गोव्याचे सप्तकोटेश्वर आणि अयोध्येचे राम मंदिर..

#शिवरायांसि_आठवावे


तेव्हा गोव्यावर पोर्तुगीज सत्ता होती!!
गोव्यात अमानुष अत्याचारांची मालिका सुरु होती.  हिंदुच्या धार्मिक प्रथांवर बंदी आणली गेली.गोव्यातील असंख्य मंदिरे पाडली गेली. हिंदुचा धार्मिक छळ करण्यात येऊ लागला.

 आल्फान्सो अल्बुकर्क याने श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडून तेथे चर्च उभे केले. हिंदुना बाटवून  सक्तीने ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जात होती. गोव्यातील हिंदुचा असा छळ होत असल्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी  गोव्यावर आक्रमण केले.

 पुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी गोव्यावर दुसरी स्वारी केली,त्यावेळी त्यांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार केला. पोर्तुगीज,मुघल आदी परकीय आक्रमक जेव्हा एखाद्या मुलखावर स्वारी करत ,तेव्हा तेथील जनतेच्या श्रध्दास्थानांवर आघात करत. श्री सप्तकोटेश्वर हे तर कंदबांचे राजदैवत! अवघ्या गोव्याचे श्रध्दाकेंद्र !! त्यामुळे शिवाजीमहाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला. तिथे एक शिलालेखच आहे,
 
श्रीसप्तकोटीश शके 1590 कीलकाब्दे
कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:l

मुस्लिम आणि पोर्तुगिज या परकीय मुस्लिम सत्तांनी श्रीसप्तकोटेश्वराचे प्राचीन मंदिर अनेकवेळा उध्वस्त केले होते. श्री सप्तकोटेश्वर हे राजदैवत,त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करत आपल्या हिंदु अस्मितेचा परिचय करुन दिला.

परकीय आक्रमकांनी आपल्या भुमीवर हल्ले केले,ते केवळ जमीनीसाठी नाही,तर त्यामागे धार्मिक हेतूही स्पष्ट होते. हिंदु मंदिरांची तोडफोड, बलात्कार, अत्याचार ही त्या आक्रमणांची वैशिष्ट्यै होती.

जिथे जिथे परकीय आक्रमकांनी आपली मंदिरे पाडली,तिथे तिथे ती पुन्हा उभारली पाहिजेत. अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमीवर या पवित्र कार्याचा प्रारंभ झाला आहे.  पण अजूनही आपली अनेक श्रध्दास्थाने स्वतंत्र भारतातही असूनही पारतंत्र्यात आहे.त्यासाठी सर्व भारतीयांनी शिवरायांची प्रेरणा घेत  एकत्र येण्याची गरज आहे. गुलामीची प्रतिके नष्ट करुन पुन्हा आपल्या राष्ट्रीय मानबिंदुची पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे,त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवनापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.

- कुणाल सोनार, भुसावळ 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या