बीड। रा. स्व. संघातर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

बीड। आज दि. १३ मे, बुधवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बीड जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना आपदा काळात रक्तदात्यांच्या संख्येत घट झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील अनेकांनी यावेळी राकडं केल्याचे दिसून आले.

बीड जिल्हा रुग्णालयात रक्तदान करताना स्वयंसेवक

सध्याची लॉकडाऊन स्थिती लक्षात घेऊन हिमोफिलिया, हृदयरोग, शस्त्रक्रिया आदी कारणांसाठी रक्ताची मागणी दवाखान्यातून होत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून बीड शहरातील संघ स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या दरम्यान शारीरिक अंतर पाळले जाईल याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली. यासाठी शहरातील रक्तदात्यांशी संपर्क करून त्यांची दिवसभरातील एक वेळ निश्चित करून त्या वेळेस त्यांना रक्तदान करण्यासाठी बोलावण्यात आले. आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

या रक्तदान शिबिरात बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनीही भेट दिली.
संघ स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदानात मध्ये सहभाग घेतला.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

-----------------------------------------
Like & Follow us..

क्लिक करा 👉  Facebook
क्लिक करा 👉  Instagram
क्लिक करा 👉  Twitter
क्लिक करा 👉  YouTube

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या