चिनी मालावर बहिष्कार टाकून आपल्या कृतीतून चीनला धडा शिकवण्याचे सोनम वांगचुक यांचे आवाहन

देवगिरी।  भारतातील सुप्रसिद्ध संशोधक सोनम वांगचुक ह्यांनी भारतीय जनतेला, गत सप्ताहांतील लडाख भागातील सीमेवरील चीनी अतिक्रमणाला 'चीन निर्मित' (मेड इन चायना) मालावर बहिष्काराने प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले आहे. 'थ्री इडिअट्स' ह्या यशस्वी चित्रपटातील 'फुन्सुक वांगडू' ह्या पात्रामागील प्रेरणा असणारे सोनम वांगचुक म्हणाले, "एका सप्ताहात सर्व चीनी सॉफ्टवेअर त्यागुन, पुढील वर्षभरात चीनी हार्डवेअर्सला आपण वापरायचे सोडले पाहिजे. आपण स्वतःचा चलभाष (मोबाईल) एका सप्ताहात त्यागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामागील काही आवश्यक कारणेही त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, "आपले सैनिक एकिकडे सीमेवर चिनी उद्दामपणाला उत्तर देऊन लढताहेत, नि आपण दुसरीकडे टीकटॉकसारखे चीनी सॉफ्टवेअर वापरतो, चीनी हार्डवेअर खरेदी करतो. अप्रत्यक्षपणे आपल्या सैनिकांविरुद्ध आपण चिनी सैनिकांना शस्त्रसज्ज करविण्यासाठी कोट्यवधिंचा पैसाच मिळवून देत आहोत! हिमालय नि सिंधु नदीची पार्श्वभूमी असलेले, लडाखमध्ये चित्रित त्यांचे हे चलचित्र (व्हिडीओ) समाजमाध्यमांवर खूप प्रसारित झाले आहे. 

एका आठवड्याच्या आत मीही माझा चलभाष  (मोबाईल) त्यागणार असल्याचं सोनम वांगचुक यांनी सांगितले आहे. तसेच हा संदेश अन्य १०० नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सीमेवर तणाव वाढतोय...सहस्त्रावधी सैनिक नियुक्त केले जाताहेत. सामान्यत आम्ही सीमेवर तणाव असताना सैनिक ह्यास प्रत्युत्तर देतील असा विचार करीत झोपतो. पण आज मला सांगावेसे वाटते की, चीनला त्याच्या मुजोरील आपण नागरिकांनीही प्रत्युत्तर द्यायला हवे."

भारतीयांच्या शस्त्रबळापेक्षा क्रयशक्ती अधिक लाभदायी ठरेल. जर भारतीय नागरिक चीन निर्मित वस्तुंवर बहिष्कार करतील आणि याचे रूपांतर जेव्हा एका चळवळीत होईल तेव्हा ह्याचा प्रभाव जागतिक स्तरावर जाणवेल. आपल्या श्रमिक नि उद्योगांनाही याचा लाभ होईल असे त्यांनी म्हंटले आहे."

स्रोत - न्यूज भारती
अनुवाद - शुभम गरुड 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या