मांगवडगाव । ता.केज जि.बीड येथे जमिनीच्या वादातून पारधी जनजाती समाजातील तीन बांधवांची क्रूरतेने हत्या केल्याबाबत आज विवेक विचार मंच द्वारे काही मागण्यांचे निवेदन गृहविभाग - महाराष्ट्र, जिल्हाधिकारी - बीड, पोलीस - अधीक्षक बीड यांना मेल करण्यात आले. संबंधित आरोपींना केवळ अटक करून चालणार नाही, तर त्यांच्याविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर करून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ओरायत्न करायला हवे असे विवेक विचार मंच ने म्हंटले आहे.
13 मे 2020 रोजी मांगवडगाव गावी पारधी भटक्या जनजाती समाजातील पवार कुटुंबातील तीन जणांची निर्घून हत्या झाली. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार जमिनीच्या वादातून घटना घडल्याचे कळते.13 जणांना अटक झाली आहे. परंतु, कायदा हातात घेऊन मुडदे पाडण्या इतकी क्रूरता कशी येत असेल? लोकांमध्ये कायदायचा धाक नाहीये का? असा सवाल विवेक विचार मंचाने उपस्थित केला आहे. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणे हे दुर्दैवी आणि अत्यंत चीड आणणारे आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. पीडित कुटुंबातील सदस्यांनी घटनेच्या अगोदर पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असल्याचे कळाले. तरीही त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही हे गंभीर असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्रात पारधी समाजावर अन्याय झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. पैसा, प्रतिष्ठा, जातीचे संख्यात्मक बळ यातून वंचित घटकांवर अन्याय होता काम नये. बऱ्याचदा पोलीस तपास, साक्षीदार मॅनेज केले जातात, न्याय मिळत नाही आणि त्यामुळे अशा घटना वारंवार घडतात का असाही प्रश्न पडतो. पोलिसांनी, प्रशासनाने, न्यायव्यवस्थेने त्यांचे काम प्रामाणिकपणे पार पडले तर अशा अन्यायी हिंसक घटनांना आळा बसेल. अनेक घटनांमध्ये पीडितांना न्याय झालेलाही आहे.
तरी गृहमंत्री व पोलिस विभागाने या संवेदनशील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना केवळ अटक करून न थांबता न्यायालयासमोर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे सादर करून त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत योग्यपणे काम करावे. सदर खटला तज्ञ वकील नियुक्त करत जलद गती न्यायालयात चालवावा. पीडितांना संरक्षण व आवश्यक ती मदत करावी अशी आम्ही मागणी करतो.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या