ऑस्ट्रेलियातील 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रात हिंदूंच्या भावना दुखवणारे चित्र छापून आल्यामुळे ऑस्ट्रेलियन हिंदू समूहातर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
#HinduUnited
'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने 4 मे रोजी लुसी रेबर्ट्स यांचा 'गेट अवर फ्रेंड्स होम' हा लेख प्रकाशित केला. परंतु या लेखासोबत जोडण्यात आलेल्या गणपतीच्या चित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.
या चित्रामध्ये गणपतीवर हातोड्याने प्रहार होत असल्याचे दाखवले गेले आहे. विशेष म्हणजे या चित्राचा आणि लेखाचा दुरान्वये संबंध नाही. मग असे चित्र का जोडले गेले? असा प्रश्न द टेलिग्राफ ला विचारण्यात आला आहे.
या संबंधी 'हिंदू कॉउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया' तर्फे गौरव चव्हाण यांनी तक्रार दाखल करून ऑस्ट्रेलियन प्रेस कॉउन्सिल ला संबंधितांवर कारवाई करावी असे म्हंटले आहे.
गेल्या काही दिवसात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे अनेक प्रकार माध्यमाद्वारे घडले असून याची दखल घ्यावी, तसेच 'द टेलिग्राफ' च्या संपादक तसेच ज्या व्यक्तीने हे चित्र रेखाटले त्याने हिंदू समाजाची माफी मागावी. या लेखाचा आणि चित्राचा परस्परांशी काही संबंध दिसत नाही, त्यामुळे भावनाशून्य आर्टिस्ट कडून हे चित्र रेखाटण्यात आले असावे असेही तक्रारीत म्हंटले आहे.
हिंदू कॉउन्सिल च्या या निवेदनाला ऑस्ट्रेलियातील हिंदूंकडून जोरदार पाठिंबा मिळत असून आतापर्यंत 11,000 लोकांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतला आहे.
या प्रकरणातून दोन गोष्टी अधोरेखित होतात. एक म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावण्याचे उद्योग जसे भारतात होतात तसे अन्य देशातही होत आहे. त्याचे कारण म्हणजे हिंदुत्वाकडे मोठ्या प्रमाणात वळणारा अन्य धर्मीय समुदाय हे असू शकते. परदेशात हिंदू धर्माचे वाढते आकर्षण हा एक मुद्दा असू शकतो. आणि दुसरी बाब म्हणजे जगभरातील हिंदू समाज आता संघटितपणे आपला आवाज उठवत आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे.
हिंदू कॉउन्सिल तर्फे 'द टेलिग्राफ' विरोधात सुरू आलेली ऑनलाइन स्वाक्षरी मोहीमची लिंक..
https://www.change.org/p/daily-telegraph-the-daily-telegraph-s-blatant-insult-of-hindu-diety?recruiter=293797033
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या