लोक तिला मनोरुग्ण म्हणतात, अन तिनं रामासाठी केलं धनदान!


#नायगाव शहरात श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियानानिमित्त भव्य शोभायात्रा झाली. साधुसंत, मान्यवर, रामभक्त सर्वजण उपस्थित होते. सर्व यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. समर्पण सुरू झाले. परंतु या सर्व समर्पणामध्ये एक असे समर्पण होते जे आयुष्यभर सर्वांना लक्षात राहील.

सुरेखा नावाची एक स्त्री नायगाव मधे फिरत असते. ना घर ना दार. अनाथ जीवन जगणारी. लोकांना नेहमी भांडत, शिव्या देत, फिरत राहणारी. लोकांकडून 5-10 रुपये मागून जीवन जगणारी. लोकं म्हणतात की ती मनोरूग्ण आहे. हो मनोरूग्ण.

निधी संकलन चालू होते व ती तेथे आली. तीचा पोशाख नेहमी सारखा मळकट, अस्वच्छ. तिला पाहताच मी थोडा घबरलो. ती काही तरी वेगळेच बोलणार असा अंदाज बांधला. हिला इथून हाकलून द्यावं लागणार असा विचारच चालू होता, तेवढ्यात खिशात हात घालत ती म्हणाली "ओ

भाऊ ५० रुपये देऊ का मी माझ्या रामाला? तिचे शब्द कानावर पडले व मी स्तब्धच झालो! काय बोलू काही समजत नव्हते.

एक कार्यकर्ता बोलला मावशी १०० रुपये च्या वर द्यावे लागतील तरच पावती देता येईल. यापेक्षा लहान पावती आमच्याकडे आता नाहीये. आम्ही ५० रुपये घेऊ शकत नाही. तिने थोडा विचार केला व दुसऱ्या खिशात हात घालत म्हणाली, "फाड पावती. मला काय कमी केलंय रामाने! हे घे १०० रुपये अन दे पावती." त्या मातेची रीतसर पावती बनवली व निधी घेऊन तिला पावती देण्यात आली.

हातात पावती पडल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद असा होता जणू तिला साक्षात प्रभु श्रीरामाने दर्शन दिलं..!!

"मनामनात राम... चराचरात राम"


©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या