भारताचे प्राचीन विज्ञान व संशोधन



जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेली आपली हिंदू संस्कृती केवळ कर्मकांडावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ आहे असे विविध घटना व उदाहरणातून आपल्या लक्षात येते. आपली परंपरा विज्ञाननिष्ठ असल्याचे कित्येक उदाहरणे आजही अस्तित्वात आहेत. हिंदू साहित्यात असलेल्या किंवा पुराणात वर्णिलेल्या शस्त्र-अस्त्र या गोष्टी केवळ कपोकल्पित नसून त्या सुद्धा अस्तित्वात होत्या, असे मानायला जागा आहे. 


गणित ,धातू ,वास्तू, विज्ञान व आरोग्य अशा ३२ विद्या आणि ६४ कला असलेला महाप्रचंड विज्ञाननिष्ट वारसा आपल्या भारताला लाभलेला आहे. ह्या ज्ञानापासून आपण काळाच्या ओघात दूर झालो किंवा मुद्दाम आपल्याला दूर ठेवले गेले. त्याचे पातक इंग्लंडच्या मेकॉलेला जाते. मेकॉलेने आपली शिक्षण पद्धती बदलून साम्राज्य व धर्म विस्तारासाठी भारतीयांना त्यांच्या वैभवशाली इतिहासापासून दूर केले आणि पाश्चात्य देशातच काय ती आधुनिकता व विद्वत्ता असल्याचे भारतीयांवर थोपवले.


जगाला अंकशास्त्रही भारताने शिकवले. 'लोकर' व 'कापूस' ही देण सुद्धा भारताची आहे‌. आज वाहनात बॅटरीचे फार मोठे योगदान आहे. या विद्युतघटा विषयी सुद्धा आपल्या प्राचीन साहित्यात नोंदी मिळतात.
आपल्या अगस्त्य ऋषींनी "अगस्त्य संहिता"मध्ये विद्युत घटाचे कसे निर्माण करावे याचे सविस्तर वर्णन केले आहे. महर्षी कणादांनी आपल्या "वैशेषीक दर्शन" ह्या ग्रंथात कर्म अर्थात गतीचे पाच प्रकार आधीच सांगितले आहे. याच गतीच्या साम्य असलेले गतीचे प्रकार नंतर न्यूटनने वेगळ्या स्वरूपात मांडले आहेत. जलविद्युत कशी तयार करावी ह्याचे सविस्तर वर्णन "समरांगण सूत्रधार" या ग्रंथाच्या ३१ अध्यायात लिहिले आहे. महर्षी भारद्वाज रचित 'विमान शास्त्र' हा ग्रंथ अनेक यंत्र तयार करण्यासोबत विमान कसे तयार करावे याचीही माहिती देतो .


महर्षी भारद्वाज यांनी विमान निर्मिती शास्त्राच्या 500 गाईडलाईन्स दिल्या आहेत. 'रूकमा' आणि 'शकुन' ही दोन प्रारूपे त्यांनी मांडली होती.  "समरांगण सूत्रधार" ग्रंथाचे रचिते राजा भोज आहेत व त्यांनी आपल्या ग्रंथाचा ३१ वा अध्याय तर आजच्या आधुनिक विज्ञानालाही लाजवेल असा रचला आहे. महर्षी चरक , महर्षी सुश्रुत व महर्षी नागार्जुन यांनी सोने , चांदी , तांबे , लोह , अभ्रक व पारा इत्यादी धातूंचा औषध निर्मितीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे आपल्या ग्रंथामध्ये लिहिले आहे. त्यामुळे महर्षी अगस्त , आर्यभट्ट, महर्षी कणाद , राजा भोज, महर्षी भारद्वाज , महर्षी चरक , महर्षी सुश्रुत व महर्षी नागार्जुन हे तर त्या त्या काळातील शास्त्रज्ञ, संशोधक व तज्ञ डॉक्टर्स आहेत असेच म्हणावे लागेल. 

म्हणजे आपले ऋषीमुनी हे केवळ कर्मकांडात अडकलेले नाहीत. म्हणून आपला हिंदू धर्म हा अंधश्रद्धेवर, कर्मकांडावर व मूर्ती पूजेवर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ आहे. शास्त्राधारीत आहे. आपल्या शास्त्र, संशोधन व ज्ञानाचा उपयोग त्यांनी मानव कल्याणासाठी केला. त्यामध्ये स्पर्धा, व्यासायिकता, आत्मकेंद्रित मानसिकता नव्हती. जो मानव कल्याण करू शकतो त्यालाच या विद्या शिकवल्या जात, हे आपण रामायण व महाभारत मधूनही पाहिले आहे. विज्ञानाचे विविध ग्रंथ, प्रयोग, उपयोग सांगणाऱ्या पंक्तीत प्राचीन भारत सुद्धा आहेच, हे विसरून चालणार नाही.

संदर्भ:-भारताची उज्वल विज्ञान परंपरा, लेखक - सूरेश सोनी

लेखन - राजेंद्र जैस्वाल, नांदेड 

>> विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Indian truth