संभाजीनगर येथे ४२ बंधू भगिनींनी उचलला खारीचा वाटा
देवगिरी। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण महाभियान सुरू झाले. या अभियानात देशभरातील सर्व समाज मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रकारे आता स्मशानजोगी समाजाने ही अभियानात पुढाकार घेतला असून स्मशानजोगी समाज समयदान व धनदान करून आपला खारीचा वाटा उचलणार असे स्मशानजोगी समाजाचे प्रतिनिधी गोविंद गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवार रोजी भटके विमुक्त समाजाची कॅनाॅट गार्डन येथे बैठक झाली. यावेळी जमलेल्या ४२ बंधू भगिनींनी आपल्या स्वेच्छेने निधी समर्पण करत अभियानात खारीचा वाटा उचलला.
या बैठकीत श्रीराम जन्मभुमी निधी समर्पण या विषयी माहिती दिल्यानंतर आलेल्या समाज बांधवांपैकी स्मशानजोगी समाजाचे प्रतिनिधी गोविंद गायकवाड यांनी यासाठी सर्व समाज बांधवांना एकत्र बोलवून समर्पण करण्याची ईच्छा व्यक्त केली. या बैठकीत ४२ जण (महिला व पुरूष) उपस्थित होते.
सुरूवातीला चव्हाण पी एस् यांनी समाज एकत्र येण्याचे फायदे, समाजातील जागरूकता तसेच शिक्षणाचे महत्व सांगितले. दुर्गादासजी गुडे यांनी स्मशानजोगी समाजातील सर्वांनी एकत्र येणे व इतर समाजाच्या प्रमुखांशी संपर्क ठेवण्याचे तसेच शहरातील हिंदु समाजातील सर्वांना भेटण्याचे आवाहन केले. रामजन्मभुमी समर्पण अभियानाचे पुरूषोत्तम अस्वले यांनी रामजन्मभुमी इतिहास व न्यायालयीन लढा याबाबत सांगून आपणही समर्पण देण्याचे सांगीतले. समाजाचे गोविंद गायकवाड यांनी प्रभु श्रीराम सर्वांचे असून यासाठी अंदाजे ५०० वर्ष लढा व निकालानंतर हे काम होत असल्याचे सांगितले व समाज लहान असला तरी खारीचा वाटा देईल व प्रत्येकाने निधी द्यावा असे सांगितले उपस्थित बांधवानी स्वखुशीने समर्पण केले.
यासाठी पुंडलीकजी धनकर, मोहन गोजमगुंडे, वस्ती अभियान प्रमुख नितीन खरात, नगर अभियान प्रमुख कैलाशजी अंभोरे तसेच समाज बांधव राजू पवार, शंकर शेळके, रामू गायकवाड, साहेबराव पवार राजाराम गायकवाड, अनिता गायकवाड, राधा गायकवाड रेणुका पवार, लक्ष्मी पवार इ. उपस्थीत होते.
यातील साहेबराव पवार हे गृहस्थ स्वतः अयोध्येतील १९९२ च्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले.

0 टिप्पण्या