कट्टरतावादी गुंडांच्या निशाण्यावर हिंदूंच्या लग्न वराती? सामाजिक सलोख्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न..



आपण मराठवाड्यातील रझाकारांची गुंडशाही ऐकली असेल. निजामाच्या राज्यात हिंदू समाजाला साधे सण  उत्सवही साजरी करण्यावर निर्बंध होते. हिंदूंनी कोणताही आनंदोत्सव साजरी करू  नये. वाद्य वाजवू  नये. मिरवणूक काढू नये.. मंदिरातील भजन कीर्तनाचा आवाज बाहेर यायला नको. घंटा वाजवू नये. वगेरे वगेरे. या सर्व गोष्टी आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसातील अश्याच रझाकारी मानसिकतेच्या कट्टरतावादी  गुंडांनी हिंदू समाजाच्या चक्क लग्न वरातीलाच टार्गेट केलेले दिसत आहे. लग्नं वरातींवर हल्ले करणे, दगडफेक करणे, वाद्ये वाजवण्यास मना करणे असे प्रकार समोर येत आहे. याच वर्षी रामनवमी व हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले सुद्धा हेच दर्शवताय. 

घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावची. १४ मे रोजी या गावातील सैलानी नगर या भागातून लग्नाची वरात जात होती. त्या वरातीत डीजेवर रामाचं गाणं लावलं, म्हणून लग्नाच्या वरातीवर दगडफेक करण्यात आली. एवढंच नाही, तर यादरम्यान मुस्लीम तरुणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. हि झाली एक घटना. 


अश्याच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या इस्लामपूर भागात वरातीत देवाची गाणे वाजवण्यावरून विरोध सुरू झाला व नंतर वरातीवर दगडफेक सुरु झाली. हा वाद इतका वाढला कि, काही मुस्लीम तरुणांनी वऱ्हाडी मंडळींना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. काही वरातीत सहभागी काही लोक जखमी झाले..  हि झाली याच दिवशीची दुसरी घटना. 

यात थोडंस मागं गेलं, तर ६ मे रोजी अमळनेरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात काही मुस्लीम तरुण मुलींचे व्हिडिओ काढत होते. ते व्हिडिओ काढताना त्यांना अडवलं, म्हणून त्या हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या हिमायत नगर तालुक्यातील जवळगाव येथेही  मशिदी समोरून वरात काढल्यामुळे दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. शाहादा येथेही अब्दुल हमीद चौकात वरातीत नाचताना केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून वरातिंना  हाणामारी करण्यात आली.

या झाल्या मागील दहा दिवसातल्या लग्नाच्या वरातीत विघ्न आणलेल्या घटना. जर तुम्ही या सगळ्याकडे लक्षपूर्वकपणे बघितलं, तर या सगळ्या घटनांमध्ये काही साधर्म्य दिसून येतं. हे सगळे हल्ल्याचे किंवा दगडफेकीचे प्रकार लग्नाच्या वरातीतच घडले आहेत, यात मुख्यत: रामाच्या किंवा देवाच्या गाण्याला विरोध केला गेलाय. हल्ला करणारे लोकं मुस्लीम समुदायाचे आहेत, आणि हल्ल्याचं ठिकाण मुस्लीम मोहोल्ला किंवा मशिदी जवळचाच परिसर आहे. 


या झाल्या मागील दहा दिवसातल्या घटना, पण या पूर्वी देखील पुणे, उल्हासनगर, मुंबई अश्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अश्याच प्रकारच्या कित्येक घटना घडल्या आहेत. या सगळ्यात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मुस्लिम कट्टरतावादी गुंडांचा हिंदू देवी देवतांना किंवा हिंदूंच्या गाण्याला, आणि आनंद साजरा करण्याच्या पद्धतीला असलेला विरोध. 

इस्लाम धर्मात उघडपणे मोठ्या आवाजात गाणे वाजवणे वर्ज्य मानले जाते. शिवाय या पृथ्वीवर अल्लाह शिवाय कुणीच मोठं नाही, ही शिकवण दिली जाते आणि त्यातून हिंदू देवी देवतांना, हिंदू उत्सवांना कडाडून विरोध केला जातो. हीच गोष्ट कट्टरतावादी मुस्लीम मानसिकतेला खतपाणी घालतेय का? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच अश्या प्रकारे वरातीमधल्या गाण्यांना किंवा विशेषतः रामनवमी, हनुमान जयंती अश्या कार्यक्रमात देवाची गाणी वाजवण्याला मुस्लिम कट्टरतावाद्यांचा विरोध असतो. परिणामी मुस्लिम मोहल्यात किंवा मशिदीच्या आसपासच्या भागात हिंदू धर्मियांच्या वरातीवर दगडफेकीच्या किंवा जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना वाढतात. 

जेव्हा समाजात अश्या प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा गुन्हेगारांना अटक केली जाते, काही कलमं लावली जातात. दाखवण्यापुरती का होईना पण कायदेशीर कारवाई होते, मात्र कालांतराने ही  कट्टरतावादी मानसिकता पुन्हा बळावते, आणि हिंदूंच्या सण, उत्सवांमध्ये आडकाठी आणायला तयार होते. विशेष म्हणजे एरवी राज्यातील छोट्या मोठ्या घटनांवर भाष्य करणारे राजकारणी लोकं अश्या हिंदुंवर हल्ला होण्याच्या घटनांकडे, आणि अश्या कट्टरतावादी विकृत मानसिकतेकडे सरळ सरळ डोळेझाक करतात. एकाही स्थानिक राजकीय नेत्याच्या तोंडून अश्या घटनांबाबत अवाक्षरही काढले जात नाही. 

समाजात एकीकडे अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी देशाच्या तळागळात काम करणारे मुस्लीम बांधव भरभरून देणगी देतात. प्रभू श्रीरामाचा आदर करतात.. श्रीराम सर्वांचेच आहेत असा आपल्या कृतीतून मोलाचा संदेश देतात. आणि दुसरीकडे अश्या प्रकारचे समाजकंटक लोक हिंदूंच्या सण समारंभाला गालबोट लावतात, ही नक्कीच लाजिरवाणी आणि सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचवणारी गोष्ट आहे. अलीकडेच समोर येणाऱ्या लग्न समारंभाला विरोध करण्याच्या घटना चुकीचा पायंडा निर्माण करू शकतात. त्यामुळे या विषवल्लीला वेळीस वेसण घातले नाही तर पुढे हा धोका निश्चितच मोठा होऊ शकतो.  

यात विशेष बाब म्हणजे एरवी जेव्हा समाजात हिंदू मुस्लीम दंगे होतात, तेव्हा ते शांत करण्यासाठी किंवा त्यात मुस्लीम धर्मीयांची कमकुवत बाजू मांडण्यासाठी भाईचारा गँग  पुढे येते. मात्र जेव्हा अश्या प्रकारे हिंदू देवी देवतांच्या गाण्यावरून हिंदू धर्मियांवर दगडफेक होते, तेव्हा मात्र ही भाईचारा गँग मूग गिळून गप्प बसलेली दिसते. 

भारतामध्ये आपले सण, उत्सव, आनंद साजरा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा सांविधानिक अधिकार आहे. पण काही समाजकंटकांमुळे  अश्या प्रकारे सामाजिक सलोख्याला ठेच पोहोचत असेल, तर ही  नक्कीच चिंतेची बाब आहे. अश्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई होणे खूप महत्वाचे आहे.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या