देवगिरी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे फक्त हिंदुत्वाचा नाही तर देशाच्या अनेक समस्यांवर काम करत असते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे भूमी सुपोषण आणि संरक्षण राष्ट्रीय अभियान.
या लोकचवळीचा मुख्य हेतू भूमी सुपोषणासाठी शेतकरी आणि सामान्य माणसांना जागृत करणे आणि जे शेतकरी भूमी सुपोषणासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्याकडून याच विषयावर शिक्षण घेऊन इतरांपर्यंत पोहचवणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश घेऊन रा.स्व.संघ काम करत आहे . शेतकऱ्यांचा जमिनीचे पोषण कायमच झाडांच्या पानापासून, शेण, गोमूत्र, प्राण्यांच्या अवशेषापासून होत असते. शेती आपल्या परिसरातील साधनांवर आधारित असते. शेतकऱ्यांचा नेहमीपासूनच प्रकृती, पर्यावरण, प्राण्यांसोबत बंधुभाव राहिला आहे . गेल्या 60 वर्षापूर्वी 1960 च्या दशकापासून आपल्या शेतीत परिवर्तन दिसू लागले. शेण, गोमूत्र तसेच पारंपरिक मान्यतावर आधारित असलेली आपली शेती संपूर्णतः रासायनिक शेतीत परिवर्तीत झाली आहे. परिणामी आज रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या जमिनी आणि मातीची सुपोषण आणि संरक्षण करण्यासाठी ही चळवळ उभी कारण्याची वेळ आली आहे .
या चळवळीची सुरुवात भारतात पारंपरिक प्राकृतिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी, अनेक संस्था, शेतकऱ्यांच्या लाभासाठी काम करणारे संघटन या सर्वांनी मिळून केली असून या चळवळीचा मुख्य हेतू आहे .
भूमी सुपोषण म्हणजे काय ?
भूमी सुपोषण ही भारतातील हजारो वर्षांपासून वापरली जाणारी शेतीची पारंपरिक पद्धत आहे. शेतकऱ्यानी या भूमीला आई मानून सुपोषणासाठी जागृकता कायम ठेवली आहे. भारतातील शेतकऱ्यांनी देशी गाईचे शेण, गोमूत्र, पाला पाचोळा, झाडांची पाने या सगळ्यापासून खत निर्माण करून जमिनीची सुपीकता जपली आहे . शेत जमिनीला काही काळापर्यंत विश्रांती देणें, रिकामी ठेवणे, पिकांचे अवशेष मातीत मिसळून त्यातही पोषक मूल्ये पुन्हा स्थापित करणे, अशा सोप्या पण प्रभावी पद्धतीने भूमी संरक्षण केले आहे .भारतीय कृषी चिंतनाप्रमाणे आपल्याला जमिनीचे शोषण नाही तर पोषण करायची गरज आहे .
भूमी सुपोषण आणि संरक्षण करण्यासाठी लोक चळवळीची गरज ?
भारतात जमिनीची स्थिती चिंताजनक आहे. जर तुम्ही मागील दहा वर्षापासून सतत रासायनिक खतांचा वापर करत असाल जमिनीसाठी कीटकनाशक , रोग प्रतिकार करणारी औषध, नको असलेली वनस्पती हे सर्व नष्ट करण्यासाठी आधुनिक रसायने हे सगळं वापरत असाल तर तुम्ही सुद्धा जमिनीचा या चिंताजनक परिस्थिती चा अनुभव निश्चित घेत असाल. कडक होत चाललेली माती, जमिनीचा कस कमी होण्याचे वाढते प्रमाण या सगळ्याचे एकमेव कारण रासायनिक खतांचा अतिरेक आहे. पारंपरिक जुन्या पद्धतीचा प्रत्येक वस्ती-प्रमाणे गावाप्रमाणे, वेगवेगळ्या गुणवत्तेची पीक दिसायला पण आधुनिक रासायनिक पद्धतीने ही विविधता नष्ट केली. सगळीकडे एक सारखी, कमी उंचीचे जास्त बिया असलेली पिके निर्माण झाली. पारंपरिक शेती पद्धतीत कीटकनाशक , रोग प्रतिकारक , नको असलेली वनस्पती नष्ट करण्यासाठी प्राकृतिक पद्धतीचा वापर केला होता आता त्यांची जागा रासायनिक खतांची घेतली आहे.
रासायनिक खतांमुळे अन्न धान्य मुबलक झाले आहे. आता भरपूर प्रमाणात , धान्य उपलब्ध आहे, पण यामुळे जमिनीची सुपीकता उत्पादन क्षमता नष्ट होत चालली आहे. मागील साठ वर्षात रासायनिक खतांचा वापर आणि पाण्याचा असंतुलित वापर यामुळे आपली जमीन कठीण झालीय, कडक झाली आहे. माती आणि पाण्याची गरज वाढत चालली आहे .भूमी सुपोषण आणि संरक्षनाची या राष्ट्रीय चळवळीचा एकमात्र उद्देश जमिनीचे शोषण थांबवणे आणि पोषण करणे हा आहे या चळवळीत भारतातील पारंपरिक शेतीच्या पद्धती ज्या आजच्या जीवन शैलीला अनुकूल आहेत यासाठी जनजागृती करायची आहे .
देवगिरी प्रांतामध्ये या अभियानाचे मंगळवार दि. 13 एप्रिल ते शनिवार दि. 24 जुलै दरम्यान पहिले चरण समाप्त होणार आहे . मंगळवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता देशातील सर्व राज्यांमधील सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावामध्ये भूमिपूजन समारंभ आयोजित करण्याचा संकल्प घेतला जाईल. तसेच प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह भूमी पूजन करून आपल्या भूमीचे सुपोषण करण्याचा संकल्प घेतील.
या अभियानातील प्रथम चरणामध्ये प्रशिक्षित, यशस्वी शेतकऱ्यांसोबत गाठीभेटी घेऊन जिल्यातील कृषी विज्ञात केंद्रांच्या माध्यमातून सुपोषण वर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील . शहरी भागातील लोकांनीसुद्धा या चळवळीत सहभाग घ्यायला हवा. शहरी भागात पण असे कार्यक्रम राबविण्यात येतील. जेणेकरून त्यांचा कडून शेतजमिनीचे होणारे नुकसान कमी होऊ शकेल. तसेच शहरीभागातील नागरिक सुद्धा आपापल्या मूळ गावी जाऊन श्रद्धा पूर्वक भूमिपूजनात भाग घेतील. ही भूमी संरक्षणाची चळवळ ही आपली आपल्या देशाच्याप्रति समाजाप्रती आणि आपल्या भूमीच्याप्रति असलेली आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिक तथा शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या