श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाबाबत एका रामभक्ताने केलेले चिंतन...



संपूर्ण हिंदू समाजात उत्साहाचे वातावरण आहे कारण भारतीयांचे आराध्य, राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माण ला सुरवात झाली आहे. राम मंदिर साठी कित्येक लोकांनी बलिदान दिले कित्येक लोकांनी आयुष्य खर्ची केले, कित्येक युद्ध झाले, सर्वोच्च न्यायालयातून हा विजय प्राप्त झाला. त्यानंतर हे मंदिर बनत आहे हे फक्त दगड विटांचे मंदिर नाही तर त्याग, तप, बलिदान, शौर्याचे प्रतीक आहे. या मंदिर सोबत राष्ट्रीय अस्मिता जुळलेली आहे.

एका वृत्तपत्रात अग्रलेखात श्रीराम मंदिर वर्गणी मागे राजकीय अजेंडा आहे, घरोघरी फिरून वर्गणी मागणे म्हणजे  हिंदूत्वाचा अपमान आहे, अशी टीका त्या राजकीय वृत्तपत्रातून केली. परंतु आपण प्रभू श्रीराम यांनी राष्ट्र जोडण्याचं कार्य केलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्यात मंदिर होईलच पण सर्व भारतकेंद्रीत समाजही जोडल्या जाईल. भक्तीमय वातवरणमध्ये हे कार्य होणार आहे. 

प्रभू श्रीराम समरसतेचे मानबिंदू आहेत हे सर्वांना माहीत आहे. प्रभू श्रीरामांनी भारत भ्रमण करून भारत जोडला हेही सर्वांना माहीत आहे. प्रभू श्रीराम वनवासात असतांना त्यांनी भारत भ्रमण केले व भारताचा मूळ वेदांमधील मौलिक संदेश दिला, समरसतेचा संदेश दिला. आता श्रीराम भक्त गावा गावात, तांड्या तांड्यात, वाड्या वस्तीत, शहरात फिरतील, निधी समर्पण अभियान चालवतील व सोबत एक संदेश ही देतील. श्रीराम आपले आहेत. श्रीराम आपल्याला अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय दृष्टीने जोडणारे आहे. म्हणजे स्पष्ट होते की श्रीराम निधी समर्पण भक्तिमय अभियान आहे, सर्वसमावेशक आहे. हे हिंदुत्वाचे कार्य आहे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असा संदेशही इथून येईल. म्हणजे इथे राजकारण आणि निधी समर्पण अभियानचा संबंध नाही हे लक्षात घ्यायला हवे.

असं अभियान पहिल्यांदा होत आहे का? नाही. यापूर्वी विवेकानंद शीला स्मारक साठी १ रुपया भारतीयांकडून गोळा करण्यात आले होते. महत्वपूर्ण म्हणजे त्यात सर्व राजकीय पक्षांनी देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर श्रीराम मंदिर शीला पूजन साठी १.२५ रुपये चे कुपन घेतले होते. त्यासाठी २.५० लाख गावाशी संपर्क झाला होता. यामागे उद्देश हाच होता घराघरातून श्रीरामभक्ती राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करायचा होता. आणि तो उद्देश पूर्ण झाला होता.
श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाचाही उद्देश स्पष्ट आहे.

श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान मध्ये सहभाग कोणाचा असेल, तर प्रत्येक हिंदूंचा, म्हणजे भारतीय समाजाचा श्रीराम मंदिर निधी समर्पण मध्ये सहभागी असेल. कोणतेही विशिष्ट संघटना, पक्ष, संप्रदाय, ग्रुप ह्यांचा सहभाग ह्यात नाही. सहभाग असेल तो फक्त भारतीयांचा. निधी जमा करणारा रामभक्त आहे आणि आणि देणाराही रामभक्त. मंदिर हे भारतीयांच्या समर्पणातून बनेल, भक्तीभावातून बनेल.

श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानमागील उद्देश हा स्पष्ट आहे की  घराघरातून श्रीराम मंदिर साठी आपल्या इच्छेनुसार समर्पण निधी द्या. निधी किती द्यायची तर आपल्या इच्छा आणि क्षमतेप्रमाणे. कोणतेही अट वगैरे नाही. खारीची आणि प्रभू श्रीराम यांची कथा सर्वांना माहीतच आहे, खारीची गोष्ट यासाठी की आपल्या क्षमतेप्रमाणे दान करा बस्स.

या कार्यात समर्पण आहे, भक्तिभाव आहे, एकतेची भावना आहे. संपूर्ण हिंदू समाज एक आहे ही भावना आहे. कोणीही एक व्यक्ती, संघटना हे मंदिर बनवत नसून प्रत्येक भारतीय घराघरातून हे मंदिर बनत आहे. प्रत्येक रामभक्त या मंदिर निर्मितीच्या पवित्र कार्यात सहभागी आहे. आणि कोणीही कीतीही निंदा करो, टीका करो, आपण आपले कार्य करूया, कारण चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना.

@ दिपक राठोड, कन्नड 
dipakrathod196@yahoo.com

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या