लहान मुलांना गोड पदार्थांचे खूप आकर्षण असते. अनेक मुलं गोड पदार्थांसाठी हट्ट करतात आणि रडतात. पण आश्चर्याची गोष्ट ही, की बाल केशव ने त्याला मिळालेल्या मिठाईला नालीत फेकून दिले गोष्ट अशी झाली-
त्यावेळी भारतवर्षावर इंग्रजांच राज्य होतं. त्यांची राणी राज्य करत होती. तिचं नाव होत व्हिक्टोरिया. जेव्हा तिच्या राजवटीचे ६० वर्ष पुर्ण झाले, तेव्हा इंग्रजांनी सर्व साम्राज्यभर मोठा समारोह संपन्न केला. भारतात सुद्धा इंग्रजांनी हा उत्सव धूम-धडाक्यात साजरी केला. जागो जागी मेजवान्या आयोजित केल्या गेल्या. विशाल सभा झाल्या. त्या मध्ये मोठ मोठे भाषण देऊन राणीची स्तुती करण्यात आली. रस्त्यांवर कमानी बांधल्या ध्वजा,पताका, तोरण आदी बांधून रस्ते सजवले गेले आणि राणीच्या छायाचित्राला घेऊन मिरवणुका काढल्या गेल्या. या समारोहा निमित्त शाळांमध्ये मुलांना मिठाई वाटली गेली. केशव च्या शाळेत सुद्धा मुलांना मिठाई दिली गेली. ती बाल केशवला ही मिळाली, पण त्या मिठाईला स्पर्श करताच केशवला वेदना झाली. त्याच्या छोट्याशा मस्तिष्कात विचारांनी गोंधळ घातला.
"इंग्रज लोक ना आपल्या देशाचे आहेत ना आपल्या धर्माचे. माहित नाही किती लांबून ते इथे आले आहे आणि आपल्यावर राज्य करत आहे. ते आपले शत्रू आहेत. त्यांच्या राणीला राज्य करून ६० वर्ष झाले यासाठी आम्ही आनंद का साजरी करायचा? आम्ही मिठाई का खायची? छि छि या मिठाई ला खाण्याचा अर्थ आहे - इंग्रजांच्या राज्याला मान्यता देणे, त्यांच्या गुलामीला आनंदाने मान्य करणे. या मिठाईला खाणे पाप आहे, या मिठाई ला खाणे आपल्या देशाप्रती द्रोह करणेच आहे. नाही, नाही ही मिठाई मी कधीच खाणार नाही.
जेव्हा विचारांमध्ये तीव्रता आली तेव्हा केशव ने झटकन हात उचलून मिठाई नालीत फेकून दिली. त्याचे वर्गमित्र त्याच्या या कृतीला बघतच राहून गेले.
केशव ने त्यांना आपल्या बुद्धिनुसार बहुतांश समज दिली, पण केशव च्या गोष्टी त्यांना काही समजल्या नाही.
केशव जेव्हा घरी आला तेव्हा त्याची मुखचर्या उग्र, चिंतातुर अशी झालेली होती. त्याला बघून ज्येष्ठ बंधुने विचारले काय गोष्ट आहे? काही नाराज दिसत आहेस? ऐकत आहे की शाळेत मिठाई वाटप झाली म्हणून... का तुला नाही मिळाली ?
केशव ने म्हंटले- मिळणार का नाही? मिळाली. पण मी ती नालीत फेकून दिली . तेव्हा जवळ उभ्या एका नातेवाईकाने म्हंटले वा भाऊ वा, ही पण काही गोष्ट आहे? मिठाई कुठे नालीत फेकली जाते का?
केशव ने तडकन उत्तर दिले " अहो ती मिठाई नाही विषाची पुडीच होती. ज्यांनी आम्हाला गुलाम बनवलं आहे, त्यांच्या राणीच्या समारंभात आम्ही का सहभागी होणारं? अशी मिठाई देऊन इंग्रज आम्हाला सदैव गुलाम बनवून ठेऊ इच्छित आहे.
केशव चा हा रूप बघुन ऐकणारे सर्व चकित झाले. एकाने बोलून दिले "हा साधारण मुलगा नाही याचं पाणी काही वेगळ आहे."
हा बाळ केशव म्हणजे रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या चरणी शत शत नमन.
लेखन - यश दुधानी, जालना
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या