सन 1674 साली चाफळला श्रीरामनवमी उत्सव सुरु होता. उत्सवात द्वादशीला सर्व भक्तांना प्रसाद म्हणून जेवण मिळत असे.1674 साली ब्राह्मणांनी चाफळला यायला नकार दिला.त्यावेळी समर्थ रामदास यांनी चाफळपासून 10 मैलावरील भोवरवाडी या गावच्या 1000 दलित दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले....हे सारे लोक चाफळला आले. सर्वांनी मांड नदीत स्नान केले.मंदिरात प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले.समर्थांनी सर्व स्त्रियांना साडीचोळी दिली तर सर्व पुरुषांना धोतर आणि उपरणे दिले. "भूदेव" म्हणून समर्थ रामदासांनी सर्वांना साष्टांग दंडवत घातला. हा प्रसंग ज्यांच्यासमोर घडला घडला ते गिारिधरस्वामी समर्थचरित्रात लिहीतात - "रामदास गोसावी प्रत्येक स्त्रीमध्ये सीता पाहत होते,तर प्रत्येक पुरुषामध्ये प्रभू रामचंद्रांना पाहत होते"
(संदर्भ- संस्काराचे मोती,सुनिल चिंचोलकर)
जाती व वर्णव्यवस्था कधीकाळी होती पण वर्तमान संदर्भात ती हिंदु समाजास मारकच आहे.तिचे समर्थन करणे म्हणजेच हिंदुसंघटनेला बाधा उत्पन्न करण्यासारखेच आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
"जे जे भेटे भूत।ते ते मानिजे भगवंत। हाचि जाणिजे भक्तियोगु माझा।।"
जाती आणि वर्ण यांनी हिंदु समाजाची मोठी हानी केली आहे.त्यामुळे जातीश्रेष्ठत्वाच्या भावनेतून चालत असलेल्या प्रथांना आता मूठमाती द्यायलाच हवी."सबका साथ, सबका विकास", मानव आणि मानवतेची पूजा हेच हिंदुत्व आहे.
साभार - रवींद्र गणेश सासमकर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#समरस_भारत
0 टिप्पण्या