कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी निर्देशांचे पालन करीत संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा रद्द

बंगळुरू। रा. स्व. संघाची दरवर्षी होणारी सर्वात महत्वाची बैठक म्हणजेच अखिल भारतीय प्रतिनिधी सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या सुरक्षात्मक निर्देशांचे पालन करीत संघाने हा निर्णय घेतला असून रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.


येत्या १५ ते १७ मार्च दरम्यान बंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत विशेष मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली होती. सभा होणाऱ्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वस्तूची स्क्रिनिंग टेस्ट व व्यापक स्वच्छता संबंधी खात्री केली जात होती. परंतु, ट्विटर च्या माध्यमातून रा. स्व. संघाच्या अधिकृत अकाऊंटवरून ही प्रतिनिधी सभा रद्द होत असल्याचे स्पष्ट केले. सर्व स्वयंसेवकांनी जनजागृतीचे कार्य हाती घेऊन शासन व प्रशासनास कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही भय्याजी जोशी यांनी केले आहे. 


संघाच्या या सभेमध्ये मागील वर्षभराच्या कार्यासह आगामी वर्षभराच्या कामाचे नियोजन करण्यात येते. यासोबतच विविध प्रांत व विभागातून आलेले प्रतिनिधी आपणास आलेले अनुभव व कार्यवृत्तांत सादर करतात. येथे उपस्थित कार्यकारी मंडळात प्रांत व क्षेत्र स्तरावरील मा. संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकर्ता उपस्थित असतात. या बैठकीत आगामी वर्षातील संघ शिक्षा वर्ग व अन्य कार्यक्रमाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या