सच्चा भीमसैनिक... दिपक सोनवणे!



आतापर्यंत काय थोडी प्रकरणं झाली आहेत का धर्मांतराची? मागच्याच आठवड्यात एका मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की आमच्या जवळच्या गावात एक हिंदू व्यक्तीने मुस्लिम तरुणीसोबत लग्न केलं आणि इस्लाम कबूल केला. असे अनेक प्रकरणे घडली आहेत. प्रेमाच्या आकर्षणापुढे लोक जीव देतात, धर्म काय कथा आली? 

पण, संभाजीनगरचं दिपक सोनवणे प्रकरण मात्र वेगळं आहे. मागच्या 20 महिन्यापासून हा मुलगा जिहादी शक्तीच्या विरोधात एकटा लढतोय. त्याची स्टोरी समजून घेतली तर लक्षात येत की त्याला जाणीवपूर्वक फसवलं गेलंय. 

या मुलाचे आतापर्यंत 11 लाख रुपये लुबाडले गेले. ज्या मुस्लिम मुलीसोबत प्रेम होतं तिच्यासह घरच्यांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याला 40 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. एवढेच काय तर त्याच्या वडिलांनाही या प्रकरणात गोवण्यात आले. त्यांनाही 20 दिवस नाहक तुरुंगात पडावे लागले. त्याच्या दोन बहिणींचे लग्न झालेय. त्यांनासुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला. अर्थात हे सगळं राजकिय ताकद असल्याशिवाय घडून येत नव्हतं.

मुलगी व तिच्या घरच्यांनी दीपक ला उचलून त्यांच्या घरी नेले, बेदम मारहाण केली, एक दिवस डांबून ठेवले होते.. नंतर एक डॉक्टरांकरवी त्याची बळजबरीने सुंता करवून घेण्यात आली. जातीवाचक शिव्या देऊन तोंड फुटोस्तोवर मारहाण केली. "इस्लाम कबूल कर, तुला जन्नत मिळेल" असे त्याला सांगितले जात होते. इस्लाम स्वीकारण्यासाठी झाकीर नाईकचे व्हिडीओ सुद्धा दाखवले. पण तरीही त्याने इस्लाम स्वीकार केला नाही. 

एका दिवशी संभाजीनगरच्या मुस्लिम खासदाराच्या घराजवळ त्याला बोलावून काही गुंडांनी मारहाण केली. खासदार महोदयांनी त्याला दम दिला. त्यांच्या बॉडीगार्डने तर दिपकच्या डोक्याला बंदूक लावून धमकी दिली. पोरगं हुशार, त्याने आधीच 100 नंबर वर कॉल केला होता. म्हणून पोलीस आले आणि घेऊन गेले. पण पोलिसांच्या समक्ष त्याला तोंडातून रक्त पडोस्तोवर मारहाण झाली. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला तरीही पोराने आपला धर्म त्यागला नाही!

मार्च 2021 पासून दिपकच्या मागे लागलेली जिहादी शक्ती अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. दीपक साठी तथाकथित पुरोगामी संघटनानी आवाज उठवायला पाहिजे होता. पण "जय भीम जय मीम" मध्ये मश्गुल असलेल्या संघटनांकडून दिपकला निराशाच मिळाली. पोलिसांकडे तो दोनवेळा तक्रार घेऊन गेला पण मुस्लिम खासदाराचे नाव आले की पोलीस तक्रार घेईनात. त्यामुळे प्रशासनाकडूनही दिपकवर अन्यायच झाला. 

शिक्षण आणि करिअरसाठी केलेली आर्थिक जमापुंजी लुटल्या गेली. स्वतःचा लॅपटॉप मोबाईलही त्या लोकांनी बळकावला. लग्न झालेल्या बहिणींच्या मागे काही कारण नसता ही ब्याद लागली. वडिलांना आपल्यामुळे तुरुंगात जावे लागले. जीव मुठीत घेऊन कसंतरी जगणं सुरू आहे. आज ना उद्या आपल्या जिवासोबत काहीतरी बरेवाईट होण्यापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आणि स्वधर्मात असतानाच जीवन संपवून टाकावे असा निर्णय दिपकने केला. परंतु एका हितचिंतकामुळे आशेची किरण त्याला मिळाली आणि सज्जन शक्तीच्या मदतीने न्यायासाठी संघर्ष सुरू झाला. अजूनही पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नाहीये हे चिंताजनक आहे. न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा दिपक ने दिला आहे. 

अनन्वित अत्याचार, छळ, शारीरिक मानसिक पीडा होऊनही स्वधर्मनिष्ठा बाळगणाऱ्या दिपकचा अभिमान वाटावा तितका थोडाच. आता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपला आवाज बुलंद करूया. असे अनेक दिपक आजही जिहादच्या विळख्यात अडकलेले आहेत. दिपकचा यशस्वी लढा त्यांनाही प्रेरणादायी ठरू शकतो!

दिपकला न्याय मिळायलाच पाहिजे. एट्रोसिटी अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे!

- निखिल आठवले

#JusticeForDeepak 
#MuslimAtrocitiesOnDalit 
#lovejihad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या