@दीपक राठोड
ऐतिहासिक काळात धर्म स्थापनेसाठी जे महापुरुष होऊन गेले त्यात आदी शंकराचार्य यांचे विशेष स्थान आहे. ज्यावेळी भारतात राष्ट्रीय दृष्टीने व धार्मिक दृष्टीनेही संधिकाल उत्पन्न झाला होता, त्या वेळी आदी शंकराचार्य अवतरले. त्यांना हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक ही म्हंटले जाते.
आदी शंकराचार्य यांचा जन्म केरळ मधील कालडी गावात इ.स. ७८८ ला वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी पिता शिवगुरू आणि माता आर्यांबा यांच्या पोटी झाला. शंकर तीन वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर आईने पालन पोषण केले. बालपणी परिस्थिती हालाकीची झाली होती, त्यामुळे बालपण संघर्षमय झाले.
लहानपणापासून शंकर अत्यंत शांत, धीरगंभीर वृत्तीचे आणि तिक्ष्ण बुद्धीचे होते, शंकराच्या कंटात जणू सरस्वती विराजमान आहे अशी त्यांची वाणी होती. वयाच्या सहाव्या वर्षी ते विद्वान झाले, त्यांनी वेद कंठस्त केले होते आणि वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतलं. त्यानंतर ते भ्रमण करत ओंकारेश्वर जवळ पोहचले गोविंद भागवतपाद यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले, गुरू कडून दीक्षा घेतली, गुरूने त्यांना शंकराचार्य हे नाव दिले.
सनातन वैदीक धर्म संप्रदाय मध्ये विभागला गेला होता, राजकीयदृष्ट्या, भारत वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या राज्यांत विभागला गेला होता. वैचारिक-धार्मिक-सामाजिक फरक देखील अत्यंत होते आणि अश्या वेळी हिंदू समाज ला एकत्रीत करणे खूप मोठे आव्हान होते, पण त्या तरुण संन्यासीची इच्छाशक्ती दृढ होती. शंकराचार्यांनी त्यानंतर भारत भ्रमणला सुरवात केली. कित्येक डोंगर-दऱ्या, नद्या पार करत, पायी फिरत फिरत शास्त्रार्थ करत हिंदू समाजाला एकत्रित केले. त्यांनी शैव व वैष्णव हा वाद संपविण्यासाठी एक मोठे कार्य केले.
शंकराचार्य यांनी अद्वैत चिंतनास पुनरुज्जीवित केले. त्यांच्या मते "ब्रह्म सत्यं जगन्नमिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि आत्मा हे ब्रह्म रूप आहे. आत्मा आणि ब्रह्म यांच्यात कोणतेही द्वैत नाही. त्यांनी सांगितले आपण अज्ञानाने हे जग सत्य मानत आहोत, ज्या दिवशी हा भ्रम म्हणजे अज्ञानाचा पडदा आपल्या डोळ्यांमधून निघतो तेव्हा या संपूर्ण जगात आपल्याला केवळ आणि केवळ परब्रह्म दिसतो.
शंकराचार्यांनी धर्म रक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी भारताच्या चारी दिशेला चार मठ स्थापन केले, जे भारताला एकसूत्रतात बांधतात. जगन्नाथपुरी, शृंगेरी, शारदा, आणि बद्रीनाथ चार मठ स्थापन केली आणि त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा चालू केली. चारी मठांना एक एक वेद दिले. ऋग्वेद गोवर्धन पुरी मठ अर्थात जगन्नाथ पुरीला, यजुर्वेद श्रंगेरीला, सामवेद द्वारका मधील शारदा मठला, अर्थवेद बद्रीनाथला.
आदी शंकराचार्य यांचे काही विचार:
🔸ब्रह्म हेच सत्य आहे हे जग मिथ्या (माया) आहे.
🔸शंकराचार्य यांचे उपदेश आत्मा आणि दिव्यतेच्या एकरुपतेवर आधारित आहेत, त्यानुसार परमात्मा एकाच वेळी सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात राहतो.
🔸प्रत्येक व्यक्तीला हे समजले पाहिजे की आत्मा एखाद्या राजासारखा असतो, जो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. आत्मा या सर्वांचा साक्षीदार आहे.
🔸आत्मसंयम म्हणजे काय? जगाच्या गोष्टींकडे डोळे आकर्षित होऊ देऊ नका आणि बाहेरील शक्तींना स्वतःपासून दूर ठेवा.
आदिगुरू शंकराचार्यांनी जीवनात पाच सूत्र दिले:
🔸सेवा.
🔸साधना.
🔸 सत्कर्म.
🔸स्वाध्याय.
🔸ईश्वरप्रती भक्ती.
त्यांच्या लिखित ग्रंथांची संख्या २६२ आहे. त्यांचे काही प्रमुख ग्रंथ - ब्रह्मसूत्र भाष्य, उपनिषद् भाष्य, गीता भाष्य, विष्णु सहस्रनाम भाष्य, सनत्सुजातीय भाष्य, हस्तामलक इत्यादी.
साडे बाराशेवर्षांपूर्वी 3 वेळा भारताची परिक्रमा करणे साधारण गोष्ट नव्हती. खूप मोठे आव्हान होते, सर्व आव्हानांना तोंड देत शंकराचार्य यांनी 3 वेळा भारताची परिक्रमा केली. शंकराचार्य यांनी हिंदू समाजाला एकत्रित करून भारताला एक सूत्रात बांधले. शंकराचार्य यांनी सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या भारताला जोडण्याचे मोठे काम केले.
आदिगुरू शंकराचार्य अल्प वयाचे होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी देह सोडला. केदारनाथ जवळ त्यांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला. 32 वर्ष जगून त्यांनी युग एक निर्माण केला.
आदी शंकराचार्य यांच्या जयंती दिनी साष्टांग दंडवत.!
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या