ध्येयनिष्ठेपुढे व्यक्तिनिष्ठा गौण...



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत व्यक्तिपूजा होत नाही... जयंती पुण्यतिथीला ही स्थान नाही. ध्येयनिष्ठेपुढे व्यक्तिनिष्ठा गौण असते असे मानणाऱ्या संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच ही रीत घालून दिली आहे.

डॉक्टरांचा याबाबतचा दृष्टिकोन इतका पक्का होता की त्यांना परम आदरणीय असलेल्या देवतास्वरूप भाई परामानंद यांचा वाढदिवस संघशाखांवर साजरी करू नये असे भाईजींचे जावई व लाहोरचे संघचालक श्री. धर्मवीर यांना १९३८ मध्ये लिहिलेल्या एका इंग्रजी पत्रातून व्यक्त केली होती. 

"आम्हास पवित्र असलेल्या कार्याची आतापावेतो सेवा केलेल्या आणि अद्याप करणाऱ्या सर्व महापुरुषांचा आम्ही सन्मान करत असलो तरी त्यापैकी कोणा एका व्यक्तीच्या सन्मानार्थ विशेष दिवस साजरा करणे संघाला शक्य होईल असे मला वाटत नाही" असे डॉक्टरांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

व्यक्तिनिरपेक्षतेचा संघसंकेत डॉक्टरांनी स्वतःपासून लागू करत संघाच्या गुरुस्थानीसुद्धा भगव्या ध्वजाला ठेवले. आजही दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वयंसेवक गुरुस्थानी असलेल्या भगव्या ध्वजाला प्रणाम करत गुरुदक्षिणा अर्पण करतात. 

संदर्भ - युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार, सांस्कृतिक वार्तापत्र

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#युगप्रवर्तक_डॉ_हेडगेवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या