आमचा यंदाचा उपक्रम होता की रक्षाबंधन ला भारतीय सेनेतील आपल्या खऱ्या रक्षण करत्यांना राख्या आणि पत्र पाठवायचे, आम्ही तयारीला लागलो. आणि राख्या खरेदी करण्यासाठी म्हणून दुकाना मध्ये गेलो. आणि अगोदर त्या काकांना सांगितलं आम्हाला राख्या हव्या आहेत पण त्या made in China नको. भारतीय राख्या च हव्या...त्यावर त्या काकांनी खूप छान स्मित हास्य दिलं आणि आनंदी होऊन आम्हाला राख्या दाखविल्या .शेवटी ते म्हणाले "अशीच जागृतता सर्वांमध्ये असली तर किती बरं होईल".
ज्या देशाचे हात आपल्या सैनिकांच्या, भारतमातेच्या वीर पुत्राच्या रक्ताने रंजीत झालेले आहे अश्या शत्रू राष्ट्र चीन च्या वस्तू आपण काय म्हणून खरेदी करतो. चीन केवळ पैशाच्या जोरावर माज करत आला आहे, आजही तो तेच करत आहे. आणि चीनला सर्वाधिक पैसा देणारा आपला भारत व पर्यायाने आपणच भारतीय आहोत. हे लक्षात घ्यायला हवे.
संपूर्ण देशाला शोका च्या सहस्त्र वेदना मध्ये टाकणारी घटना म्हणजे 15 जून , वार सोमवार रोजी गलवान येथे झालेली घटना ... गलवाण घाट चा भारत चीन च्या प्रश्ना च्या बाबतीतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता ज्यामुळे गलवाण सीमेवर सैनिकांचा जमाव वाढत चालला होता,आणि १५ जून च्या रात्री त्यांच्यात हिंसक झडप झाली .ज्यात भारत मातेचे २० जवान शहीद झाले.संपूर्ण देश शोका मध्ये होता एकीकडे कोरोनाचा हाहाकार तर अश्या नाजूक परिस्थिती मध्ये शत्रूंनी केलेला घात..... चीन ने यापूर्वी ही भारताला मित्र बनून शत्रूचे कर्तव्य पार पाडले आहे....मात्र आता जे नजरे समोर घडले किमान त्यावरून तरी आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा...
"ज्या भावांना रक्षण कर्ता म्हणून रक्षासुत्र बांधतो ते रक्षासूत्र आपल्याच रक्षणकर्ता च्या रक्ताने माखलेल्या हातांनी बनलेले असते". याची जाणीव ठेवून आपण एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य बजावत चिन्यांना धडा शिकवला पाहिजे. आपल्या एका राखीमुळे कितीसा फरक पडेल असे आपल्याला वाटते, परंतु संघाटीतरीत्या याचा मोठा परिणाम होत असतो. आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण एक संदेश सोडत असतो. समजात देशाप्रती आपल्या आशा, आकांक्षा व इच्छेला मुराद घालण्याचा संस्कार निर्माण करत असतो. आज आपली कृती उद्याच्या पिढीसाठी एक संस्कार निर्माण करत असते.
हिंदु संस्कृतीच्या सुवर्ण सनातील सुंदर असा हा सण रक्षाबंधन आहे त्याची पवित्रता लक्षात घेऊन या वर्षा पासून सर्व चिनी वस्तू तसेच चिनी राख्या यांचा बहिष्कार हा प्रत्येक भघिनिने करायलाच हवा..
चला तर या पवित्र महूर्तावर संकल्प करूया की आयुष्यात कधीच चिनी वस्तूंची खरेदी करणार नाही तसेच दृष्ट चीन च्या चिनी मालाचा बहिष्कार करू.
'स्वदेशी चा स्वीकार करूया आणि चिनी वस्तूंचा बहिष्कार करूया'.....
- ऍड. स्नेहल विसपुते
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या