श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान फुलंब्री शहरात सुरवात करण्यात आली. तेव्हा प्रथम निधी संकलनाची 100 रुपयाची पावती स्मशान भूमीत काम करणारे श्री गंगाराम पवार यांच्या योगदानातून सुरू केले.
लोकांचे अंत्यसंस्कार करून व इतर वेळेत घरो-घरी अन्यधान्य मागून आपली उपजीविका चालवणारे श्री गंगाराम यांच्या साठी 100 रु खूप आहेत, पण त्यांच्याही मनात श्रीरामाबद्दल असलेली भक्ती आणि मंदिरासाठी त्यांनी दिलेली देणगी ही समाजाच्या मनामनातील राम व श्रद्धा दर्शवणारी आहे.
श्रीरामा बद्दल ची भक्ती लोकांमध्ये ही विषमता विरहित आहे. सर्वांमध्ये श्री राम एकच आहे हे ह्या प्रसंगाने सिद्ध केले. आणि जेव्हा हे मंदिर पूर्णत्वास येईल तेव्हा त्याचे पावित्र्य आणखीन वाढेल कारण त्या मध्ये देणगी जरी वेगवेगळी असेल पण भाव मात्र एक असेल.
मुख्यतः आपल्या समाजातले असे लोक जे आपला उदरनिर्वाहा साठी ईकडे तिकडे भटकत असतात पण श्रीराम बद्दल ची आसक्ती थोडी सुद्धा कमी होउ देत नाही. त्यातले श्री गंगाराम हे एक आहेत.
0 टिप्पण्या