@प्रशांत पोळ
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठा विचित्र योगायोग जुळून येत आहे. भारतातील कम्युनिस्ट पार्टी यावर्षी 17 ऑक्टोबरला आपल्या शंभर वर्ष पूर्ण होण्याची आनंदोत्सव साजरी करत आहे आणि तिकडे त्यांचा गुरु, प्रेरणास्त्रोत, त्यांचा मेंटर 'चीन' भारताला डोळे दाखवत आहे. भारतासोबत सीमा विवाद करत आहे.
या कम्युनिस्टांचे सगळे काही तसे विचित्र व दुर्लभ असते. ज्या पक्षाच्या नावात भारत आहे, याचे नामकरण भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे आहे, त्याची स्थापना झाली होती सोवियत रशियातील ताशकंद येथे. तेच ताशकंद जिथे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला होता. शक्यता आहे की ताशकंद आता सोवियत रशिया चा राहिलेला नसून ती उज्बेकिस्तान की राजधानी आहे.
मास्को येथे ऑगस्ट 1920 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे दुसरे अधिवेशन झाले होते. यामध्ये भारतातून सर्व प्रतिनिधी गेले होते. अधिवेशनाच्या दोन महिन्यानंतर 17 ऑक्टोबर 1920 ला ताशकंद येथे मानवेंद्रनाथ रॉय त्यांची पत्नी एलविन ट्रेंट, अबानी मुखर्जी, रोजा फिटिंगोव, मोहम्मद अली, मोहम्मद शरीफ आणि आचार्य, या सात सदस्यांनी मिळून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मोहम्मद शरीफ सचिव म्हणून निवडले गेले आणि आचार्य यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.
मानवेंद्रनाथ रॉय आणि त्यांच्या पत्नी एलविन ट्रेंट
विचित्र बाब बघा, विदेशात जन्मलेल्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आग्रह पक्षामध्ये कोणाला घेण्यासाठी होता, तर ते मुसलमानांना कार्यकर्ता म्हणून भरती करण्यासाठी जोर देत होते. सीपीआय(एम) च्या अधिकृत वेबसाईट वर लिहिले आहे, M.N. Roy, as the principal organiser of the party, was keen on and successfully recruited young ex-Muhajir students from India. Roy and Evelyn Roy-Trent, his wife and comrade at the time, played a key role in bringing Mohammad Shafiq, Mohammad Ali and other ex-Muhajirs into the fold of the nascent communist party.
मजेशीर बाब अजून आहे. भारताच्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केव्हा झाली यावर सर्व कॉम्रेड मध्ये मोठे मतभेद आहे. अनेक कम्युनिस्ट विशेषतः सीपीआयशी संबंधित कम्युनिस्टांचे असे मानणे आहे, की पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. या दिवशी शनिवार होता आणि कम्युनिस्ट पक्षाने आपले पहिले अधिवेशन भारतामध्ये कानपूर येथे आयोजित केले होते. या अधिवेशनात पक्षाची अधिकृत घोषणा झाली असे काही कम्युनिस्ट मानतात. यामध्ये मुंबईचे सच्चिदानंद विष्णू घाटे पक्षाचे सचिव निवडले गेले.
परंतु सीपीआय (एम) च्या अधिकृत संकेतस्थळावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 17 ऑक्टोबर 1920 या दिवशी झाली असे लिहिले आहे. म्हणून भारतामध्ये कम्युनिजम अर्थात साम्यवादाचे हे शंभरावे वर्ष सुरू आहे असे आपण मानू शकतो.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर येथील कम्युनिस्टांनी याला वास्तविक स्वातंत्र्य मानले नाही. कम्युनिझमच्या मते व्यवस्था परिवर्तन केवळ क्रांती मुळेच होऊ शकते आणि तीही 'रक्तरंजित क्रांती'. म्हणून भारतामध्ये तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात सशस्त्र विद्रोह करावा की नाही या विषयावर कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते. पक्षाची 'आंध्रा लाईन' सशस्त्र विद्रोह व्हावा या मताची होती तर 'रणदिवे लाईन' सशस्त्र विद्रोहाच्या विरोधी पक्षात होती.
विशेष बाब म्हणजे या विवादाला सोडवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते मास्को गेले होते. मास्कोच्या नेत्यांनी समजावल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीन दस्तऐवज प्रकाशित केले ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यला मान्यता दिली. अर्थात रशियाच्या सांगण्यावरून भारतीय कम्युनिस्टांनी भारताच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला चांगला फायदा झाला. त्यांचे भलेही 16 खासदार निवडून आले असले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशाचा पहिला विरोधी पक्ष बनला.
एक विशेष घटना केरळ मधली 1957च्या विधानसभा निवडणुकीत घडली. केरळमध्ये इ एम एस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाचे सरकार बनले. हे कम्युनिस्टांचे जगातील पहिलेच निवडून अलेले सरकार होते. या अगोदर अनेक देशात कम्युनिस्टांनी रक्तरंजित क्रांती द्वारा सत्ता काबीज केली होती. परंतु मात्र दोन वर्षात 1959 मध्ये पंतप्रधान नेहरू यांनी या सरकारला भंग करून टाकले. सरकार बरखास्त झाले. कम्युनिस्टांच्या समोर मोठा पेच उभा राहिला. निवडून आलेल्या सरकारला बरखास्त करणे लोकशाहीच्या विरोधी निर्णय होता. म्हणून येथील कम्युनिस्ट नेहरू सरकारचा मोठा विरोध करू लागले. परंतु, मॉस्को चे म्हणणे होते की साध्याच नेहरूंचा विरोध करू नये. त्यावेळी कम्युनिस्टांचा मुख्य गुरू रशियाला ओळ्खले जात. म्हणून पक्षाचे नेते लगेच मॉस्को पळाले. तेथे स्पष्ट आदेश मिळाला, 'एखादं राज्य गमावणे मोठी गोष्ट नाही. परंतु नेहरू आता कुठे आपल्या तावडीत सापडत आहे. आपले म्हणणे ऐकत आहे. आपले अनुकरण करत आहे. यासाठी नेहरू सरकारचे समर्थन करायचे आहे.
आदेश शेवटी आदेश असतो. आणि तोही आपल्या गुरूचा मास्को येथुन आलेला. त्यामुळे त्या आदेशाचे शब्दशः पालन केले गेले. केरळ ची कम्युनिस्ट सरकार बरखास्त करूनही भारतातील कम्युनिस्टांनी नेहरू सरकारचा विरोध केला नाही.
भारताच्या वर्तमान कम्युनिस्टांचा गुरु आणि रोल मॉडेल आजकाल चीन आहे. या अगोदर रशिया होता. त्यानंतर 1949 च्या चिनी क्रांतीनंतर रशिया आणि चीन दोघे होते. परंतु नव्वदच्या दशकात सोवियत रशियाचे विघटन झाल्यानंतर आणि चीनच्या आर्थिक शक्ती वाढण्यासोबत सध्या गुरूच्या भूमिकेत चीन आहे. कम्युनिस्ट पार्टीचे वेगवेगळ्या गटांच्या नावांमध्ये मार्क्स-लेनिन असूनही ते सर्व जण स्वतःला माओवादी म्हणवतात. चीन सुद्धा कम्युनिस्ट पार्टीच्या या वेगवेगळ्या गटांची मेंटरिंग करत असतो.
हा चीन कम्युनिस्ट होण्याअगोदर भारताचा शत्रू नव्हता. इतिहासात भारतीय राजांचा चीन सोबत सत्तासंघर्ष झालेला कुठेही आढळत नाही. चीनच्या राजांनी आक्रमकांपासून बचाव होण्यासाठी जगप्रसिद्ध चीनची भिंत बांधली, परंतु या आक्रमकांमध्ये भारतीय नव्हते. ते होते, आजचे उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, अझरबैजान, किर्गिस्तान येथील टोळधाड. ज्यांना आपण हूण असे संबोधतो. भारताने या हुणांचा बंदोबस्त केला होता. त्यांना परास्त केले होते. परंतु चीनने भली मोठी भिंत बांधूनही आपले रक्षण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
खूप कमी लोकांना हे माहिती असेल की चीनमधील बीजिंग शहराची स्थापना एका 'हिंदू' ने केली होती. त्या व्यक्तीचे नाव होते 'बलबाहू'. जो चीनमध्ये 'आर्निको' या नावाने प्रसिद्ध झाला. 12 व्या शतकाच्या मध्यात चीनचा राजा पाटण यांनी काही उत्कृष्ट मूर्तिकारांना चीनमध्ये भगवान बुद्ध आणि हिंदू देवतांच्या मुर्त्या निर्माण करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामध्ये बलबाहू होता. चीनचा राजा पाटण याला बलबाहू चे काम आवडले. त्याला राजमहल बनविण्या चे कार्य सोपवले आणि त्याची कला आणि कल्पकता बघून राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचेही काम दिले. शहर नुकतेच त्यावेळी वसत होते. बलबाहूनेच त्यावेळी उतरत्या छताची घरे निर्माण केली, जी आज आज चीन ची ओळख बनून राहिली आहे. चीनने एक मे 2002 या दिवशी बलबाहू म्हणजेच आर्निको याचा पुतळा बीजिंग शहरात एका चौकात स्थापन केला. ज्यामध्ये बीजिंग शहर रचनाबद्ध करण्यासाठी बलबाहू च्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला गेला आहे.
चीन बदलला तो कम्युनिस्ट झाल्यानंतर. 1 ऑक्टोबर 1949 रोजी माओ त्से तूंग ने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना केली. जो घोषित कम्युनिस्ट देश आहे. चीनमध्ये मध्ये एक मात्र राजकीय पक्ष आहे - सीसीपी, अर्थात चायनीज कम्युनिस्ट पार्टी. जवळपास सर्व देशांच्या सेनेचे नाव त्या देशाच्या नावावरून घेतलेले असते जसे की, भारतीय वायुदल, युनायटेड स्टेट्स आर्म फोर्सेस, फ्रेंच आर्मी इत्यादी. परंतु चीनच्या सेनेचे नाव आहे 'पीपल्स लिबरेशन आर्मी'. जी देशाप्रती नव्हे तर सीसीपी साठी बांधील आहे. 1 ऑक्टोबर 1949 च्या अगोदर रेड आर्मी या नावाने ती विख्यात होती.
सत्तेत येता बरोबर माओ त्से तुंग ने पहिल्याच दिवशी आपली विस्तारवादी नीती घोषित केली. त्या अंतर्गत चीनने तिबेटला सहज आपल्या घशात घातले. तिबेटच्या सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. याच विस्तारवादी नीती मुळे चिनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केले होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टी चाळीस वर्षाची झाली होती. या पार्टीने चिनी आक्रमणाचा विरोध केला नव्हता. उलट भारत सरकारवर असा आरोप लावला ही भारताचे चुकीचे धोरण या युद्धाला कारणीभूत ठरले. जेव्हा भारतात कम्युनिस्ट पक्षाने उघड उघड चीनचे समर्थन सुरु केले तेव्हा सरकारला आवश्यक ते पाऊल उचलणे भाग पडले व देशातील सर्व कम्युनिस्ट नेत्यांना चीन सोबत युद्ध सुरू असताना जेलमध्ये कैद करून ठेवावे लागले.
त्रिवेंद्रम येथील पुजापुरा जेलमध्ये अन्य वरिष्ठ कम्युनिस्ट नेत्यांसोबत व्ही. एस. अच्युतानंदन सुद्धा बंदिवान होते. त्यांना वाटले देशात कम्युनिस्ट पार्टीची प्रतिमा 'देशद्रोही' अशी बनत चालली आहे. याला बदलणे आवश्यक आहे. यासाठी यांनी जेलमध्ये भारतीय जवानांसाठी रक्तदान अभियान सुरु केले. परंतु ही गोष्ट अन्य कम्युनिस्ट नेत्यांना पसंत पडली नाही. त्यांनी हे अभियान बंद केले. नंतर युद्ध समाप्त झाले. हे सर्व नेते बंदी मुक्त झाले. परंतु अच्युतानंदन यांची तक्रार पॉलिट ब्युरो मध्ये करण्यात आली. भारतीय सेनेच्या समर्थनात अशा प्रकारचे अभियान चालवणे म्हणजे पक्षविरोधी आहे, त्यामुळे शिक्षा म्हणून अच्युतानंदन यांना पॉलिट ब्युरो मधून पाठवले गेले. ही वेगळी गोष्ट आहे की अनेक वर्षानंतर हेच अच्युतानंदन केरळचे मुख्यमंत्री बनले.
अमेरिकेच्या सीआयए ने 1962 च्या युद्धाविषयी गुप्त अहवाल तयार केला. त्याचा संदर्भ सोबत जोडत आहोत. यामध्ये सीआयए ने कम्युनिस्टांच्या चीन युद्धाच्यावेळी केलेल्या सर्व कारवायांची पोल-खोल केली आहे. सीआयए ने काही अतिरंजित लिहिले असेल असे मानून सुद्धा या कागदपत्रात कम्युनिस्टांनी ज्या कारवाया केल्या आहेत त्या महाभयंकर आहेत. त्यावेळी कम्युनिस्टांचा भारतीय सैन्यात विद्रोह करण्याचा डाव होता.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली. सोवियत रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीत आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टी मध्ये मतभेद अधिक वाढले त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट परेशान झाले. त्यांच्या दोन्ही गुरु मध्ये लढाई सुरू झाली होती. मग काय, विदेशी प्रेरणा आणि त्यांच्या साधनसंपत्तीवर पोसणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी मध्येही फूट पडली आणि 1964 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी स्थापन झाली. कम्युनिस्टांनी या देशाला कधीच आपले मानले नाही आणि देशाच्या देशाच्या सेनेला सुद्धा आपले समजले नाही.
चीनचा जेव्हाही विषय निघतो तेव्हा हा सच्चा कम्युनिस्ट विनम्र होतो. चीन सर्व कॉम्रेडचा आदर्श आहे. एक महत्वपूर्ण पुस्तक आहे, 'ब्लॅक बुक ऑन कम्युनिजम'. काही जुन्या कम्युनिस्टांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कम्युनिस्टांनी पूर्ण जगभरात किती दहशत माजवली, किती दमनकारी शोषण केले, कित्येक हत्या केल्या या सगळ्याचे प्रमाण सहीत विवरण केले आहे. यात दिलेल्या आकड्यांनुसार कम्युनिस्टांनी जगभरात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना मृत्यूच्या खाईत लोटले आहे. यामध्ये साडेसहा कोटी पेक्षा अधिक हत्या केल्या गेल्या आहेत. या एकट्या चीनने केले आहेत. जेव्हा असाच चीन भारतीय कम्युनिस्टांचा
आदर्श असेल, त्यांचा गुरु असेल, तर येथील कम्युनिस्ट सुद्धा या आतंकी तंत्रामध्ये किती माहीर असतील हे स्वाभाविक आहे. माओ त्से तुंगच्या नावाने येथील नक्षलवाद्यांनी ज्या रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत त्याची कल्पना करणेसुद्धा कठीण आहे. परंतु, राजकीय पक्षाच्या रुपात काम करणारी सीपीआय आणि सीपीआय (एम) च्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या हत्या केल्या आहेत. केरळचे वर्तमान मुख्यमंत्री पी. विजयन सुद्धा एका संघ स्वयंसेवकाच्या हत्येचे आरोपी होते आणि सहा महिने जेल जाऊन आले आहेत.
कम्युनिस्टांनी आपल्या गुरूच्या प्रति आपले प्रेम आणि आदर अनेक वेळा उघडपणे स्वीकार केले आहे. तीन वर्षाच्या अगोदर 2017 मध्ये जेव्हा डोकलाम मध्ये चीन ने प्रवेश केला होता तेव्हा भारतीय सेना त्याला मागे हटवण्यात लागली होती. तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमोक्रेसी ने लिहिले- "Doklam belongs to Bhutan. Let Bhutan resolve the problem by itself. We need not interfere in that issue. And the root cause of the problem is not Doklam but Modi Sarkar…”
"डोकलाम हा भूतानचा भाग आहे. त्यामुळे भुताने त्याची समस्या सोडवावी. भारताने त्यात लक्ष घालण्याची काही गरज नाही. या वादाचे कारण डोकलाम नसून मोदी सरकार आहे"
News of Free Press Journal
Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जेव्हा देश संघर्ष करीत होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य स्वयंसेवी संघटना गरिबांना मजुरांना अन्न पोहोचविण्याचे अभियान चालवीत होते. कोरोना संक्रमितांची तपासणी करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होते. त्यावेळी कम्युनिस्ट कुठे होते? आपण कम्युनिस्टांचा एक तरी फोटो बघितला का? यावेळी हे कम्युनिस्ट विवाद उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करत होते, की प्रवासी मजूर ज्याप्रकारे पलायन करत आहे ती सरकारची चूक आहे आणि आणि या मजुरांनी सरकारच्या विरोधात एक मोठे आंदोलन छेडले पाहिजे. आताच दोन दिवसापूर्वी लडाख मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीवर आणि आपल्या जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरावर सीपीआय चे महासचिव डी राजा "दोन्ही पक्षांनी समझदारी दाखवली पाहिजे" अशी भूमिका घेतात.
कम्युनिस्टांसाठी भारत त्यांचा पक्ष नाहीये. कम्युनिस्टांसाठी भारत हा त्यांचा देशही नाही. त्यांचे सर्व प्रेरणा रशिया आणि चीन आहे. देशावर जेव्हा संकटे आली, आक्रमणे झाली तेव्हा तेव्हा या कम्युनिस्टांनी आपल्या देशाला कधीच साथ दिलेली नाही मग यांना कोणी देशद्रोही बोलले तर?
विषयानुरूप महत्वपूर्ण संदर्भ -
(सदर लेखाचा मराठी अनुवाद केला आहे)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
------------------------------------------
Like & Follow us..
-------------------------------------------
1 टिप्पण्या