शहरी नक्षलवादी नावे बदलून तरुणांचे करत होते ब्रेनवॉश; न्यायालयाने ठोठावली सक्तमजुरीची शिक्षा


अनेक नावांनी शहरात सक्रिय असलेला माओवादी अरूण भेलके दोषी, ०८ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य अरुण भेलके याला न्यायालयाने काल दिनांक १४ डिसेंबर रोजी आठ वर्ष सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.

मुळ चंद्रपूर चा असलेला अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन यांना महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून येथून २०१४ मध्ये अटक केली होती. दोघांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाल (युएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. भेलके हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तर कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रूग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. 

अरुण भेलके हा माओवादी पक्षाचा सक्रिय केडर होता. पुणे, मुंबईत काम करून तरुणांना नक्षल चळवळीत भरती करण्यासाठी हा शहरी भागात कार्यरत होता. पुण्यातील झोपडपट्टी भागातील तरुणांना माओवादी चळवळीत भरती करण्याचा प्रयत्नात असताना या दोघांना यांना अटक केली होती. 

अरूण भेलके आणि कांचन हे दोघे प्रतिबंधित माओवादी पक्षाच्या "गोल्डन कॉरिडॉर कमिटी" चे सदस्य ही होते. हे अगोदर जंगलात सक्रिय होते. माओवादी पक्षाच्या धोरण व योजनेनुसार हे शहरी भागात विविध नावाने काम वाढवणे तसेच विविध संघटनांच्या मध्ये शिरकाव करून तरुणांमध्ये सरकारी व्यवस्थेच्या विरोधात असंतोष निर्माण करणे तसेच नक्षल चळवळीत भरती करणे चे काम भेलके व त्याची पत्नी करत होते.

अबब!एवढी खोटी नावे?

तपासात समोर आले कि दोघे मुंबई, रायगड, पुणे परिसर वेगवेगळ्या नावाने राहायचे. अरुण व कांचनने खालापूर, रायगड येथे भाड्याने खोली घेतली त्यावेळी करारनामा करताना त्यावर स्वतःचे नाव आकाश नारायण भगत आणि  शीतल आकाश भगत असे सांगून सही केली. सदर करारनामा पोलिसांनी जप्त केला आहे. कांचन आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना स्वतःचे नाव शीतल भगत सांगायची. कांचनचा फोटो मात्र नाव शीतल भगत असे हॉस्पिटल पेशंट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. (कांचनचा जानेवारी महिन्यात आजारपणामुळे मृत्यू झाला)

अरुणने आदित्य सुरेश पाटील नावाने आधार कार्डही मिळवले ज्यावर फोटो मात्र त्याचाच होता व पत्ता गोवंडी येथील तत्कालीन नगरसेवकाच्या ऑफिसचा होता.  पोलिसांनी हे आधार कार्ड जप्त केले आहे. कांचनकडे सोनाली पाटील नावाचे पॅन कार्ड होते ज्यावर तिचा स्वतःचा फोटो होता. पोलिसांनी हे पॅन कार्ड जप्त केले आहे. याशिवाय अरुणने राजन, संजय कांबळे वगैरे नावेही धारण केली होती तर कांचनला माओवादी संघटनेत भूमी नाव दिले होते असे तपासात समोर आले.    

काही दिवसांपूर्वी शरणागत नक्षलवादी कृष्णाने न्यायालयात अरुण भेलकेला राजन म्हणून ओळखले व तो वरिष्ठ माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे यास भेटत असल्याची माहितीही दिली. अरुण व कांचन जंगलातीलसशस्त्र माओवादी केडर सोबतही काम करायचे, त्यांच्यावर यासंबंधी पूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत . अरुण खोट्या नावाने पुण्यातील कासेवाडी भागातील तरुणांच्या संपर्कात होते व त्यांना ब्रेनवाश करून नक्षल दलम मध्ये भरती करण्याच्या प्रयत्न होता, असे तपासात समोर आले. समजाने अशा संशयास्पद लोकांपासून सावध राहून शहरी माओवादाचे भयाण वास्तव समजून घ्यायला हवे. 

या संविधान विरोधी माओवाद्यांना शिक्षा लागणे अतिशय स्वागतार्ह आहे. या कामी कष्ट घेतलेल्या सुरक्षा यत्रणांतील सर्वांचे अभिनंदन.

 

✍️ सागर शिंदे (विवेक विचार मंच)

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या