विजयादशमी‌‌‍‌-संघ स्थापनेच्या संदर्भात विशेष



@ नरेंद्र सहगल

वर्तमान राजकीय परिवर्तनाचा परिणाम म्हणून आमचा भारत हा "नवीन भारत" च्या गौरवमयी स्वरूपाकड़े वाटचाल करीत आहे. शेकड़ो वर्षाच्या पारतंत्र्याच्या कालखंडात भारत आणि भारतीयतेच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा अर्पण करणाऱ्या कोटी कोटी भारतीयांचा जीवनाचा उद्देश्य आज साकार रूप घेत आहे. भारत आज पुन्हा भारतवर्ष (अखंड भारत) होण्याच्या मार्गावर तीव्रतेने पाऊल टाकत आहे. भारताची सर्वांग स्वतंत्रता, सर्वांग सुरक्षा आणि सर्वांग विकासासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न होत आहेत. वास्तविक पाहता हेच कार्य संघ सन १९२५ पासून अविरत आणि न झुकता करित आहे. विजयादशमी किंवा दसरा हा संघ स्थापनेचा दिवस आहे. स्थापनेपासून तर आज ९५ वर्षाच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नाच्यां परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्र जागरणाचा एक शांत पण सशक्त आंदोलन बनलेला आहे. प्रखर राष्ट्रवादी भावनने अंतर्बाह्य प्रेरित डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी स्थापित केलेले संघाचे स्वंयसेवक आज भारताच्या कानाकोपऱ्यात देशप्रेम, समाज-सेवा, हिन्दू जागरण आणि राष्ट्रीय चेतना जागी करीत आहे. कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अत्यंत विस्तृत व विशाल हिंदू समाज आणि अनेक पंथ, मत, संप्रदाय, अनुयायी या सर्वांना एक विजयशालिनी शक्तिरूपात उभी करण्यात संघाने यश प्राप्त केले आहे.

ह्या शक्तिशाली हिंदू संगठनची पायाभरणी करण्या आधी याचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी भारताच्या प्राचीनतम गौरवशाली इतिहास, संस्कृति, महान ग्रंथ, देशाचं परमवैभव आणि पतन यांच्या कारणांची मीमांसा आणि तात्कालिक केविलवाणी अवस्था याचं सखोल अभ्यास करून मनन, चिंतन, अनुभव याचं संगम आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

संघ कार्यामध्ये व्यक्तिपूजा किंवा व्यक्तीला गुरु स्वीकारणे या गोष्टींना जागा नाही. संघाने भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रीयतेचा प्रतीक भगव्या ध्वजाला स्वतःचा गुरु आणि प्रेरणेचा स्त्रोत स्वीकार केलेला आहे. समाज जागरणाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राला परम वैभवशाली बनविणे हा संघाचा उद्देश आहे.

*भारतीय शौर्याची कलाटणी*

संघ स्थापनेच्या पूर्वीही राष्ट्र जागरणाचे अनेकानेक प्रयत्न होत राहीलेले आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या प्रयत्नांतून परकीयांना पराभूत केले आणि मौर्य साम्राज्याची स्थापना करून अखंड भारताचे वास्तविक प्रकट रूप समोर आणून ठेवले. दक्षिण भारतामध्ये स्वामी विद्यारण्य यांच्या महत कार्यामूळे परिणामी विजयनगर हा अत्यंत ताकदवान व वैभवशाली साम्राज्य अस्तित्वात आला होता. तर, राजस्थान मध्ये महाराणा सांगा, महाराणा प्रताप यांनी दुष्ट परकीय मोगली सत्तेला आव्हान उभं करून येऊ दिलं नाही आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित ठेवली. याचं प्रकारे समर्थ गुरु रामदास सारख्या संतांच्या प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि राष्ट्रीय जागरणाच्या संघर्षाची सुरूवात झाली. श्री गुरु गोविंदसिंग यांनी खालसा पंथ स्थापन करून त्या द्वारे लढवय्या शिखांनी बलिदानाची जणू एक अनंत श्रृंखलाच उभी करून परकीय आक्रमणापासून हिंदू धर्म आणि राष्ट्रीय अस्मिता रक्षण सारखे महत्कार्य यशस्वीपणे पार पाडले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने राष्ट्र जागरणाच्या ह्याच संघर्ष आणि गौरवशाली परंपरेला पुढे नेलं आहे.

वरील विषयाच्या संदर्भात एक बिंदू वर विचार करणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे राष्ट्र जागरणाच्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये एकसूत्रता याचा अभाव सदैव जाणत राहीला आहे. पारतंत्र्याच्या कारणमीमांसा केल्याविनाच पारतंत्र्याला संपवण्यासाठी प्रयत्न होत राहीले.

*परकीय आक्रमकांना यश का मिळाले?*
*राष्ट्र खंडित का झाला?*
*देश विभाजन का केलं गेलं*?
*बल,बुद्धी,ज्ञान, विज्ञान सर्व काही असूनही जगतगुरु भारत पारतंत्र्याच्या साखळदंडात का जोखड़ला गेला.* 

संघाने या सर्व प्रश्नांची उत्तरे भारतीयां समोर ठेवलं आहे.

*भारताची ओळख आहे हिंदुत्व*

संघाने या ऐतिहासिक सत्याला जगासमोर पूर्ण दृढ़तेने ठेवले आहे की भारत हा सनातन काळापासून चालत आलेला एकमात्र हिंदू राष्ट्र आहे. हिंदुत्व हेच भारताचे राष्ट्रीयत्व आहे. भारताचा वैभव, उत्कर्ष आणि पतन हा हिंदुंच्या वैभव, उत्कर्ष आणि पतनाशी घट्ट जुळलेला आहे.
जेव्हा हिंदू समाज संघटित, शक्तिशाली होता तेव्हा शक, सूत सारख्या आक्रमकांना ही परास्त करून त्यांना भारतीय जीवन शैली मध्ये समरस करून घेतलं गेलय. पण जेव्हा हाच हिंदू समाज आप आपसातील मतभेद, फूटमध्ये पडला आणि प्रतिकारशक्ती लुप्त झाली व सांस्कृतिक राष्ट्रीयत्व ची ज्योत क्षीण झाली तेव्हा भारत अफगाण, तुर्क, पठान, मुघल सारख्या बर्बर जातिंच्या हाती पराभूत ही झाला.

याच एकमेव कारणमुळे इंग्रज ही भारताला आपल्या ईसाई जाळ्यात जोखड़ण्यात यशस्वी झाले. तरीही, पारतंत्र्याच्या कालखंडात ही आपल्या हिंदू समाजाने गुलामगिरी ला कधीही स्वीकारले नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारे संघर्ष चालूच होता. फक्त राष्ट्रीय स्तरावर संघटित प्रतिकाराचा अभाव होता.

इंग्रजी काळखंडात गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय समाजाने राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयत्न केले,पण सांस्कृतिक राष्ट्रीयत्वचा वास्तविक स्वरूपात हिंदुत्व चा आधार नसल्याने या स्वतंत्रता संग्रामाचा परिणाम भारताच्या विभाजन मध्ये झाला. म्हणून हे स्वीकारणे योग्यच आहे की संघाने हिंदुत्वाला राष्ट्र जागरणाचा आधार बनवून भारतीय समाजाला राष्ट्रीय दिशा देण्याचे कार्य केले आहे. आणी "नवीन भारत"च्या निर्माणाची आधारशिला ही हिंदुत्व हेच आहे. 

*राष्ट्र प्रथम,नंतर संघठन*

राष्ट्र निर्माण कार्य तोच संघठन करू शकतो ज्याचाकड़े कार्यकर्ता निर्माण करण्याची चिरव्यवस्था आहे. संघ पूर्व काळात राष्ट्र जागरण कार्यात सातत्यने चालणारी व्यवस्था नव्हती. संघ कार्यपद्धति मध्ये शाखा एक असा अभिनव उपक्रम आहे की ज्यात शिशु, बाल, तरूण, वृद्ध हे स्वंयसेवक बनत राहतात आणि राष्ट्रीय चरित्र व संस्कार होऊन राष्ट्र जागरण काम करतात. ह्याच कारणामूळे संघसंस्थापक डॉ. हेडगेवार गेल्यानंतर ही संघकार्य न थांबता उलट वाढत राहीले. संघकार्य हा व्यक्ति, जाति, परिवार,आश्रम केंद्रीत नसून राष्ट्र केंद्रीत आहे. संघकार्य हा राष्ट्र जागरणाचा असल्यामूळे संघाने स्वातंत्रयलढ्यात ही पुढाकाराने सहभाग घेतला होता, तो ही स्वतःची कोणतीही ओळख ना दाखवता संघ स्वंयसेवकांनी सत्याग्रहात सहभाग घेतला होता. 
स्वातंत्रयानंतर ही संघाने आपल्या विशाल संगठन शक्ति चा उपयोग गोवा मुक्ती गौसेवा, श्रीरामजन्मभूमिआंदोलन सारख्या सांस्कृतिक कार्यात केलेले आहे, हे सर्व कार्य राष्ट्र जागरणा मूळेच शक्य झाले. परकीय आक्रमणाच्या वेळी जनतेचा मनोबल वाढवणे असोत की सैन्याला मदत करायची असेल किंवा सरकारची पाठ थोपायची असो संघ सदैव तत्पर राहीला आहे.

*संघाचे अष्टपैलू स्वरूप*

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारे केल्या जाणारा राष्ट्रव्यापी राष्ट्रीय जागरणाचा कार्याला समजण्यासाठी याच्या अष्टपैलू स्वरूपाला समजणे गरजेच आहे. संघकार्याचा प्रथम आणि प्रत्यक्ष रूप आहे   संघाची एक तासाची देश भक्ति चे संस्कार देणारी शाखा.ही शाखा एक तेजपुंज सारखी आहे, ज्यातून देश भक्तिची लहर समाजा प्रदीप्त करते. शाखे मध्ये होणारे कार्यक्रम जैसे की सांघीक खेळ, पद्य, गीत, सुभाषित, सुविचार, एकात्मता मंत्र, एकात्मता स्त्रोत घोषणा या मूळे भारताचा आध्यात्मिक दर्शन होता तैसे राष्ट्रीय एकता व सामाजिक सौहार्द ही निर्माण होतो. महापुरूषांच्या स्मरण करून भारत मातेची वंदना केली जाते.

शाखेतील शारिरीक खेळांची रचनाच अशी केलेली आहे की ज्यामूळे शरीर बल वाढतोच बरोबरच आपल्या देश व समाजासाठी कोणत्या ही परिस्थितित काम करण्याची शरीर व मनाची तैयारी होत असते. संघाद्वारे विकसित या शाखा तंत्राने राष्ट्र जागरण कार्यात विशाल हिंदू समाजाला संगठित तर केलेच त्याच बरोबर विधर्मी लोकांच्या हल्याला प्रतिकार शक्ति ही विकसित केली. 

*संघकार्याचा दुसरा स्वरूप*

म्हणजेच संघ द्वारा मार्गदर्शित व प्रेरित अन्यक्षेत्र, 
जसे की,अ भा वि प, किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, विहिप, बजरंग दिल, भाजपा, विज्ञान भारती, कला भारती, क्रीडा भारती, मजदूर संघ तैसे साहित्य, लेखन, इतिहास सारख्या सर्व क्षेत्रात संघ स्वंयसेवकांनी लहान मोठे संगठन उभे केले आहे आणि हे सर्व आपल्या क्षमतानुसार आपल्या क्षेत्रात राष्ट्र जागरणाचा कार्याला वाढवित आहे.

संघकार्याचा तीसरा स्वरूप आहे संघस्वंसेवकांद्वारे वैयक्तिक स्तरावर केले जाणारे राष्ट्र जागरणाचे कार्य.

या श्रेणीत शाखा, संस्था, मंदिर, रक्तपेढ़ी,महाविद्यालय, औषधसेवा, स्वास्थ्यसेवा, रूग्णसेवा, सांस्कृतिक सेवा, पाणी व्यवस्था, चारा छावनी, पूर्वांचल विकास,भारत दर्शन इत्यादि अनेक प्रकल्प राबविले जातात,या सर्व कार्यांच्या मागे राष्ट्रीय एकता, सेवा, हिंदुत्व यांची प्रेरणा असते. 

संघकार्याचा चौथा आणी सर्वात महत्वाचा आणी विशाल स्वरूप म्हणजे तू सर्व कार्य ज्याचात सर्व अभियान, आंदोलन, संगठन, सम्मेलन, धर्मसम्मेलन, धर्मसभा, धार्मीक संघटना जे संघाचेच कार्य हिंदू संगठन आणी उद्देश्य परमवैभवशाली भारत याच्या साठी अहोरात्र कार्यरत आहेत. या सर्व संगठनाना संघाचा सहयोग, मार्गदर्शन व प्रेरणा असते. तसेच संघाचे स्वंयसेवकही एक देशभक्त नागरिक या नात्याने या विविध संगठनां मध्ये आपला सहभाग व सक्रीयता नोंदवितात तोही कोणतीही नाव, प्रसिद्धिची, लाभाची अपेक्षा न ठेवता.

*तपस्येची परिणीती*

संघाच्या स्वंयसेवकांनी ९४ वर्षाच्या अथक परिश्रमाने व तपश्चर्येने भारतात हिंदुत्व आणी राष्ट्र जागरणाचा एक अत्यंत ताकदवान आधारशिला तयार केली आहे, ज्यामूळे राष्ट्र जागरण चे नवीन पर्व किंवा अध्याय सुरू झालेलं आहे. संघाने संपूर्ण भारतीय समाजाला नवीन दिशा प्रदान केली आहे, ज्याने राष्ट्रीय जीवनाची ती दशा बदलली की ज्यामूळे भारत हा सतत शेकड़ो वर्ष परकीयांपासून पराभूत होत होता. सर्वांग अजेय शक्तिला प्राप्त करत असलेला भारत वास्तविकरित्या आज अजेय भारत बनत आहे. स्वदेशातून सुदेश कड़े वाटचाल होत आहे. संघाने राष्ट्र जीवनाच्या क्षेत्रात व्याप्त प्रत्येक दुविधा व हीन भावनेला छेद देऊन एक नवीन शक्तिशाली समाजाची उभारणीसाठी मौन चळवळ उभी केली आहे. राष्ट्रिय शक्तिनां बळ प्राप्त होत आहे, अराष्ट्रिय शक्ति एकाकी व हतबल होत आहे. आज प्रत्येक भारतीयाला हा विश्वास आहे की आपली सर्वांग सुरक्षा, सर्वांग स्वतंत्रता व सर्वांग विकास कार्यात झटलेले स्वंयसेवक लवकरच आपल्या साध्याला प्राप्त करतील व भारत मातेला पुन्हा परमवैभवशाली विश्वगुरू च्या पदावर शोभायमान करतील.

(लेखक स्तंभकार व वरिष्ठ पत्रकार आहेत)
आर एस एस चंद्रगुप्त चाणक्य डॉ हेडगेवार  शाखा, संघ शाखा समर्थ गुरू रामदास स्वतंत्रता आंदोलन स्वंयसेवक.

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या