शिकलगार समाजाच्या मुलांवर झालेला हल्ला पूर्व नियोजित; भटके विमुक्त विकास परिषदेकडून सखोल चौकशीची मागणी
परभणी | परभणी शहरातील शिकलगार समाजातील तीन अल्पवयीन मुलं सकाळी फोन आला म्हणून वराह पकडण्यासाठी उखळद या गावी गेले. वराह न मिळाल्यामुळे ते परत परभणी या दिशेतून येत होते. त्यावेळी गावातील काही विशिष्ट समाजातील माणसांनी तिघे मुलांना बाईकवरून अडवले व आमच्या गावामध्ये का आले? त्याचवेळी गावातील धार्मिक स्थळाच्या लाऊडस्पीकरवरून अनाउन्सिंग केली की आपल्या गावात चोर आले आहेत. म्हणून गावात सगळेजण एकत्र झाले आणि तीन अल्पवयीन मुलांना चोर चोर म्हणून मारहाण करण्यात आली. 27 मे रोजी या घटनेत एक अल्पवयीन मुलगा किरपाल सिंग भोंड याचा मृत्यू झाला तर गोरसिंग दुधानी व अरुणसिंग टाक गंभीर जखमी झाले आहेत.
पीडित मुले शिकलगार समाजातील असून त्यांचा वराह पालन करणे व ते वराह पकडून विकणे हा प्रमुख त्यांचा व्यवसाय आहे. आमच्या गावामध्ये सतत वराहाचा त्रास होतो आहे, आमच्या समाजाला वराह चालत नाही. म्हणून वराह द्वेष म्हणून त्यांना मारण्यात आलं. शीख समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर शीख समाजामध्ये पवित्र असणारे पगडी काढून त्यांचे केस धरून गावामध्ये फिरवून मारण्यात आलं. या मारहाणीत एका जणाचा तर जागीच मृत्यू झाला. तो खरच मरण पावला आहे की नाही हे पाहण्यासाठी म्हणून त्याच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकले, तसेच त्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकण्यात आली. घटनास्थळी अक्रम पटेल म्हणून तिथला माजी सरपंच सांगत होता की यांना “मारून टाका बाकी सगळं मी बघतो” अशी माहिती भटके विमुक्त विकास परिषदेने पीडित मुलांच्या पालकांना भेटल्यानंतर सांगितली.
या प्रकरणी सध्या सय्यद एजाज सय्यद इब्राहिम, सय्यद अकरम सय्यद अगामिया, सय्यद तोहिद सय्यद संमदर, सय्यद फजलू सय्यद अली, शेख जावेद शेख पिरमिया, पाशा खान उर्फ बाबाखान पि. अफजल खान या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्या हल्ल्याचा निषेध म्हणून भटके विमुक्त विकास परिषदेने स्वतः जाऊन पीडित मुलांच्या आई-वडिलांशी चर्चा केली असता त्यांच्या घरच्यांनी ही सगळी व्यथा सांगितली. भटके विमुक्त विकास परिषद त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. भटके विमुक्त विकास परिषदेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अल्पसंख्यांक आयोग यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची व पीडित मुलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
या जातीय व अमानवी घटनेच्या विरोधात राज्यभरात भटके विमुक्त विकास परिषद या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे. तसेच प्रत्येक जिल्हा कार्यालय तहसील कार्यालय एसपी ऑफिस आणि तालुका ठिकाणाचे पोलीस स्टेशन मध्ये सध्या निवेदन देणे सुरू आहे. ही घटना अफवेमुळे झाली नसून त्या मुलांना जाणीवपूर्वक पूर्व नियोजित कट आखून मारण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भटके विमुक्त विकास परिषद राज्यभर करत आहे.
भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे नर्सिंग झरे प्रांत कार्यवाह, गोविंद भंडे जिल्हा संयोजक, शरद दिवे विभाग समन्वयक यांनी पीडितांच्या घरच्याशी चर्चा केली व भटके विमुक्त विकास परिषद या सगळ्या प्रकरणाचे पाठपुरावा सध्या करत आहे.
- शरद दिवे, समन्वयक
भटके विमुक्त विकास परिषद
मो. 82750 20460
0 टिप्पण्या