध्ये पॅरिसहून लंडनला पोहोचताच सावरकरांना अटक झाली. म्हणजे सावरकरांचा प्रत्यक्ष क्रांतिकार्याचा कालखंड 20 वर्षांचा आहे.
बालवयात जागृत झालेली स्वातंत्र्यनिष्ठा व देशभक्ती क्रांतिकारक सावरकर यांचे एक वैशिष्ट्य,' राजा परकी ,शिक्षण परकी लक्ष्मीही झाली परकी' ,असा चरण वयाच्या चौदाव्या वर्षी रचलेल्या त्यांच्या गणेश उत्सवा वरील आर्येत आहे.
भारतातील क्रांतिकारक चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे हे सावरकरांचे एक प्रमुख कार्य आहे. आयरिश, रशियन, इजिप्तमधील क्रांतीकारकांशी सावरकरांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा संपर्क असे .'तलवार', 'गॅलिक अमेरिकन', इत्यादी वृत्तपत्रांतून लेखन करून सावरकरांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगला. धिंग्रा प्रकरण, मार्सेलिसची उडी यांचाही उपयोग करून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला .जर्मन ,फ्रेंच, इटालियन आणि पोर्तुगीज भाषात आपल्या लेखांचा अनुवाद करून घेऊन सावरकर ते प्रसिद्ध करत असत.
1857च्या उठावाच्या इतिहासाला स्वातंत्र्यसमर असे त्यांनी म्हटले, स्वतंत्र्या करता केलेला सशस्त्र प्रयत्न मग तो काही प्रांतात झालेला असो, काही थोड्या लोकांनी केलेला असो, स्वातंत्र्ययुद्धच असते, ते बंड नसते, हा सिद्धांत समर्थ पणे मांडून सावरकरांनी बंड या कल्पने विरुद्धच बंड उभारले. सावरकरांनी वैचारिक जागृती केली म्हणून तर आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्य सेना म्हणण्यात आले बंडखोर सैन्य म्हणण्यात आले नाही.
' 1857 च्या स्वातंत्र्य समराच्या', मुद्रणाचा प्रयत्न जर्मनी, हॉलंड मध्ये करणे. इंग्रजांचा गुप्तहेर फोडणे व त्याच्या मार्फत आपल्या सोयीच्या बातम्या दिल्या जातील अशी व्यवस्था करणे, धिंग्रा यांचे गुप्त पत्र पत्रक प्रसिद्ध करणे, ब्रिस्टन तुरुंग व मार्सेलिस इथून सुटकेचा प्रयत्न करणे, इत्यादीत सावरकरांच्या अंगचा चाणाक्षपणा, योजकता बुद्धी स्पष्ट होते.
मराठ्यांनी टिपू सुलतान चा पूर्ण पराभव केल्यानंतर च्या काळात भारतात मराठ्यांचा हात धरू शकणारी एकही मुस्लिम राजसत्ता अस्तित्वात नव्हती .अशा काळात टिपूच्या जिंकलेल्या राज्यात अस्तित्वात असलेल्या मुस्लीम धर्म सत्तेला उखडून टाकण्याची एक सुवर्णसंधी होती आणि ती मुस्लिम धर्म सत्ता कशी संपवता आली असती ,याची एक सविस्तर योजना सावरकरांनी त्यांच्या,' सहा सोनेरी पाने', या ग्रंथात मांडली आहे. एका राज्यातील मुस्लिम धर्म सत्तेचा पूर्ण पराभव व बळाने मुस्लिम झालेल्या सर्व हिंदू स्त्री पुरुषांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेतले, याचा परिणाम संपूर्ण भारतात झाला असता व भारतातील मुस्लिम समस्या कायमची संपली असती, असा एक क्रांतिकारी विचार सावरकरांनी मांडला आहे. आणि सदर योजना केवळ कल्पना विस्तारच नाही हे सिद्ध करण्यासाठी काही देशांची यादी दिली आहे. त्या देशांनी तेथील मुस्लिम राजसत्ता संपताच तेथील मुस्लिम धर्म सत्ता सुद्धा संपवली व म्हणून ते देश आज आपण ख्रिश्चन देश म्हणून बघू शकतो व उदाहरण दाखल स्पेन मधील झालेल्या घटनाक्रमाचे सविस्तर वर्णन केले आहे.(संदर्भ -परिच्छेद 578 ते 598)
धिंग्रा यांच्या कृतीचा निषेध करणाऱ्या कॅक्स्टन हॉलमधील राजनिष्ठांच्या सभेत जाऊन आपले मत निर्भयपणे मांडून सावरकरांनी आपल्या अंगचा धैर्याचा प्रत्यय दिला, मार्सेलिस येथे सागरात टाकलेल्या उडीने ते साहसात ही उणे नव्हते हे स्पष्ट झाले ,त्यांना झालेली दोन जन्मठेपेची शिक्षा ही फाशीच्या शिक्षा पेक्षा ही एका अर्थाने अधिक भयानक होती.
@निलेश खांडवेकर, भुसावळ.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या