सेवा स्टॉलच्या माध्यमातून जळगावात दररोज हजारो प्रवासी, वाटसरूंची होतेय सेवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव जिल्हा तर्फे कोरोना आपदा सेवाकार्य अंतर्गत विविध सेवाकार्य अविरतपणे सुरू असून पायी घराकडे निघालेल्या बांधवाना मदत व्हावी म्हणून संघ स्वयंसेवकांनी शहरातील शिव कॉलोनी येथे सेवा स्टॉल उभा केला आहे. या स्टॉलवर या परप्रांतीय मजूर तसेच पायी घराकडे निघालेल्या सर्व बांधवाना नाश्ता, शिदोरी ची व्यवस्था केली आहे.


११ मे पासून शिव कॉलनी स्टॉप येथे परप्रांतीय मजुर बंधु-बघीनींच्या सेवेकरिता रा. स्व. संघतर्फे हा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पायी जाणाऱ्या १५ मजुरांना रात्री निवास व सकाळी नाश्ता करून बस स्थानकावर स्वयंसेवकांनी नेऊन सोडले. दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी -  ३०० फूड पॅकेट्स व पिण्याचे पाणी वितरित केले. १३ मे रोजी १५०० फूड पॅकेट्स व पिण्याचे थंड व शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. दररोज अनेक वाटसरू प्रवासी या सेवाकार्यामुळे लाभ घेत आहेत.


प्रवास करणार्यापैकी खूप लोक ट्रक वगैरे वाहनांच्या माध्यमातून घराकडे निघालेले आहेत. तेसुद्धा आपापल्या गाड्या, वाहने या ठिकाणी थांबवून आपली भूक भागवत आहेत. लिंबू सरबतची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलं8 आहे. १४ मे रोजी २५०० फूड पॅकेट्स, पिण्याचे थंड पाणी तसेच लिंबू सरबत वाटप करण्यात आले. तर काल १५ में रोजी २७०० जणांना खिचडी, ६ हजार जणांना लिंबू पाणी, तर २० हजार ग्लास पाणी वाटप करून सेवा दिली आहे.


चपला बुटांची ही केली सोय

स्वयंसेवकांनी मजुरांसाठी चांगल्या चपला बूट देण्याकरिता नागरिकांना आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत नागरिक बांधवांनी आपल्या पायाचे जोडे काढून गरजूंना उपलब्ध करून दिले. महिला व बालकांनीही यात सहभागी होत आपले बूट, चप्पल संघ स्वयंसेवकांकडे स्वच्छ करून सुपूर्द केले. तर काही दात्यांनी नवीन जोडे, चपला स्वयंसेवकांना नेऊन दिल्या. 


स्टॉलवर येणाऱ्या लोकांची जनजागृती

या सेवाकार्यअंतर्गत उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या विविध प्रांतात जाणाऱ्या श्रमिक वर्गाने आपल्या स्टॉल वर मिळणाऱ्या सेवांचा लाभ घेतला. स्टॉल वर येणाऱ्या  प्रत्येक लाभार्थ्याला मास्क/ रुमाल लावणे कसे जरूर आहे ते सांगितले जात आहे. तसेच sanitizer ने हात स्वछ करून नंतर पाणी व फूड पॅकेट्स दिले जात आहेत. स्वयंसेवक सुद्धा मास्क, ग्लोव्हज तसेच क्लिनिकल गाऊन व टोपी वापरून स्वतःची पूर्ण काळजी घेऊन स्टॉल वर गरजूंना मदत करीत आहेत.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

------------------------------------------
Like & Follow us..

Click here 👉  Facebook
Click here 👉  Instagram
Click here 👉  Twitter
Click here 👉  YouTube

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या