भारत विकास परिषदेची पीएम केअर्स फंडमध्ये २.११ कोटी रुपयांची मदत

देवगिरी। जोपर्यंत सरकार व प्रशासनासोबत सोबत सामाजिक संघटना सोबत मिळून काम करणार नाहीत तोपर्यंत विकासाची गती वाढणार नाही असे म्हंटले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारत विकास परिषदेने याच अनुषंगाने एक प्रेरणादायी कार्य केले आहे. कोरोना आपत्ती निवारण हेतू पीएम केअर्स फंडमध्ये तब्बल २.११ कोटी रुपयांची मदत भारत विकास परिषदेतर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत विकास परिषदेचे या कार्याचे कौतुक केले आहे. 

मागील सहा दशकांपासून अविरत समर्पण हेतू भारत विकास परिषदेने कार्य केले आहे. जेव्हा जेव्हा काही संकटे उद्भवतात, महापूर, दुष्काळ, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत विकास परिषद समाजसेवा करण्यासाठी अग्रस्थानी राहिली आहे, अश्या शब्दात डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत विकास परिषदेच्या कार्याचा गौरव केला. कोरोना आपत्ती काळात भारत विकास परिषदेने गरजूंना मोफत राशन, सॅनिटायझर, मास्क, औषधी व जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरविल्या आहेत. भारत विकास परिषदेने दिलेल्या आर्थिक मदतीद्वारे समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

भारत विकास परिषदेचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. सामाजिक संघटना जोपर्यंत सरकार व प्रशासनासोबत मिळून कार्य करत नाही तोपर्यंत विकासाची गती वाढणार नाही. जगातील अनेक देशातील व्यवस्था सरकार केंद्रित आहेत. समाज सरकारवर अवलंबून आहे. भारतात मात्र थोडे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील बऱ्याच सामाजिक संघटना आता सरकारसोबत मिळून मिसळून काम करत आहेत. नागरिक स्वतःची जबाबदारी समजून पुढाकार घेताना दिसतात. भारताच्या संस्कृतीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे की येथील समाज, नागरिक या देशाला आपली मातृभूमी मानतात व संकटाच्या काळात निस्वार्थपणे पुढे येतात. यातील सहभागीता मात्र अधिकाधिक वाढवावी लागणार आहे. सामाजिक संघटनांची ही सहभागीता भविष्यात एक नवा सकारात्मक बदल नक्कीच निर्माण करू शकेल. 

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या