संभाजीनगर।
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे नावाच्या तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना ताजी असतानाच संभाजीनगर शहरातील दिपक सोनवणे हा तरुण सुद्धा जिहादी शक्तीशी झुंज देत आहे. लग्न करायचं तर इस्लाम स्वीकार कर अशी बळजबरी त्याच्यावर झाली. दीड वर्षात पीडित दिपककडून 11 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. इस्लाम कबूल करावा म्हणून त्याला प्रचंड मारहाण, धमक्या व बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या कुटुंबाला व त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला.
त्याला व त्याच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात जेल सुद्धा झाली. गेल्या दीड वर्षांपासून हा पीडित तरुण अमानवी जिहादी शक्तीच्या क्रौर्याला सामोरा जातोय. पोलीस प्रशासन, न्यायालयकडून त्याला अजूनही अपेक्षित मदत होताना दिसत नाही. 'आपण ही शेवटची लढाई लढतोय, न्याय मिळाला नाही तर सहकुटुंब आत्मदहन करू' असा इशारा त्याने दिलाय.
मागील 20 महिन्यापासून हा जिहादी जाच सहन करत असलेल्या दिपकने आपली स्वधर्मावर आणि पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. आपण कोणताही अन्य धर्म स्वीकारू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
पीडित दिपकला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येताना दिसत आहे. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कडून दिपकला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. डेमोक्रॅटिक पीपल्स मूव्हमेंटकडून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सहकार मंत्री अतुल सावे यांनीही मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. पीडित मुलाला लवकर न्याय मिळाला तर ठीक नाहीतर भाजपा आंदोलन करणार अशी प्रतिक्रियाही भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी दिली. दरम्यान अजूनही आरोपींवर गुन्हे दाखल झालेली नाही.
--- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या