डॉ. आंबेडकरांशी विश्वासघात करणारी काँग्रेस


- प्रशांत पोळ

आज १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. सध्या अनेक राज्यांत निवडणुकीचे वातावरण आहे. काँग्रेसचे नेते आज डॉ. आंबेडकरांच्या  प्रतिमेला  माल्यार्पण करायला अवश्य येतील. त्यांना तसे करण्यापासून रोखले पाहिजे. त्यांचा बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याचा काही एक अधिकार नाहीए. ज्या काँग्रेसने बाबासाहेब जिवंत असतांना त्यांचा सतत अपमान केला, त्यांची उपेक्षा केली आणि त्यांच्या मृत्यूच्या ६७ वर्षानंतर ही जे  संविधानाच्या कलमांमधे बदल करण्याच्या नावाखाली, त्यांचा अपमान करीत आहेत, ते कोणत्या नैतिक अधिकाराने बाबासाहेबांच्या नावावर मते मागू शकतात?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही काँग्रेसने बाबासाहेबांचा उघड-उघड विरोधच केला. स्वातंत्र्य पूर्व  काळात  त्यांच्या आग्रहाच्या विरोधात महात्मा गांधींनी उपोषण ही केले होते आणि बाबासाहेब त्यांना शरण येतील, याची पूर्णपणे तजवीज केली होती. हाच ‘पुणे करार’ म्हणून ओळखला गेला आहे. ‘व्हॉट काँग्रेस एंड गांधी हैव डन टू द अनटचेबल्स?’ (काँग्रेस आणि गांधीजींनी अस्पृश्यांच्या साठी काय केले?) या पुस्तकात, बाबासाहेबांनी गांधीजी आणि काँग्रेस या दोन्हींच्या छद्मीपणावर जोरदार हल्ला केलेला आहे.  त्यांनी  काँग्रेसवर   ढोंगीपणा करीत असल्याचा आरोप केलेला आहे.

हे तर बरं झालं की इंग्रजांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सरकार बनले, त्यामुळे काँग्रेसला बाबासाहेबांना सरकार मधे म्हणजेच मंत्रीमंडळात कायदामंत्री म्हणून ठेवणे भाग पडले. एकट्या नेहरुंची  एकाधिकारशाही चालली असती तर बाबासाहेबांना कधीच मंत्री बनता आले नसते.  तद्नंतर नेहरुंच्या काँग्रेसने अगदी ठरवून व आपली सर्व शक्ती पणाला लावून १९५२च्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभा क्षेत्र बॉम्बे नार्थ मधून बाबासाहेबांचा पराभव घडवून आणला. (काँग्रेस ने, बाबासाहेबांच्या पूर्वाश्रमीचे मदतनीस  नारायण सदोबा काजरोलकर यांना तिकीट दिले होते. त्यांना जिंकवून आणण्यासाठी व पर्यायाने बाबासाहेबांना हरविण्यासाठी त्या लोकसभा क्षेत्रात दोनदा प्रचारसभा घेतल्या. ही निवडणूक बाबासाहेब फक्त १४००० मतांनी हारले होते. याच काजरोलकरांना  काँग्रेस ने बाबासाहेबांच्या विरोधात दलित नेता बनविण्यासाठी अथक प्रयत्न केलेत.. १९७० मधे काजरोलकरांना ‘पद्म भूषण’ चा पुरस्कार देऊन  भारत सरकारकडून गौरविण्यात आले.(का? त्यांनी बाबासाहेबांना पराभूत केले म्हणून..?)  

बाबासाहेबांना  काँग्रेस ने नेहमीच उपेक्षित ठेवले होते.  त्यांची मानहानी करण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली गेली नाही.  १९५४  मधे महाराष्ट्रातील भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत जेव्हा त्या मतदारसंघातील त्यांच्या अनुयायांची संख्या भरपूर होती, काँग्रेसने या पोटनिवडणुकीतही बाबासाहेबांना जिंकू दिले नाही. शेवटी इतर मित्र पक्षांच्या सहाय्याने ते प. बंगालमधून राज्यसभेवर निवडून आले. यानंतर १९९० मधे भाजपाच्या पाठिंब्याने वी पी सिंह यांचे सरकार बनले, तेव्हा बाबासाहेबांना मरणोत्तर  ‘भारतरत्न’  या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

बाबासाहेबांना  काँग्रेस ने कशी वागणूक दिली होती,  हे समजण्यासाठी  त्यांनीच लिहिलेला हा परिच्छेद बघा…..
 “Having led the untouchables against the Congress for full five years in the Round Table Conference and in the joint Parliamentary Committee, I could not pretend to be unaffected by the results of the elections. To me the question was: Had the untouchables gone over to the Congress. Such a thing was to me unimaginable. For, I could not believe that the untouchables-apart from a few agents of the Congress who are always tempted by the Congress gold to play the part of the traitor — could think of going over to the Congress en masse forgetting how Mr Gandhi and the Congress opposed, inch by inch up to the very last moment, every one of their demands for political safeguards.”

जिवंतपणे  बाबासाहेबांना  न चूकता वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या काँग्रेस ने त्यांना मृत्यू नंतर ही नाही सोडले.

बाबासाहेब कलम ३७० च्या विरोधात होते. शेख अब्दुल्ला, नेहरू और कृष्णा स्वामी अय्यंगार यांसारख्या काँग्रेस च्या नेत्यांच्या विशेष आग्रहामुळेच त्यांनी अनिच्छेनेच या कलमाचा संविधानात तात्पुरत्या स्वरुपात  समावेश केला होता. परंतु त्यांचे असे मत होते की हे कलम लवकरात लवकर संविधानातून काढून टाकले पाहिजे….आणि लगेचच काँग्रेस ने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन देऊन टाकले की हे ३७०कलम संविधानातून कधीच काढून टाकले जाणार नाही. 
 
संविधान सभेच्या बैठकांच्या वृत्तान्तात असे लिहिले गेले आहे की बाबासाहेबांनी देशद्रोहाच्या सर्वच कलमांविषयी खूपच आग्रहाची भूमिका घेतली होती आणि सर्वच कलमांचे स्वरुप अतिशय कडक राहिल याची तजवीज केली होती.  गेल्याच आठवड्यात  काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम   124 A  काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.!

याचाच अर्थ स्पष्ट आहे की  काँग्रेस ने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व त्यांनी लिहिलेल्या संविधानाची नासधूस केलेली आहे. ..यामुळेच त्यांना  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  प्रतिमे ला  हार  घालण्याचा काही एक अधिकार नाही. खरेखुरे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत  तर या ढोंगी  काँग्रेसींना माल्यार्पण करण्यापासून रोखायला हवे.

- प्रशांत पोळ
( ज्येष्ठ लेखक व विचारवंत )

@विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

विकास फडके म्हणाले…
डॉ आंबेडकर यांच्याऐवजी काँग्रेस केंद्रित लेख आहे हा, जणू trolling च !