अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीसाठी संघ धावला मदतीला

संभाजीनगर। देशभरात लॉकडाऊन मुळे अनेक परिवार आपल्या कुटुंबीयांपासून दूर कुठेतरी अडकलेले आपण पाहत आहोत. आपल्या गावाकडे जाण्याची लागलेली ओढ त्यांना पायपीट करण्यासाठी रोखू शकलेली नाही. परदेशात गेलेल्या अश्याच काही भारतीय बांधवांना लॉकडाऊनमुळे आहे तिथेच स्थानबद्ध व्हावे लागले. यातीलच एक उदाहरण म्हणजे रीदिमा. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली रीदिमा आपल्या रुम्वरील अन्न, किराणा संपल्यामुळे मोठ्या संकटात सापडली होती. भारतात परत येणारे द्वार तिच्यासाठी बंद झाले झाले होते. अश्या परिस्थितीत रीदिमा व तिच्या मैत्रिणींना हिंदू स्वयंसेवक संघाची मोठी मदत झाली आहे. 


रीदिमा अमेरिकेत मागील तीन वर्षापासून शिक्षण घेत आहे. भारतात व अमेरिकेत लॉकडाऊन सुरु करण्यात आला. आपल्या रूमवर असलेले अन्न  सामग्री काही दिवस रीदिमा व तिच्या मैत्रिणींना उपयोगी पडली. परंतु, रुमवरील सर्व अन्न संपल्यामुळे मात्र त्यांची पंचाईत झाली. इकडे भारतात त्यांचे कुटुंबीय चिंतामग्न झाले होते.  अश्यावेळी रीदिमाने भारतीय दूतावास येथे संपर्क साधला. परंतु, ते तत्काळ मदत करू शकले नाहीत. परंतु, त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असलेल्या अमित देसाई यांच्याशी संपर्क करण्याचे सांगितले. रीदिमाने लगेच अमित देसाई यांच्याशी संपर्क केला व त्यांनी आपणास लवकरात लवकर मदत केली जाईल असे आश्वासित केले व रीदिमाच्या भारतातील कुटुंबियांनाहि फोन कॉल करून त्यांनी आश्वस्त केले. रीदिमाला व तिच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना हिंदू स्वयंसेवक संघातर्फे मदत करण्यात येत असल्याचे यावेळी रीदिमाने सांगितले. 

डॉ. अमित देसाई म्हणाले, की लॉकडाऊन लागल्यापासून आमचे लक्ष्य सेवाकार्यावर केंद्रित केले असून येथील भारतीय व अभारतीय सर्व गरजूंना जास्तीतजास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नरसेवा हीच नारायण सेवा असून संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे आपले कर्तव्य असुन ती व्यक्तीच आपल्यासाठी ईश्वर आहे. हीच आपली संस्कृती असून  भारतीय परंपरा आपल्याला हेच शिकवते असे त्यांनी सांगितले. भारतातून शिक्षण, व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने आलेले भारतीय बांधव येथे लॉकडाऊन असल्यामुळे अडकले आहेत. त्यांनी उपाशी राहु नये यासाठी आम्ही हर तर्हेने त्यांची मदत करत असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. 

    डॉ. अमित देसाई, हिंदू स्वयंसेवक संघ, USA

रा. स्व. संघाचे भारतातही महा-सेवाकार्य :
भारतातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय व्यापक स्तरावर सेवाकार्य चालविले आहे. या अंतर्गत देशभरात २ मे पर्यंत ६७ हजार ३३६ स्थानी ५० लाख ४८ हजाराहून अधिक परिवारांना संघ स्वयंसेवकांनी मदत पोहचवली आहे. या कार्यात तब्बल ३ लाख ४२ हजारहून अधिक संघ कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. संघाचे हे सेवाकार्य अमेरिका, जपान, इंग्लंड, युके, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, नायजेरिया, केनिया, युगांडा आदी देशातही सुरू आहे. जगातील ५३ देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम चालते.

- विश्व संवाद केंद्र, देवगिर

सौजन्य : HSS USA SR Times
-----------------------------------------------------------
Like & Follow us..

Click 👉   Facebook
Click 👉   Instagram
Click 👉   Twitter
Click 👉   YouTube
---------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या