छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात बिजापूर येथे नक्षलवाद्यांनी संरक्षक दलातील पोलिस शिपायांना क्रूरपणे ठार मारल्याची घटनेचे वृत्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाचावयास मिळाले. या हल्यात २२ सुरक्षा जवान शहीद झाले,जवान राकेश्वरसिंह यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते,नंतर सोडून दिले. हेच कृत्य जर पाक अतिरेक्यानी केले असते तर आपले रक्त उसळून उठले असते. या कृत्याचा बदला घेतला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली असती. पण नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीला स्वातंत्र्यानंतरही स्वीकार करत आहोत. "केवळ असे व्हायला नको होत" अशीच प्रतिक्रिया व्यक्त करून सोडून देत आहोत. याचे कारण नक्षलवाद्यांच्या चळवळीत आपलेच भारतीय तरूण आहेत, म्हणून ना! यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचेही हात बांधलेले आहेत. नक्षलवादी समर्थक 'चळवळ' अथवा 'क्रांती' व गोंडस नाव देत असतात. या चळवळीचा इतिहास असा आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील 'नक्षलवाडी' गावात १९६०च्या दरम्यान तेथे जमीनदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्व चारू मुजमदार आणि कानू सन्याल यांनी केले होते. त्यावेळी सोनम वांगडी या पोलीस निरीक्षकाच्या हातून आदिवासी तरूणांचा मृत्यू झाला. नंतर मुजमदारांनी १९६९ साली चळवळीची राजकीय आघाडी कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सिस्ट- लेनिनिस्ट) ची स्थापना केली. तसेच ७० व्या दशकात आंध्रप्रदेशात पेशाने शिक्षक असलेल्या कोंडापल्ली सीतारामय्या यांनी आदिलाबाद, वरंगल, तेलगंणा भागात या चळवळील बळ दिले. मजूमदाराने सुरु केलेली नक्षलवादी चळवळ देशात वणव्या सारखी पेटली.आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील ६० जिल्हे आज प्रभावित आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ कार्यरत आहे. आदिवासी बहूल लाल पट्यात ही चळवळ केंद्रीत झाली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेच्या माहिती नुसार वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रिय कार्यकर्ते आहेत. केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात शिक्षण,रोजगार आरोग्य सुविधा, विकास कामावर भर देत, तसेच केंद्रात आदिवासी भागात जुलूम कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे आजही नक्षलवादी चळवळ कमजोर होत चालली आहे.
या नक्षलवादी चळवळीला सुशिक्षित मंडळी लेखक, विचारवंत प्रोत्साहन देत आहेत. त्यांना शहरी नक्षलवादी म्हंटले जाते. यांचा हिंसक घटनेत थेट संबंध नसला तरी ते प्रेरणास्थान म्हणून त्यांचे कार्य चालू असते. ही मंडळी आता देशातील बंगलोर मुबंई, पुणे, नासिक,मोठ्या शहरात राहून नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देत आहेत. गरीब, शेतमजूर, कामगार आणि आदिवासींच्या दुर्दशेस देशाचे भांडवलशाही धोरण कारणीभूत आहे. त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतींच्या मार्गाने करता येईल, ही नक्षलवादी गटाची विचारसरणी आहे. चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते त्से तुंग याचे प्रसिध्द वाक्य आहे,"क्रांती म्हणजे मेजवाणी नव्हे, अथवा सुंदर निबंध लिहिणे नव्हे तर क्रांती ही सत्ताधिकार्यांच्या विरोधातील सशस्त्र उठाव आहे"याच विचाराने प्रेरित होवून हे हिंसक घटना केल्या जात आहेत. त्यासाठी सरकारच्या विरोधात रक्तरंजित लढाई करण्याशिवाय पर्याय नाही,अशी तथाकथित विचारवंताची मानसिकता आहे.
नक्षलवाद्यांना समर्थकांना मोआवादी विचारसरणी मान्य आहे. पण भारताची डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, लोकशाही पध्दत मान्य नाही, असे दिसते. हेच शहरी नक्षलवादी विचारवंत मंडळी गरीब, आदिवासी तरूणांचे माथे भडकवितात. अश्या भरकटलेल्या तरूणांचे 'ब्रेन वाश' करून त्यांच्या हातात शस्त्र देत आहेत. स्वत: मात्र शहरी भागात उच्चभ्रू वस्तीत प्रतिष्ठीत म्हणून राहतात. या चळवळीसाठी खंडणी स्वरूपात परदेशातून देणगी स्वरूपात पैसा घेतला जात आहे. आंतराष्ट्रीय अतिरेकी संघटनेपेक्षा देशातील अंतर्गत अतिरेकी व विचारांपासून अधिक धोका आहे, याची आपणाला चिंचा वाटत नाही. देशात नक्षलवाद्यांची रक्तरंचित क्रांती घडू द्यावयाची नसेल तर काँग्रेसला निवडून द्यावे,असे श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणूक दरम्यान करिमनगर जिल्ह्यातील जगत्याल प्रचार सभेत केले होते. याच नक्षलवाद्याच्या टोळीने मध्यप्रदेश काँग्रेसची प्रदेशाध्यक्षाची हत्या केली होती. या नक्षलवाद्यांनी क्रांतीच्या नावाने हजारो सुरक्षा जवानांचे, राजकीय नेत्यांचे निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. यात २०१६-४५०, २०१७- ३३३, २०१८- ३३ जणांचा नक्षलवाद्याच्या हल्यात बळी घेतला आहे. निष्पाप लोकांचे बळी घेवून त्यांचे क्रांतीचे स्वप्न भारतात कधीच पूर्ण होणारे नाही. नक्षलवादी विरोधातील आखणी चुकीची होती,असे विधान काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केले आहे. त्यांनी नक्षलवादी चळवळीच्या विरोधात प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांनी शहीद शिपायांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांचा अवमान केलेला आहे. काँग्रेसचे हे 'बाबा' या घटनांकडे सुध्दा राजकीय चष्म्यातून बघतात.
शहीद सैनिकांचा अपमान करणे, त्यांची सवय बनली आहे. ते देशातील सुरक्षा दलातील तज्ज्ञ नाहीत. नक्षलवादी चळवळी विरोधात सैनिक बळाचा वापर करून खात्मा करता येतो,पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकाराचे उल्लंघनाचा दवाब येत असतो. देशात अतिरेक्यांना पोलीस चकमकीत ठार मारल्यानंतर त्या विरोधात काँग्रेस पक्षाने आणि मानवाधिकार संघटनेने असंख्य तक्रारी नोंदविल्या आहेत. देशात भाजपा सरकारने शहरी नक्षलवाद्यांना अटक करून त्यांचा भांडाफोड केला होता. भीमा -कोरेगाव येथील दोन समुहात दंगल घडवून आणण्याची घटना घडली. अनिल तेलतुबंडे, वरावरा राव, गौतम नवलखा, सुधा भारव्दाज हे विचारवंत कोण आहेत? यांचा नक्षलवादी चळवळीशी सबंध आहे? काँग्रेस मानवाधिकार संघटना व समर्थकांनी या अटकेचा विरोध का केला होता? अश्या प्रवृत्ती देशातील नक्षलवादी चळवळ पोसत जात आहेत हे वास्तविक आहे.
- कमलाकर जोशी,
ज्येष्ठ पत्रकार, नांदेड
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#UrbanNaxalism #नक्षलवाद #NaxalismInIndia #शहरी_नक्षलवाद
0 टिप्पण्या