मरावे परी किर्तीरूपे उरावे...



  नारायण दाभाडकर, संघ स्वयंसेवक,  नागपूर यांचं कोवीडमुळे निधन झालं. मृत्यु हा अटळ आहे. कारण प्रत्येकाचं निराळं. पण काही लोकं मृत्यूसमयी देखील काहीतरी विलक्षण करून जातात.

  वय वर्ष 85, शरीरातील ऑक्सिजन मात्रा कमी कमी होतेय म्हणून मुलीने धडपड करत ऑक्सिजन बेड मिळवला होता. एडमिशन प्रक्रिया सुरूच होती. अशा स्थितीत एक महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी आकांत करताना त्यांनी पाहिलं... आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, की मी माझं आयुष्य जगून पूर्ण केलं आहे. हा तरूण मनुष्य जगला पाहिजे. याकरिता माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या.

  घरच्यांनी नारायणराव काकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. शेवटी कन्सेंट देऊन काका घरी गेले. नंतर परिणाम व्हायचा तो झालाच. मृत्युलाही स्वतःचा सन्मान करून घ्यायची संधी अपवादानेच मिळते..! त्यांना ती मिळाली.

  कितीही वय झालं तरी जगण्याची इच्छा माणसाला सोडवत नाही, परंतु डोळ्यासमोर उदात्त विचार व अंतःकरणात समाजहित असेल तर त्याचंही समर्पण होऊ शकतं, हे या प्रसंगावरून लक्षात येतं. 

  वैकुंठगमन झालेल्या ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांच्या आत्म्यास सदगती प्राप्त होऊन ईश्वर चरणी स्थान मिळेल, यात काही शंकाच नाही. 

  अश्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित जीवन व्यतीत करणा-या पवित्र आत्म्यास नतमस्तक आदरांजली...🙏

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या