लव्ह जिहादच्या रोगापासून कधी मुक्त होणार महिला?

जागतिक महिला दिन विशेष...

@स्नेहल विसपुते

जागतिक महिला दिन.... महिलांचा सन्मान करणारा दिन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. एकीकडे विश्व प्रगतीच्या पथावर खूप पुढे गेले आहे. तिथे सर्वच गोष्टींच्या व्याख्या बदलल्या आहेत. विचार बदललेले आहेत, समाजाचा दृष्टिकोन ही बऱ्यापैकी बदललेला आहे. भारत ही त्याच प्रगती पथावर आहे. भारतीय महिला ही जगाच्या पाठीवर भारतभूमी चे नाव आसमंताला भिडवत आहे. आजच्या भारतीय स्त्री कडे बघून डोळे दिपतात खरंच इतकी सामर्थ्यशाली भारतीय महिला आहे.

पण आज जागतिक महिला दिनानिमित्त एक वेगळी महिलांची बाजू मी मांडणार आहे. व्यथा म्हणा हवं तर ,पण ही व्यथा तीच नाही जी आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत. "घरकाम, वैवाहिक छळ, समाजातील द्वितीय स्थान.." ह्या गोष्टीही आहेतच ज्या अजूनही बदलेल्या नाहीत मात्र या पलिकडे मी एक चित्र पाहिलंय.. थरारक असं एकूणच जीवाचे पाणी करणारे. 'लव जिहाद' !!

व्याख्या अगदी छोटीच मांडली आहे याची. " प्रेमाचे अमिष दाखवून दगा करणे किव्वा धर्मांतरण करणे". आता सर्व प्रथम तर स्वतः ला सेक्युलर समजणाऱ्या काही बांधवांचा प्रश्न असेल की ह्या तुमच्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी चा महीलादिनाशी काय संबंध.? तर मित्रांनो लव जिहाद हा केवळ कुठला धार्मिक विषय नाहीये. हा संपूर्ण स्त्री जातीच्या आत्मसन्मानाचा आणि विश्वासघाताशी संबंधित विषय आहे. एक राक्षस प्रवृत्ती केवळ धार्मिक युद्धासाठी हत्यार समजून स्त्री जातीचा आधार घेऊन त्यांचं आयुष्य विस्कळित करतात. तो हा लव जिहाद! जिथे एक वेळा कुणावर बलात्कार झाल्यावर संपूर्ण देश जेव्हा पेटून उठतो परंतु, त्याच देशात कित्येक भगिनी केवळ जिहादी वृत्तीने प्रेमाच्या जाळ्यात फसवून अत्याचार सहन करत असतात. हा विषय कधी गांभीर्याने घेणार आहोत आपण??

कधीतरी किमान एक वेळा लव जिदाह ला बळी पडलेल्या महिलांना भेटा त्यांची अवस्था जाणून घ्या... ही आपली हतबलता आहे की पळकुटेपणा?
लव जिहादचे काही महत्त्वाची ध्येय आहेत. एक तर धर्मांतरण आहेच, दुसरे म्हणजे विशिष्ट धर्माची लोकसंख्या वाढवून संपूर्ण जगभर त्यांचं वर्चस्व असावं अशी नीच विचारधारा ठेवून लव जिहाद ला बळी पडलेल्या स्त्री चा केवळ संख्या उत्पत्तीचा स्त्रोत म्हणून वापर करणे. आणि तिसरे स्त्री भोग घेण्यासाठी केला जाणार लव जिहाद या प्रकारात स्त्रीला केवळ उपभोगाचे साधन समजून असंख्य वेळा तिच्यावर अत्याचार केला जातो. अक्षरशः वस्तू विकावी तसा तिचा देह विकल्या जातो. पण यावर बोलणार कोण ?

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आई वडील मुलींना काचेच्या भांड्या प्रमाणे वागवतात . कोवळ्या वयात नसते त्यांना ज्ञान योग्य - अयोग्य गोष्टींचे . प्रेमाच्या नावाखाली असलेल्या नरक दरी पासून अनभिज्ञ असतात त्या. जिहादी नाटकांना निखळ प्रेमाचा झरा समजून पडतात त्या दरीत. आयुष्य संपत त्यांचं, जिवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतात. काय चूक तरी काय असते त्या स्त्री ची ? विश्वास ठेवणे!! त्याची इतकी मोठी शिक्षा...! स्वतंत्र देशातही स्वतंत्र त्यांना वावरता येत नसेल तर करावे तरी काय. की स्त्री जन्मच नको असे मागणे मागावे आता परमेश्वराकडे? पण का?? मुलींनी सांभाळून राहावं हे नेहमीच ऐकून आहोत पण लव जिहाद सारख्या कृत्य करणाऱ्याला भर चौकात जिवंत जाळले पाहिजे ही समज का नाही दिली समाजाने. फक्त स्त्रियांनी ढाल कशी उपयोगात आणायची हेच सध्या शिकवत आहेत, त्यापेक्षा तलवार शिकवून ती चालवण्याचा अधिकार द्या आम्हाला. 

महिला सशक्तीकरणाचे झेंडे मिरवणारे अनेक दल, स्वयंसेवी संस्था, संघटना आहेत. मग हा विषय कसा नाही लक्षात येत बर कुणाच्या? दुर्लक्षित करण्याइतपत छोटाही नाही हा विषय. इथे का गप्प असावं सर्वांनी? उघड्या डोळ्यांनी स्वच्छ बघितलं तर अगदी सहज कळेल की चालू काळात स्त्री जातीचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो 'लव जिहाद' आहे. लव्ह जिहाद कुठल्या धर्माच्या विरोधात पसरवला जाणाला अपप्रचार नाही. 'प्रेम आंधळं असतं' असा भ्रम धोकादायक ठरत आहे. 'प्रेम' म्हणजे विश्वास, सहमती असते, तर 'लव्ह जिहाद' म्हणजे धोका, विश्वासघात आहे. निदान एवढे तरी लक्षात घेतले पाहिजे.

पू. सरसंघचालक म्हणतात की महिलांच्या उत्थानाचा मार्ग पुरुष ठरवू शकत नाही, त्यासाठी महिलाच सक्षम आहेत. त्यामुळे अश्या जिहादी धोक्यापासून भगिनींना वाचवायचे असेल तर महिलांनीच या विषयी गांभीर्य बाळगायला हवे. लव्ह जिहादचा रोग केवळ भारतात नाही, अन्य देशातही आहेच. अन्य धर्मीय महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून इस्लाम करवून घेण्याचे उद्योग सर्वत्र सुरू आहेत. भारतात आजवर किती महिलांना या जिहादच्या बळी पडावे लागले असेल याची गणनाच नाही. नुकतेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधी कायदे पारित केले. त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आपल्या महाराष्ट्रातही असे कायदे झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. 

आजची स्त्री मुक्त आहे, तिला सर्व स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहेत. परंतु या मुक्त गगनात भरारी घेताना काही संकटं आणि आव्हानं आहेतच. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरच स्त्री स्वातंत्र्याला अर्थ राहील. 

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

(लेखिका दुर्गा वाहिनी देवगिरी प्रांत च्या कार्यकर्त्या आहेत.) 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#internationalwomensday2021 
#जागतिक_महिला_दिवस 
#indianwomen #LoveJihad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या