निधी संकलन करण्यासाठी जामनेर येथे मातृशक्तीही सज्ज!


जामनेर। शहरातील गणपती नगर याठिकाणी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित महिलांनी अभियानात रामसेवक म्हणून समयदान करण्याचा व धनदान करण्याचा संकल्प केला. शहरातील समर्थ महिला बचत गटातील महिलांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता.



या कार्यक्रमप्रसंगी शामचैतन्यजी बापू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. योगेश देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले. कार्यक्रमात राम-लक्ष्मण-सीता व लव कुश यांचा सजीव देखावा करण्यात आला होता. प्रथम राम प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंतर प्रा. योगेश देशपांडे यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली व उद्यापासून सर्व महिला व गणपती नगर भागातील रहिवाशांकडून घरोघरी संपर्क करून निधी संकलन करण्याचे ठरले. यावेळी रामरक्षा व राम आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सौ. अंजूताई पवार यांनी रामरक्षा तसेच महिलांना निधी संकलनासाठी सहभागाचे आवाहन केले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. रामखिचडी प्रसादाचा सर्वांनी याठिकाणी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जामनेर रा. संघाचे तालुका कार्यवाह निलेश माळी, संत श्री श्याम चैतन्य बापू महाराज, तालुका निधी संकलन सह अभियान प्रमुख गजानन माळी, जामनेर तालुका राष्ट्र सेविका समितीच्या आरती देशपांडे, समर्थ महिला बचत गट गणपती नगर सेक्टर नं 3 व गणपती नगर सेक्टर 3 महिला मंडळ यांनी कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या