संविधान_सभा_आणि_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर


#संविधान_दिवस_2020

संविधान सभेत जाण्याविषयी डॉक्टर बाबासाहेब यांनी भूमिका मांडलेली आहे तिचा थोडक्यात आशय असा- संविधान सभेत अनुसूचित जातीच्या हक्कांचे रक्षण कसे करता येईल हा माझ्यापुरता विषय होता. मात्र जेव्हा मला लेखा समिती घेण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि लेखा समितीचा अध्यक्ष जेव्हा मला करण्यात आले तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. 

लेखा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर आता मला संपूर्ण देशाची राज्यघटना तयार करायची आहे, ती केवळ अनुसूचित जाती जमातींसाठी नाही किंवा एखाद्या पक्षाला कायम सत्तेत बसवण्याची नाही, अथवा जे परंपरेने राज्यकर्त्या वर्गात मोडतात त्यांच्यासाठी ही राज्यघटना करायची नाही. ती भारतातील सर्व लोकांसाठी सामान्यातील सामान्य लोकांसाठी करायची आहे या भूमिकेत ते आले ही त्यांची महानता आहे.

भारताची प्राचीन थोर परंपरा सर्व विचारधारांना सामावून घेण्याची आहे. विरोधकांना आपण नाकारत नाही. त्यांनी वेगळा विचार मांडला म्हणून त्यांना फेकून दिले जात नाही. त्याच्या हयातीत त्याचा विरोध होतो, कारण कोणताही नवीन विचार लगेच स्वीकारला जात नाही. संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेबांना आपल्या प्राचीन परंपरेचा मान राखीत स्वीकृत केले आणि त्यांना आपल्या राष्ट्र निर्मितीच्या कामात अत्यंत महत्त्वाची भूमिका दिली.

याविषयी डॉक्टर बाबासाहेबांचा म्हणाले की, जेव्हा हिंदूंना वेद आणि वेदांत याची आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी ते काम 'महर्षी व्यास' यांना दिले. व्यास सवर्ण हिंदू नव्हते. जेव्हा हिंदूंना महाकाव्याची गरज भासली तेव्हा त्यांनी ते काम महर्षी वाल्मिकीना दिले. वाल्मीकी सवर्ण हिंदू नव्हते आणि जेव्हा त्यांना संविधानाची गरज लागली तेव्हा त्यांनी ते काम मला दिले. याचा अर्थ एवढाच करावा लागतो की, ही आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे. व्यास, वाल्मिकी, आंबेडकर या परंपरेतून भारत उभा राहिला आहे..!

साभार - आम्ही आणि आमचे संविधान, रमेश पतंगे 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या