हिंदुस्थान हे हिंदूंचे घर आहे आणि ते सांभाळण्याची जबाबदारी आम्हा हिंदूंचीच आहे - पू. डॉ. हेडगेवार
"आम्हाला आमचे घर सांभाळायचे आहे व स्वतःचे घर सांभाळणे हे प्रत्येक व्यक्तीचे न्याय्य कर्तव्य आहे. पण परमेश्वराने आपणा हिंदूंना हा हिंदुस्तान देश दिलेला आहे. हिंदुस्तान हे हिंदूंचे घर आहे आणि हे घर सांभाळण्याचे कार्य आपणा हिंदुंचेच आहे. जगातील प्रत्येक राष्ट्र व जाती संघटित होऊन ऊन सुरक्षित आहेत. त्याच प्रमाणे आपणही सुरक्षित राहावे हीच आमची इच्छा आहे.
आम्हाला इतर देशाचा अभिलाष नाही. फक्त आपणाला आपल्याच घरात मनुष्य म्हणून राहता यावे, एवढीच आमची इच्छा आहे. अन्य देशातील लोकांनी पाहिजे तर आमच्या हिंदुस्थानात खुशाल रहावे. त्याला आमची मनाई नाही. पण, त्यांना आम्हा हिंदू लोकांवर कुरघोडी करता येऊ नये इतकी आमची हिंदू जाती संघटीत व समर्थ असावयास हवी. हे सामर्थ्य आम्ही हीन-दीन दुर्बल आहोत, आमचे संरक्षण कर... वगैरे प्रकारे देवाची करुणा भाकून येणार नाही.
सर्व जाती प्रमाणे परमेश्वराने हिंदूंनाही मेंदू व शरीर दिले आहे. त्याचा उपयोग करून स्वसंरक्षणक्षम बनणे हे आपले कर्तव्य आहे. इतरांनी संघटन करून स्वसंरक्षण करावे व आम्ही मात्र स्वसंरक्षणाचा भाग परमेश्वरावर टाकून इतरांच्या दृष्टीने अजागळ व बावळट ठरावे, हे आम्हाला शोभत नाही. म्हणून अखिल हिंदुस्तानातील हिंदूंना संघटित करून समर्थ बनवण्याचे कार्य संघाने आपल्या शिरावर घेतलेले आहे."
रा. स्व. संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी हा मौलिक विचार गुरुपौर्णिमा उत्सवात धंतोली येथील संघस्थानी दि. २१ जुलै १९३५ रोजी मांडला आहे. हा विचार आजही आपणाला आपल्या ध्येयाप्रत मार्गदर्शक ठरतो.
॥भारत माता की जय॥
संदर्भ - #युगप्रवर्तक_डॉ_हेडगेवार , सांस्कृतिक वार्तापत्र
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या