जयेश कुलकर्णी, नंदुरबार येथे ११ वीत शिकणारा एक स्वयंसेवक.
लहानपणापासून आयुष्य अगदी संघर्षमय... एखाद्या सिनेमाच्या पट-कथेसारख... सात वर्षापूर्वी आईच निधन झालेलं... तेव्हापासून जयेश आणि त्याची बहीण नंदुरबार ला मामाकडे राहतात.. वडील जवळच एका लहान गावात राहायचे. जयेश अगदी लहान असल्या पासून संघाच्या शाखेत जातो.
मुख्यशिक्षक म्हणून छान शाखा चालवतो. या कोरोना महामारीत जयेश च पितृछत्र हि हिरावल गेलं. वडिलांना कोरोनाने ग्रासलं , दुखणं जरा बळावल्याने हॉस्पिटल ला दाखल कराव लागलं, त्यातून रेमिडीसिवर चा तुटवडा...खूप फिरला इंजेक्शन साठी , आपल्रे कार्यकर्ते पण प्रयत्न करत होते, एका स्थानिक नगरसेवकांच्या ( श्री कळवणकर) माध्यमातुन इंजेक्शन उपलब्ध झाले, परंतु उशीर झाला होता त्याच रात्री जयेश च्या वडिलांना शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं आणि नंतर त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला....
दरम्यान ज्या नगरसेवकांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. त्यांच्याकडे दाराशी पहाटेपासून एक जोडपं बसलं होत, त्यांच्या मुलासाठी इंजेक्शन मिळेल का या आशेवर.....
नगरसेवक महोदयांनी जयेश च्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भीत भीतच विचारले तुम्ही रेमडीसिव्हर वापरले का ? जयेश ने नाही सांगीतले. कळवणकर जी नि त्याला विनंती केली की एका गरजुला तु देतोस का.....?
थोड्या वेळात घरच्या बाहेर आवाज आला "काका मी बाहेर आलो आहे" , जयेश व त्याचे मामा दोघ ऊभे होते. वडिलांचे अंत्यसंस्कार करून ते घरी जात असतांना श्री कळवणकर यांच्या कडे त्यांनी रेमडीसीव्हर दिले.
त्यांना श्री कळवणकर यांनी पैसे देऊ केले तर त्यांनी ते घेतले नाही. नगरसेवक महोदयांनीही लगेच त्या संबंधित जोडप्याला ते injection दिले. त्यांना जयेश ने पैसे न घेता हे दिल्याचे सा़ंगितले. त्यावर जगातील सर्वांत श्रीमंत माणूस म्हणून त्या मुलाला मी म्हणेन असे गौरवोद्गार श्री कळवणकर यांनी जयेश बद्दल काढले.
आज जिथे ह्या इंजेक्शन च्या माध्यमातून लोक स्वत:च उखळ पांढर करून घेताना दिसतात तिथे ह्या मुलाच्या अंगी असलेला दातृत्व भाव हा त्याला त्याच्या कुटुंबाकडून आणि संघाकडून मिळालेला संस्कार आहे. आणि या संस्काराच्या जोरावर हे राष्ट्र परम वैभवला जाईल यात शंका नाही.
- परेश रत्नाकर यार्दी, नंदुरबार
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या